mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  १० मे  २०२६

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण ही सर्वांची जबाबदारी : पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ज्या शाळेत चांगले शिक्षण मिळते. तेथे पालकाकडून विद्यार्थी प्रवेश घेतात. पालकांच्याकडून अशा शाळाना प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजेत ही सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्वकष पातळीवर प्रयत्नांची गरज आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

पेरणोली येथे केंद्रीय शाळेच्या शताब्दी महोत्सव सोहळा थाटामाटात साजरा झाला. पालकमंत्री आबिटकर प्रमुख पाहणे होते. नूतन सरपंच सौ.वनश्री देसाई अध्यक्षस्थानी होत्या. शिवाजी वि‌द्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ नंदकुमार मोरे, जि. प.सदस्य सुधीर देसाई, पं.स.सभापती जयश्री गाडे, उपसभापती सौ. यशोदा पोवार, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, विजय सारंग प्रमुख उपस्थित होते. सकाळी गावातून शोभायात्रा निघाली.

संयोजन समितीचे अध्यक्ष उदयराज पवार यांनी स्वागत केले. कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले.

प्रा. डॉ मोरे म्हणाले, सध्या प्राथमिक शिक्षणाबद्दल मूलभूत विचार करण्याची गरज आहे. मराठी शाळाबद्दल तयार झालेले गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. पालकांनी सरकारवर दोष न देता आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमधे शाळा, गाव व भूमी बद्दलचे भान कमी होत चालले आहे. गांधीजीनी शिक्षणामधे नई तालीम याची मांडणी केली होती. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी आदिवासी भागात उपक्रम राबविले. याचा विचार होण्याची गरज आहे.

सरपंच वनश्री देसाई, तानाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी शिक्षक, पंच्याहत्तर वर्षावरली विद्यार्थी यांचा या वेळी सत्कार झाला.

राजेंद्र सावंत, उपसरपंच संकेत सावंत, अविनाश जोशीलकर, पांडुरंग लोंढे, संतोष जाधव, रावसाहेब देसाई, मुख्याध्यापक एकनाथ पाटील, रविंद्र देसाई, सुरेश कालेकर, संजय मोहीते, संयोजन समिती, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. उदय कोडक यांनी आभार मानले‌.

नवीन इमारत बांधून देणार…

शाळेला नवीन इमारत बांधून दिली जाईल. परंतु केवळ इमारत बांधून चालणार नाही. यापूढे पालकांनी शाळा वाचवण्यासाठी मुले मराठी शाळेत पाठविण्याची जबाबदारी घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले.

सुलगाव येथे बुधवारपासून श्री भावेश्वरी मंदिर जिर्णोद्धार व वास्तुशांती समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सुलगाव ता. आजरा येथे श्री जगदंबा ज्ञानेश्वरी भावेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ बुधवार दिनांक १३ मे शुक्रवार दिनांक १५ मे अखेर आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती माहिती जिर्णोद्धार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

बुधवार दिनांक १३ रोजी सकाळी पुण्याहवाचन, गणेश पूजन, वरूण देवता पूजन, मातृका पूजन, कलश मिरवणूक व इतर धार्मिक विधी होणार आहेत. दुपारी दोन वाजता महाप्रसाद व त्यानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे भजन रात्री आठ वाजता महाप्रसाद व नऊ वाजता ह.भ. प. कृष्णदेव ढालगावकर यांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवार दिनांक १४ रोजी सकाळी देवीची स्थापना विधी व कलशारोहण, देवीचे पूजन, प्राणप्रतिष्ठापना, अलंकार आरती, गा-हाणे व मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल.

सायंकाळी आठ वाजता माऊली हरिपाठ महिला मंडळ, शिरसिंगी यांचा हरिपाठ कार्यक्रम व रात्री आठ वाजता महाप्रसाद त्यानंतर रात्री नऊ वाजता ह. भ‌. प. बाळासाहेब रानमाळे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

शुक्रवार दिनांक १५ रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद, एक ते चार वाजेपर्यंत महाआरोग शिबिर, सायंकाळी चार ते सात पर्यंत देवीची ओटी भरणे, सायंकाळी सात वाजता महाप्रसाद, रात्री आठ वाजता मान्यवरांचे सत्कार व दत्त सेवा संगीत भजन पंडेवाडी / राधानगरी यांचे सोंगी भजन होणार आहे.

‘पार्वती-शंकर ‘ची अनुष्का पोटे आजरा तालुक्यात प्रथम

उत्तूर – मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील श्री पार्वती-शंकर विद्यालयाची सेमी इंग्रजी माध्यमातून १०० टक्के निकालाची अखंडित १७ वर्षाची परंपरा यंदाही कायम राहिली. कु.अनुष्का सुनील पोटे या विद्यार्थिनीने ९८. २० % गुण घेऊन आजरा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला , तर आदित्य जगदीश आळवे- गुण ९६.८० % ; अथर्व पांडुरंग भाटले-गुण ९६ . २० % ; कु.गौरी संजय भिऊंगडे व ओम दत्तात्रय सुतार- गुण ९६% ; कु. तनिष्का गजानन सरमळकर गुण- ९५.८०% घेऊन उत्तूर केंद्रात गुणानुक्रमे पहिला ,दुसरा, तिसरा ,चौथा व पाचवा क्रमांक घेऊन एस .एस.सी निकालाची शाळेची यशाची परंपरा कायम राखली .
या शाळेच्या अनुष्का ,आदित्य, अथर्व, आणि गौरी यांनी गणीतात पैकीच्यापैकी गुण घेतले . ६५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १८ विद्यार्थी ९० % पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले.या यशाने शाळेच्या उज्वल यशाचा लौकिक कायम राहिला आहे .

शाळेचे मुख्याध्यापक एम् . यु. शिकलगार, वर्गशिक्षक पी. एन. केसरकर, शिक्षक वैशाली पाटील , पंडित वंजारे , बी .बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता
सुमती कुलकर्णी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील श्रीमती सुमती वामन कुलकर्णी
( वय ९४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने काल शनिवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, विवाहित मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.येथील व्यापारी श्रीपाद उर्फ पप्पू कुलकर्णी यांच्या त्या आई होत.

विलास आरळगुंडकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे ता. आजरा येथील विलास रामचंद्र आरळगुंडकर ( वय वर्ष ५९ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

माजी सरपंच गणपतराव आरळगुंडकर यांचे ते पुतणे होत.

श्रीमती जनाबाई निऊंगरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे ता. आजरा येथील श्रीमती जनाबाई दत्तु निऊगरे ( वय वर्षे ७२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, एक मुलगी, सुना, नाती असा परिवार आहे.

त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे त्यांच्या आई होत.

आजचे पंचांग 

दिनांक : १० मे २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (दुपारी ०३.०६ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (११ मे रात्री १२.४९ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : ब्रह्म योग (११ मे रात्री ०२.०८ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : कौलव करण (दुपारी ०३.०६ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मकर राशी (दुपारी १२.११पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.२६ ते सायंकाळी ०७.०३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०७
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज 

काल शनिवारी झालेल्या गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्यांमध्ये गुजरातने राजस्थान वर दणदणीत विजय मिळवत गुण तक्त्यात थेट दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. गुजरातचे २२१ गावांचे आव्हान गाठताना राजस्थानला आपला डाव १५२ धावांवर गुंडाळावा लागला. रशीद खान याला सामनावीर घोषित करण्यात आले.

गुण तक्ता…

पहिले पाच संघ
१. हैदराबाद १४
२. गुजरात १४
३. पंजाब १३
४. बंगळुरू १२
५. राजस्थान १२

आजचे सामने…

चेन्नई विरुद्ध लखनौ

दुपारी ३.३०

बंगळुरू विरुद्ध मुंबई

सायंकाळी ७.३०

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोळगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण…ओढ्याच्या पाण्यात पडून किटवडे येथील एकाचा मृत्यू…जनता बँकेने नवउद्योजक निर्माण केले : खासदार संजय मंडलिक…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!