mrityunjaymahanews
कोल्हापूरराजकीय

पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक आमने सामने

पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक आमने सामने

 

कोल्हापूर :-ज्योतिप्रसाद सावंत

 

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक घोषित झाली असुन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपाने माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीत रंगत वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे.दोन तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतदारांचे उखळ पांढरे होणार हे देखील स्पष्ट झाले आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. विद्यमान गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने यापूर्वीच निश्चित केले होते. गृहराज्यमंत्री पाटील यांच्या विरोधात कोण? याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. भाजपतर्फे माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा महाडीक विरूद्ध पाटील असा गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला पहावयास मिळणार आहे.

एक वेळ कोल्हापूरच्या राजकारणात बंटी आणि मुन्ना ही जोडी धुमाकूळ घालणार अशी चर्चा होताना दिसत होती. २००४ ची विधानसभा निवडणुक करवीर मतदारसंघातून तात्कालिन वजनदार कॅबिनेट  मंत्री दिग्विजय खानविलकर पराभव करून सतेज पाटील पहिल्यांदा आमदार झाले. तोपर्यंत बंटी- मुन्ना ही जोडी एकत्र होती. त्यानंतर मात्र या दोघांमधील मतभेद वाढत गेले. २००९सालानंतर कोल्हापूर दक्षिण मधुन
सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडीक अशी लढत झाली यामध्ये सतेज पाटील यांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या राजकारणातून झालेला हा संघर्ष पुढे आमदारकीसह लोकसभा, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ इथेही सुरूच राहिला. कोल्हापूर जिल्हावासिय आजही हा संघर्ष अनुभवत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकी पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाने बाजी मारली होती. २०१५ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तत्कालीन विधानसभा सदस्य महादेवराव महाडिक यांना सतेज पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील या घरच्या उमेदवाराच्या माध्यमातून अमल महाडीक यांना आमदारकी पासून वंचित ठेवण्यात राज्यमंत्री सतेज पाटील यशस्वी झाले. गेल्या चार वर्षात सतेज पाटील यांनी काँग्रेसची जिल्ह्यामध्ये मोट बांधण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे सतेज पाटील असे सूत्र तयार झाले आहे. महाडिक विरुद्ध पाटील परिवार असाच संघर्ष राहिला.  राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित असणारा महाडीक परिवार राजकीय बेरजेच्या राजकारणात भाजपामध्ये डेरेदाखल झाला. जिल्ह्यातील एकूण घडामोडी पाहता गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना ही निवडणूक सोपी नाही हेदेखील नाकारून चालणार नाही. या सर्व प्रकारात विधानपरिषदेकरिता मतदार म्हणून भूमिका बजावणारी मंडळी मात्र ‘अच्छे दिन’ येणार असल्याने सुखावली आहेत.

संबंधित पोस्ट

आजरा अर्बन बँकेचा अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योजगांसाठी मेळावा उत्साहात

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी मंगळवारी…. विश्वनाथ गुंजाटी यांचे निधन …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा पं. स. उपसभापती निवड आज… हात्तीवडे येथे दोन ठिकाणी घरफोडी… आजऱ्यातील राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव स्थगित… तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!