mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार ९ मे  २०२६

शक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला ठाम विरोध
गाव शिवारात पाय ठेवू न देण्याचा बाधित शेतकऱ्यांचा निर्धार…

आजरा – मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित अरेखनाला पाच मे रोजी अंतिम मान्यता देऊन महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. या आधारे येत्या काही दिवसात संयुक्त मोजणी सुरू करण्याची करणार असल्याची हालचाल प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याची कुणकुण लागली आहे. या पार्श्वभूमीवर काल आजरा येथे तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यालयात पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थानी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई होते.

बैठकीचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले की राज्य सरकारने अंतिम अधिसूचना 5 मे रोजी जाहीर केले असून त्याच्या आधारे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून संयुक्त मोजणी करण्याच्या घाट सरकारने आखला आहे संयुक्त मोजणी करण्याची हालचाल प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याचे समजते. त्यामुळं शक्तीपीठचे हे संकट शेतकऱ्यांच्या गाव शिवारात आले आहे. १५ तारखेपर्यंत संयुक्त मोजणी करून अहवाल शासनाला देण्याचे आदेश महसूल विभागाला आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आज ही तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी पथकाला गावात किंवा शिवारात फिरू द्यायचे नाही काही झाले तरी शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी आता तय्यार राहावे.

यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, आपण आता ढिले पडता कामा नये. काही झाले तरी संयुक्त मोजणी करू द्यायची नाही. त्यासाठी तीव्र विरोध करूया असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील संयुक्त मोजणी पथकाला गाव शिवारात फिरकू देणार नाही.

यावेळी युवराज पोवार, युवराज जाधव, नामदेव गुरव, कॉ शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, चंद्रकांत जाधव, संजय घाडगे, शंकर हाळवणकर, दिनेश कांबळे, महादेव गुरव, दिगंबर पाटील, सुभाष देसाई, संजय देसाई, प्रकाश दोरुगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठया उपस्थित होते.

सोमवारी निवेदन देणार

सोमवारी शक्तीपीठ बाधित शेतकरी आजरा पंचायत समिती येथे मोठ्या संख्येने जमून तहसीलदार आजरा यांना शक्तीपीठच्या संयुक्त मोजणीसह या महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निवेदन देणार आहेत.

मलिग्रे भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती सोहळा उत्साहात संपन्न.


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे गावचे आराध्य दैवत भावेश्वरी देवीच्या मंदिर वास्तूकशांती सोहळा गुरूवार दिनांक ७ मे पासून प्रांरभ झाला असून शुक्रवारी ८ मे रोजी कलश मिरवणूक व मुर्ती मिरवणूकीत माहेर वाशीनी महिलासह संपूर्ण गावातील अबाल वृध्द मोठ्या संख्यने सामिल झाल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे.

गावाच्या मध्यभागी असणाऱ्या चाळोबा, रवळनाथ मंदिराचा वीस वर्षा पुर्वी जिर्णोध्दार झाला असून त्या मंदिराजवळ असणाऱ्या भावेश्वरी मंदिराचा जिर्णोध्दार करून देणगीदार व लोक सहभागातून आकर्षक असे मंदिर बांधकाम झाले आहे.

आज शनिवारी प्रधान देवता मुर्ती स्थापना व रविवारी महाप्रसादाचे नियोजन केले आहे. यासाठी सोंगी भजन व विविध कलागुणाचा सास्कृतीक कार्यक्रम तर युवावर्गाने आणि मुंबई ग्रामस्थ वतीने किक्रेट सामन्याचे आयोजन केले आहे.

दहावी निकाल

तालुक्यातील २२ शाळा १०० %

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दहावी परीक्षेत आजरा तालुक्याचा निकाल ९८.२८ टक्के इतका लागला. तालुक्यातील २२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

आजरा तालुक्यातील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :

व्यंकटराव हायस्कूल आजरा ९८.९८%,

उत्तुर विद्यालय ९५.२३%,

आजरा हायस्कूल ९७.८३

डॉ.झा.हुसेन अँग्लो उर्दू हाय.आजरा ९५.८३%,

आदर्श हायस्कूल गवसे ९६.४२%,

एरंडोळ हायस्कूल ९०%,

पेरणोली हायस्कूल ९५.२३%,

वाटंगी हायस्कूल ९५.८३%,

छत्रपती शिवाजी विद्यालय होन्याळी ८५.७१%.

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा

भादवण हायस्कूल, कर्मवीर विद्यालय चिमणे, मलिग्रे हायस्कूल, रोझरी इंग्लिश स्कूल आजरा, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी, वसंतरावदादा पाटील विद्यालय उत्तुर, श्री सरस्वती हायस्कूल हत्तीवडे, आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड, आदर्श हायस्कूल शिरसंगी, राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे, चाफवडे हायस्कूल, माध्यमिक विद्यालय आरदाळ, मडीलगे हायस्कूल, चोरगे विद्यालय बेलेवाडी हुबळगी, पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा, दाभील हायस्कूल, केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी, आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी, रवळनाथ हायस्कूल देवर्डे, माध्यमिक विद्यालय कोळिंद्रे, पार्वती शंकर विद्यालय उत्तुर, डायनामिक पब्लिक स्कूल सुळेरान.

आजरा शहरातील शाळा निहाय यशस्वी विद्यार्थी

आजरा हायस्कूल

१.सिद्देश महादेव गुरव- ९८%

२.राजेश सुधीर पाटील-९७.२०%

३.गतिमा हंबीरराव अडकुरकर-९६.८०%

३.आदिती अभिजित भातकांडे – ९६.८०%

व्यंकटराव हायस्कूल आजरा

१.प्रणव भगवान पाटील ९६.२०%

जुवेरिया समीर शेख. ९६.२०%

२.सिमरन भिकाजी पाटील ९५.४०%

३.शलाका ओमकार गिरी ९४.८०%

पंडित दिनदयाळ विद्यालय,आजरा

१.खतीजा शहनवाज मुल्ला ९६.६०%

२.हाफिज समीर आगा ९०%

३.श्रेयशी शिवाजी बोलके ८८.२०%

डॉ.झाकीर हुसेन ॲंग्लो उर्दू हायस्कूल आजरा

१.आक्सा इर्शाद वाडीकर ८७.६०%

२.आसिया अबूहुरेरा माणगांवकर ७६.४०%

३.सादिया आयुब लमतुरे ७५%

रोजरी इंग्लिश हायस्कूल. १. पाटील राजवर्धन संदीप – ९६.८०. २. केसरकर रावित ब्रह्मा -९५.६०. ३. शेख महिआन इस्माईल -९४.८०

हाजगोळी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री भावेश्वरी देवीचा तेरावा वर्धापन दिन सोहळा व मरगुबाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त हाजगोळी बु. ता. आजरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज शनिवार दिनांक ९ मे पासून सोमवार दिनांक ११ मे अखेर नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १२ मे रोजी भावेश्वरी मंदिर येथे गणेश पूजन पुण्याह वाचन, नवग्रह पूजन, देवीचा अभिषेक, होम हवन, आरती गाऱ्हाणे, पालखी मिरवणूक, महिलांसाठी हळदी कुंकू , होम मिनिस्टर असे कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवार दिनांक १४ मे रोजी रात्री नऊ वाजता ‘संस्कृती महाराष्ट्राची’ हा जागर कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दिनांक १५ मे रोजी सकाळी सुतार बंधूंच्या घरातील देवीच्या मूर्तीची मरगुबाई मंदिर पर्यंत मिरवणूक निघणार असून महिलांनी ओटी भरणे, नैवेद्य दाखवणे असे कार्यक्रम आहेत.

आजचे पंचांग

दिनांक : ९ मे २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (दुपारी ०२.०२ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (रात्री ११.२४ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : शुक्ल योग (१० मे रात्री ०२.३५ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : भाव करण (दुपारी ०२.०२ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२१ ते सकाळी १०.५८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.०८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज 

काल शुक्रवारी झालेल्या कोलकाता व दिल्ली यांच्यातील सामन्यात कोलकाताने दिल्लीवर आठ गडी राखून दमदार विजय मिळवला. हा कोलकाताचा सलग चौथा विजय ठरला आहे.

नाबाद १०० धावा करणाऱ्या फिन ॲलनला सामनावीर घोषित करण्यात आले.

आजचा सामना

राजस्थान विरुद्ध गुजरात

वेळ : सायंकाळी ७.३० पासून

गुणतक्ता…

१. हैदराबाद –  १४

२.पंजाब – १३

३ बंगळूरू – १२

४. राजस्थान – १२

५. गुजरात – १२

निधन वार्ता 

पांडुरंग पसारे

मुरुडे ता. आजरा येथील पांडुरंग सखोबा पसारे ( वय ७० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!