mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार  दि.२२ जानेवारी २०२६

उमेदवाऱ्या जाहीर करण्यात शिवसेना शिंदे गटाची आघाडी 

शक्ती प्रदर्शनाने अनेकांनी दाखल केले अर्ज 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषद व पंचायत समिती करिता अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवशी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या.

शिवसेना शिंदे गटाने दोन्हीही जिल्हा परिषद मतदारसंघासह पंचायत समिती करता चारही अधिकृत उमेदवाऱ्या जाहीर करून स्वतंत्र लढण्याची घेतलेली भूमिका, अनपेक्षित रित्या शिंपी गटाने शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा घेतलेला निर्णय, शिवसेना शिंदे गटातून पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसरकर यांची जाहीर झालेली उमेदवारी, राष्ट्रीय काँग्रेसचे उत्तम देसाई यांची पेरणोली पंचायत समिती करता भाजपा कडून जाहीर झालेली उमेदवारी या घटना दिवसभरातील सर्व घडामोडीतील प्रमुख घटना म्हणाव्या लागतील. बहुतांशी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले.

 मतदार संघ निहाय परिस्थिती

जिल्हा परिषद

जिल्हा परिषद उत्तूर एकूण ८ अर्ज

१.अश्विन अर्जुन भुजंग

२.धनश्री मानसिंग देसाई

३.वैशाली उमेश आपटे

४.उमेश मुकुंदराव आपटे दोन अर्ज

६.परशुराम ईश्वर कांबळे

७.शिरीष हिंदूराव देसाई,

८.विठ्ठल महादेव उत्तूरकर

जिल्हा परिषद पेरणोली एकूण १३ अर्ज

१.सुतार जयवंत २ अर्ज

३.रामचंद्र भिकू पाटील

४.सुधीर रामदास सुपल

५.राजाराम पांडुरंग पोतनिस

६.विष्णू मोतबा केसरकर

७.संदीप चौगले /२ अर्ज

९.सुधिर देसाई /२ अर्ज

११.सुरेश कृष्णा शिंगटे,

१२.सुपल सुधीर रामदास,

१३.रणजीत सरदेसाई

पंचायत समिती

उत्तूर पंचायत समिती एकूण ७ अर्ज

१.विकास वसंत चोथे,

२.चंद्रकांत ईश्वर गोरुले

३.संभाजी राजाराम कुराडे

४.अभिजित अमृत आरेकर

५.सागर शशिकांत वागरे

६.महेश काशिनाथ करंबळी

७.व्यंकटेश बंडेराव मुळीक

पंचायत समिती भादवण एकूण ८ अर्ज

१.गाडे जयश्री गजानन

२.डेळेकर भारती कृष्णा

३.साधना संजय केसरकर

४.पाटील श्रीदेवी महादेव

५.वर्षा विकास बागडी

६.स्वप्नाली किरण केसरकर

७.विजया जर्नादन निऊंगरे/२

पंचायत समिती पेरणोली एकूण १३ अर्ज

१.अस्मिता दत्तात्रय कांबळे

२.रचना राजाराम होलम

३.रूपाली धनंजय पाटील 2 अर्ज

५.सुमन राजाराम पोतनीस

६.रेखा रणजीत पाटील

७.जिजाबाई महादेव कांबळे

८.वंदना राजेंद्र पाटील

९.स्मिता उत्तम देसाई

१०.गुरव मनीषा गोविंद

११.यशोदा युवराज पोवार,

१२.रचना राजाराम होलम,

१३.श्वेता रणजीतकुमार सरदेसाई

पंचायत समिती वाटंगी एकूण १३ अर्ज

१.होलम राजाराम गुणाजी २

३.शिंदे नरसू बाबू

४.कृष्णा विष्णू पाटील

५.समीर दशरथ पारदे

६.शंकर गोविंद कुराडे

७.संजय अर्जुन तरडेकर

८.संजय बाळू सांबरेकर

९.बळवंत ज्ञानू शिंत्रे

१०.अशोक मारुती शिंदे

११.सतीश गणपती फडके

१२.राजाराम पांडुरंग पोतनिस

१३.किरण विश्वनाथ कोरे,

दाखल अर्जांची आज गुरुवारी छाननी होणार आहे.

राजकीय पटलावर सावळा गोंधळ….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्याच्या राजकीय पटलावर सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. कोणीही कोणा बरोबरही जाऊ शकतो हे चार दिवसातील घडामोडींनी स्पष्ट झाले आहे. सुरू असलेल्या अनेक घटना या निश्चितच धक्कादायक आहेत. या सर्व घडामोडीत महायुती अंतर्गत घटक पक्षातच चुरशीने सत्ता संघर्ष होणार असे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याचा घेतलेला निर्णय हा तालुक्याच्या भविष्यातील अनेक राजकीय उलथापालथींचे संकेत देणारा आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी अण्णा -भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांना रसद पुरवली होती. परंतु शिवसेना शिंदे गटाची तालुक्यात स्वबळावर निवडणुकींना सामोरे जाण्याइतपत आव्हान तयार करण्याची ही संधी मंत्री आबिटकर यांनी गमावलेली नाही. माजी सभापती विष्णुपंत केसरकर यांच्यासह ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांची मिळवलेली साथ गोकुळसह जिल्हा बँक राजकारणावर परिणाम करणारी ठरणार आहे. मंत्री आबिटकरांसोबत शिंपी गट जाईल व विष्णुपंत केसरकर यांची शिवसेनेतून उमेदवारी जाहीर होईल याची पुसटशी कल्पना नसणाऱ्या अशोकअण्णा चराटी यांना हा मोठा राजकीय धक्का म्हणावा लागेल. मंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात चराटी यांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान तयार केले आहे. एकाच वेळी एकीकडे मंत्री मुश्रीफ तर दुसरीकडे मंत्री आबिटकर यांना डिवचण्याचे काम चराटी यांनी केले आहे. उत्तूर मतदारसंघात ताराराणी आघाडी व पेरणोली मतदारसंघात भाजपाला दगा फटका झाल्यास याची फार मोठी किंमत चराटी यांना मोजावी लागणार असे दिसत आहे.

निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसची पूर्ण वाताहात झाली आहे. उमेश आपटे यांनी ताराराणी आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रीय काँग्रेसची फार मोठी राजकीय कोंडी केली आहे. एक खांबी कारभार असेल तर पक्षाची कशी वाताहत होते याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. काँग्रेस म्हणजे आपटे आणि आपटे म्हणजेच काँग्रेस असे समीकरण गेले काही वर्षे तयार झाले होते. आपटे यांच्या भूमिकेने मात्र काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, आजरा कारखाना संचालक अशोक तर्डेकर चित्रात कुठेच दिसत नाहीत.

यावेळी शिंपी गटाने मात्र सावध भूमिका घेत निवडणूक रिंगणाबाहेर राहून एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करून अनेकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. पक्षांतर्गत काही मंडळीं कडून निवडणूक कालावधीत केल्या जाणाऱ्या कुरापतींना यामुळे चांगलाच चाप बसला आहे. उद्या निकालानंतर शिवसेना सत्तेत आल्यास विलास पाटील यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याचा शब्दही त्यांनी घेतलेला आहे.

राष्ट्रवादीसह भाजपामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पेरणोली, वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचा उमेदवारीचा तिढा न सुटणे हे देखील दोन्ही पक्षांच्या दृष्टीने चिंतनीय आहे. पेरणोली पंचायत समिती करिता भाजपाला ऐनवेळी राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ. स्मिता उत्तम देसाई यांना उमेदवारी द्यावी लागली. तर राष्ट्रवादीचा वाटंगी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार कोण? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. आज याचा फैसला होईल.

क्राईम न्यूज

मुम्मेवाडी येथे महिलेला शिवीगाळ व मारहाण
तिघांविरोधात गुन्हा नोंद…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुम्मेवाडी तालुका आजरा येथे सौ.स्वाती सुनील कांबळे या महिलेस मारहाण केल्याप्रकरणी सुभाष महादेव काटे यांच्यासह अन्य दोघांवर सौ.कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे.

सौ. कांबळे यांचे पती काटे यांच्या घरी दारू पीत असताना आढळून आले. यावेळी त्यांना तिथून घरी नेताना सौ. कांबळे यांनी सुभाष काटे यांना आपल्या पतीला दारू देऊ नका असे सांगितले असता यावरून वाद झाला. या वादातून कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

मटका घेताना एकास रंगेहात पकडले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील भाजी मंडईत उघड्यावर कल्याण मटका घेत असताना आजरा येथील एकास पोलिसांनी रंगेहात पकडून ६ हजार ७५ रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मटका एजंटांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

निधन वार्ता
अनंत हरेर

हत्तीवडे ता. आजरा येथील अनंत नागोजी हरेर (वय ८१ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन आज गुरुवार दिनांक २२ रोजी सकाळी आहे.

अशोक कळेकर

पेरणोली ता. आजरा येथील अशोक गणपती कळेकर ( वय ६८ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे रक्षाविसर्जन उद्या शुक्रवारी आहे.

 

संबंधित पोस्ट

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!