mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

BREAKING NEWS…

रविवार 

१६ ऑगस्ट २०२६

लाकूडवाडी येथील महिला वन संरक्षकाची माडखोल येथे आत्महत्या….

 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील लाकूडवाडी येथील महिला वनसंरक्षक आश्लेषा सागर मांगले ( वय २२ वर्षे ) हिने माडखोल तालुका सावंतवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. बीएससी शिक्षण पूर्ण झालेल्या आश्लेषा यांच्या निधनाने लाकूडवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी सागर मागले यांची ती कन्या होती.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विमाधारक महिलेच्या वारसाला दोन लाखांची विमा मदत

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उमेद–महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयं-सहाय्यता समूहांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. उत्तूर प्रभागात ४४७ स्वयं-सहाय्यता समूह व २४ ग्रामसंघ कार्यरत आहेत.

या समूहांतील सदस्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी करून घेतले जाते. या योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास दोन लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते.मुमेवाडी येथील मरगूगाई बचत गटाच्या सदस्या सविता संतोष काटे यांचा तीन महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या विम्याची दोन लाख रुपयांची रक्कम वारस संतोष शिवराम काटे यांना देण्यात आली.

बँक ऑफ इंडिया, उत्तूर शाखेचे व्यवस्थापक विशालकुमार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला.यावेळी पंचायत समिती सदस्य विकास चौधरी, तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बोकडे, ग्रामसेवक सचिन येसादे, प्रभाग समन्वयक मिलिंद पाटील, सीआरपी वर्षा भिंउंगडे, मेघा दादू सावंत व बँक सखी विद्या पाटील उपस्थित होते.

अपघात प्रकरणी एकाला शिताफीने गोव्यातून ताब्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भरधाव दुचाकी चालवून वेळवट्टी येथील एकाला गंभीर जखमी करून पलायन केलेल्या व पोलिसांना चकवा देणाऱ्या कमल रमेश बोहरा ( वय ३१ वर्षे रा. अंजुना बीच, गोवा ) याला आजरा पोलिसांनी गोवा येथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे.

२८ जुलै रोजी आजरा – आंबोली मार्गावर सदर अपघात झाला होता. अपघातानंतर मोहरा गायब होता.

बालगोपाळांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन….


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

संस्कार बाल मंदिर, अंगणवाडी क्रमांक १४ व मरगुबाई शिशुविहार अंगणवाडी क्रमांक २१ येथे नगरसेविका पूनम लिचम यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेविकास सोडली यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळेची आवड निर्माण होण्यासाठी मुलांना अंगणवाडीत पाठवून येथून मिळणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. मुलांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

यावेळी अंगणवाडी सेविका सौ. कार्तिकी दीपक चिकुर्डे , मदतनीस सौ. सोनाली उत्तम भडगावकर तसेच सेविका श्रीमती जबीन शेख व मदतनीस शमशाद भडगावकर यांच्यासह आरती बेळगुळकर आरती मनोळकर, गायत्री कट्टी,सविता ढोकरे, उज्वला सावंत, दिपाली गोवेकर, करूणा कांबळे इत्यादी उपस्थित होत्या.

इटे उपसरपंच पदी लक्ष्मण पाटील


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

इटे, तालुका आजरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ.ज्योती चव्हाण निवडीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. निवडीनंतर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सदस्य विलास पाटील, नामदेव फगरे, प्रियांका पेडणेकर, सुरेखा कांबळे उपस्थित होत्या. ग्रामसेवक विक्रम देसाई यांनी आभार मानले.

श्रावणातील चार शनिवार रंगणार लोककलेच्या सुरांनी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर, ता. आजरा येथे कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघ, शाखा आजरा यांच्या वतीने श्रावणातील चार शनिवार लोककला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. उत्सवात शाहिरी, भजन, डवरी-गोंधळ तसेच राष्ट्रीय व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. परिसरातील विविध कला समूह या उत्सवात सहभागी होऊन पारंपरिक लोककलेचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे श्रावणातील शनिवार लोककलेच्या विविध रंगांनी आणि भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहेत. तालुक्यातील लोककलावंतांना व्यासपीठ मिळावे तसेच पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे तालुकाध्यक्ष राजाराम कोपटकर यांनी केले आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १५ ऑगस्ट २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया तिथी (सायंकाळी ०५.२८ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (१६ ऑगस्ट पहाटे ०३.२५ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : शिवा योग (सकाळी ०७.०८ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : गराजा करण (सायंकाळी ०५.२८ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : सिंह राशी (सकाळी ०९.३४ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३२ ते सकाळी ११.०७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.०८
सूर्योदय : सकाळी ०६.२१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

फोटो क्लिक…

वेळवट्टी येथील पाझर तलावासह ठिकठिकाणी असणाऱ्या निसर्गरम्य अशा ठिकाणी वर्षा पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांकडून मद्यपान करून मद्याच्या बाटल्या थेट पात्रात टाकल्या जात असल्याने याचा नाहक त्रास शेतकरी वर्ग व इतर पर्यटकांना होताना दिसत आहे.


शहरातील काही भागात रस्ते चकचकीत झाले असले तरी नव्या वसाहतींमध्ये चिखलाचे साम्राज्य कायम आहे.

स्थळ : आजरा आंबोली मार्गाशेजारील  हॉटेल मिनर्वा परिसराची मागील बाजू.

शासकीय ध्वजारोहण…

आजरा येथे आज शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ .०५ वाजता तहसील कार्यालय आवारात तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.

संबंधित पोस्ट

आजऱ्यात पूरस्थिती कायम

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर येथे जुगार अड्ड्यावर छापा… पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती.. अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!