mrityunjaymahanews
अन्य

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत चराटी… तालुका कोरोना अपडेट्स

आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीच्या संचालक पदी अनिकेत चराटी

 

आजरा येथे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून नव्यानेच सुरू झालेल्या आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत अशोक चराटी यांची निवड करण्यात आली आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासो वाघमारे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले असून यावेळी संचालक नारायण मुरकुटे, रामचंद्र मुरकुटे, शिवाजी रावण, संभाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

……

उचंगी’ च्या घळभरणीचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले…

पोलीस बंदोबस्तात सुरू असलेले उचंगी प्रकल्पाचे घळभरणीचे काम प्रकल्पग्रस्तांनी एकजुटीच्या जोरावर बंद पाडले आहे. प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा बघून येथील यंत्रसामग्रीसह पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला आहे.

‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या मागणीशी प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. उचंगी प्रकल्प अंतिम टप्प्यात असून पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने घरभरणीचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी प्रकल्पग्रस्त प्रकल्पस्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने बैठक घ्यावी व त्यानंतरच घळभरणीबाबत विचार केला जाईल अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी मांडली. कोणताही अनुचित प्रकार होण्याआधी येथील शासकीय यंत्रणा व यंत्रसामग्री हलविण्यात यावी अशी मागणीही प्रकल्पग्रस्तांनी केली.प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका बघून येथील यंत्रसामग्री अखेर हलवण्यात आली आहे. दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी सोबत बैठक झाल्यानंतर उचंगी च्या उर्वरित कामाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

१ फेब्रुवारी २०२२ नंतर प्लास्टिक वापर करणारी दुकाने सीलबंद करणार…

आजरा नगरपंचायतमार्फत कच-यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने महाराष्ट्र प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील वस्तूसह प्लास्टीक बंदी असणा-या ७५ Micron पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या (कॅरीबॅग), प्लास्टीकचे भाडे, वाटी, ताट, कप्स इ. वापरण्यास सक्त मनाई आहे. वरील नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच अशा आस्थापनांना अनिश्चित काळासाठी सीलबंद करण्यात येईल व त्यांचे नाहरकत दाखले रद्द करण्यात येतील. दि.१ फेब्रुवारीनंतर नगरपरपंचायत मार्फत प्लास्टीक बंदीबाबत तपासणी करणेत येणार असून ज्यांच्याकडे प्लास्टीक बंदी अंतर्गत असणा-या वस्तू आढळूण येतील, त्याचेवर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी. आजरा शहर प्लास्टीक मुक्त करणेसाठी सर्व व्यापारी बंधू, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले.

आजरा साखर कारखाना गाळप रिपोर्ट

दिनांक-२८.१.२२.

दिवस-८९

गाळप एकुण=२,६०,१४० मे.टन

साखर एकुण= ३,११,९५० क्विंटल.

उतारा- सरासरी- १२.०६

………

व्यंकटराव हायस्कूलचे गणित प्रज्ञा शोध परीक्षेत सुयश

येथील व्यंकटराव प्रशालेच्या इ.५ वी व इ.८वी मध्ये शिकत असलेल्या विध्यार्थ्यांनी गणित प्रज्ञा शोध परिक्षेत चांगले यश संपादन केले.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.इ.५वी इयत्तेतील ११ विध्यार्थी व इ.८वी मधील १२ विध्यार्थी प्रज्ञा पात्र ठरले आहेत.
सदर परीक्षेतील यशस्वी विध्यार्थी पुढीलप्रमाणे….
(इ.५वी ) १) सानवी लक्ष्मण चौगुले २) आर्या अशोक कांबळे ३) आस्था सचिन गुरव ४) संस्कृती धनाजी इलगे ५) विभावरी विक्रम जावळे  ६) अन्मया रणजित देसाई ७) पियुष संजय कुंभार ८) स्वराज प्रवीण निंबाळकर ९) निरंजन गणेश पाटील १०) संस्कार संजय तेजम ११) ध्रुव राजाराम हरमळकर
(इ.८वी)..१) समर्थ गोकुळ हसबे २) परमेश्वर देविदास पवार ३) क्षितिज मारुती डेळेकर ४) समृद्धी सुरेश शिवणे ५) निवेदिता नितीन खोराटे ६) अनुष्का उदय हेब्बाळकर ७) लावण्या समीर शिपुरकर ८) संचिता संजय लांडे ९) सुमित राजाराम कांबळे १०) आदित्यराज दीपक पाटील ११) कादंबरी जयदीप खवरे १२) सलोनी बाळू कोंडूसकर या  विध्यार्थ्यांना इ.५वी साठी श्री.ए. वाय. चौगुले ,व सौ.आर.व्ही.जावळे  यांचे मार्गदर्शन मिळाले तर इ.८वी साठी श्रीमती ए. बी.पुंडपळ  श्रीमती ए. के.गुरव  यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रशालेच्या प्राचार्य श्री.एस.बी.गुरव पर्यवेक्षक श्री.एस. जी.खोराटे  आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री.जयवंतराव शिंपी व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले.

……..

आजरा साखर’मार्फत संशोधित ऊस बेण्याचे वाटप….

आजरा साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत दरवर्षी ऊस विकासाच्या विविध योजना राबवून कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातात.
या वर्षी कारखान्यामार्फत व्ही. एस. आय. पुणे यांचेमार्फत संशोधित झालेले को. व्ही एस आय १८१२१ या ऊसजातीचे ऊसबेणे कारखाना कार्यक्षेत्रात चेअरमन सुनील शिंत्रे, संचालक वसंतराव धुरे, घोरपडे सर यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्षेत्रात प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्यामुळे आजरा कारखाना उसांबाबत स्वयंपूर्ण होईल असे चेअरमन यांनी सांगितले. को. व्ही एस आय १८१२१ या उसजातीविषयी व लागण विषयी माहिती ऊस विकास चे अग्रीओव्हरसिअर ए. एस. माडभगत यांनी सांगितले. को. व्ही एस आय १८१२१ ही जात को ८६०३२ आणि को.टी.८२०१ यांचे संकर करून तयार केले आहे. ही ऊसजात संशोधित असलेमुळे कार्यक्षेत्रात प्रत्येक सेंटरला प्रगतशील शेतकरी निवडून ऊस जातीचा अभ्यास करण्याचा हेतू असलेबाबत श्री धुरे यांनी सांगितले.
कार्यक्रमास चेअरमन शिंत्रे, संचालक धुरे, घोरपडे, उसविकासचे माडभगत, प्रभाकर कांबळे,कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
आभार  पांडुरंग उत्तूरकर यांनी मानले

आजरा तालुका कोरोना रिपोर्ट..

 

१० जाने २०२२ पासून एकुण बाधित…१०७.

 

सध्या उपचार घेत असणारे ४४.

 

मयत १ (शिरसंगी)                            दिनांक २९.१.२२रोजी बाधित ५ रूग्ण.

( परोलीवाडी, साळगाव व आजरा)

 

दिलगिरी…

तांत्रिक अडचणीमुळे गेली दोन दिवस वेळेवर न्यूज बुलेटीन प्रसिद्ध करण्यात आम्हाला अडचणी आल्या. यामुळे जाहिरातदार व वाचकांची गैरसोय झाली. तांत्रिक अडचणी लवकरच दूर करीत आहोत दिलगिरी बद्दल क्षमस्व….

ज्योतिप्रसाद सावंत मुख्य संपादक

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विजेचा धक्का बसून आज-यात एकाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!