mrityunjaymahanews
महाराष्ट्रराजकीय

देवेंद्र-अमृता फडणवीस व राज ठाकरेंमध्ये गुप्तगू …भाजपा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्येचा प्रयत्न… राज्याच्या मुख्य सचिवांना ईडीचे समन्स…कृषी कायदे घ्यावे लागले मागे

मंत्रिमंडळ बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावास मंजुरी; २९ नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र केवळ घोषणेवर आम्ही अंदोलन मागे घेणार नसून संसदेत विधेयक मांडून कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत सरकारने हे तीन कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी  मिळाल्यानंतर आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाऊ शकते. पंतप्रधान कार्यालयाच्या शिफारशीवरून कृषी मंत्रालयाने कायदा रद्द करण्यासाठी विधेयक तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.

कायदा करण्यासाठी जशी संसदेची मान्यता आवश्यक असते, तशीच ती रद्द करण्यासाठीही संसदेची मान्यता आवश्यक असते. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जाईल. या विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. यानंतर हे विधेयक मंजूर होताच तिन्ही कृषी कायदे रद्द होतील.

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात; राजकीय चर्चांना उधाण

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याच्या एकीकडे चर्चा रंगत असतानाच आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सोबत होत्या. राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आज अचानक राज ठाकरे यांच्या घरी आले. ही कौटुंबीक भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात हे दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसत आहेत.

मुंबई महानगर पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

आज सकाळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संपावर देखील भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार बाळासाहेब मुरकुटेंचा महावितरण कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज महावितरणच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या प्रयत्न केला. मुरकुटेंनी अहमदनगरमधील कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजपकडून आक्रमक पवित्रा घेतला होता. या आंदोलनात मुरकुटे देखील सहभागी झाले असून त्यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मुरकुटेंना गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना उपस्थित इतर लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुरकुटेंच लोकांनी वाचवले आणि सध्या मुरकुटेंची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. जलंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे.

नेमके काय झाले?
महावितरण कार्यालयात मुरकुटेंनी तीन तास ठिय्या आंदोलन केले आहे. नेवासे भाजपचं शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीनच हजार रुपये भरून घ्यावे, अशी मागणी मुरकुटेंनी केली होती. यावेळी मुरकुटेंच्या मागणीला महावितरण कार्यालायतील अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. यामुळे मुरकुटे संतप्त झाले होते. यानंतर मुरकुटेंनी महावितरण कार्यलायत मुरकुटे यांनी दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुरकुटेंना उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी थांबवले. मुरकुटेंना श्वास रोखला गेल्याचं लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुरकुटेंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे.

 पोलीस बदली प्रकरण : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स

मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देशमुख आणि अनिल परब यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. वसुली प्रकरणाची चौकशी करत असतानाच ईडीने या प्रकरणासंदर्भात सीताराम कुंटे यांना समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली.

सीताराम कुंटे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. कुंटे यांना २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल सीताराम कुंटे यांनी असमर्थतता दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची बैठक असून, बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक असल्याने चौकशीसाठी हजर होऊ शकत नसल्याचं कुंटे यांनी म्हटले आहेतत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जुलै २०२० मध्ये मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्याबद्दल अनिल देशमुख आणि अनिल परब हे नाखुश होते. या यादीतील पोलीस अधिकाऱ्यांनी ४० कोटी रुपये जमवले. त्यापैकी २० कोटी देशमुख यांना, तर २० कोटी परब यांना देण्यात आल्याचं मला नंतर कळलं,’ असा आरोप सचिन वाझेनं केलेला आहे.

संबंधित पोस्ट

बहिरेवाडीत चोरट्यांचा धमाकूळ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!