mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सातच्या बातम्या

शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५

वनविभागाच्या कारभाराविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वनविभागाच्या अखत्यारीतील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत विविध संघटना, पक्ष यांनी वारंवार निवेदने देऊनही वनविभागाने दखल घेतली नाही. याविरोधात गुरूवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना व शेतकऱ्यांनी येथील छत्रपती संभाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आजऱ्याचे परीक्षेत्र वनअधिकारी सचिन सावंत यांनी येत्या पंधरा दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत वारंवार आवाज उठवूनही वनविभाग दखल घेत नाही. तर गेल्या आठवड्यात एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करून वनविभाग सत्ताधाऱ्यांसोबत काम करीत असल्याचे स्पष्ट केले. खरतर ज्या-ज्या संघटना, पक्ष यांनी निवेदने देऊन मागणी केली त्या सर्वांसोबत बैठक घेऊन चर्चा केली असती तर अनेक प्रश्न सुटले असते. मात्र वनविभागाने आपण सरकारचे नोकर आहोत, जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आम्हाला काही देणं-घेणं नाही हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट केल्याचा आरोप या आंदोलनादरम्यान करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी संभाजी चौकात संकेश्वर-बांदा महामार्गावर ठिय्या मारून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने रास्तारोको करण्यास मज्जाव केल्यामुळे चौकातच महामार्गालगत आंदोलकांनी ठिय्या मारला.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, कॉ. धोंडीबा कुंभार, शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख युवराज पोवार, राजू होलम, कारखान्याचे संचालक हरीबा कांबळे, कॉ. संजय तर्डेकर यांनी वनविभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली. वनविभागाच्या आधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम करावे असा सल्ला दिला. वनविभागाशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विविध पक्ष व संघटनांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून लढा सुरू असतानाही केवळ सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलावून बैठका घेतल्या जातात. यातून शेतकऱ्यांचे प्रश्न किती सुटले असा सवालही वनविभागाला करण्यात आला.

या आंदोलनात शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, काशिनाथ मोरे, दिनेश कांबळे, संजय येसादे, गंगाराम डेळेकर, प्रकाश मोरूस्कर, कॉ. शांताराम पाटील, रामचंद्र पाटील, जोतीबा चाळके, सुनील डोंगरे, डॉ .धनाजी राणे,सुर्यकांत दोरूगडे, शिवाजी आडाव, संजय सांबरेकर, रंगराव माडभगत,आनंदा कुंभार, तुळसाप्पा पोवार, गोपाळ जाधव, नारायण कांबळे, अमित गुरव, तानाजी डोंगरे, दशरथ घुरे,बिलाल लतीफ, महेश पाटील, समीर चॉंद, विजय डोंगरे, संजूभाई सावंत यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते, तालुक्यातील विविध गावातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते.

‘स्वाभिमानी’ ने ‘आजरा’ची ऊस वाहतूक रोखली…
व्यवस्थापनाबरोबर सकारात्मक चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना गतवर्षीची एफआरपीची थकीत ७० रुपयांची रक्कम पंधरा दिवसात देणार असल्याची लेखी ग्वाही कारखाना प्रशासनाच्यावतीने स्वाभिमानीच्या प्रतिनिधीना देण्यात आली. इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संकेश्वर बांदा महामार्गावरील टोलनाक्यावर स्वामिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूक रोखल्यानंतर संघटना व कारखाना प्रतिनिधीची आज बैठक झाली.

थकीत एफआरपी रक्कम, ऊस दर व अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी आज आंदोलन केले होते. कारखान्याकडे जाणारी ऊसाची वहाने अडवली जाणार होती. पण कारखान्याने एकही वाहन रस्त्यावर आणले नाही. यानंतर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई प्रास्ताविकात आजरा कारखान्याने चालू वर्षीची पहीली उचल जाहीर करावी. मागील थकीत एफआरपीची रक्कम १ कोटी ९५ लाख व सन २०२२- २३च्या फरकाची रक्कम १ कोटी ६५ लाख येणे बाकी आहे. ती तातडीने द‌द्यावी. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्‌यान्नवार म्हणाले, नेते राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीसाठी
न्यायालयाची दारे ठोठावली. एकरकमी एफआरपी देण्याबाबत उच्च न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. त्यानुसार मागील वर्षाचा साखर उतारा व तोडणी ओढणी निश्चित करून चालु वर्षाची एफआरपी ‌द्यावी लागेल या जुन्या सुत्रानु‌सार निकाल लागला आहे. त्यानुसार थकीत एफआरपी द्यावीच लागेल.

कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी कारखान्याची बाजू मांडली. गतवर्षी आजराने ३१०० रुपये दर दिला होता. थकीत ७० रुपये पंधरा तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. सन २०२२- २३ मधील पन्नास रुपयांची फरक रक्कम संचालक मंडळासमोर ठेवून निर्णय घेवू.

यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय देसाई, सखाराम केसरकर, सुभाष पाटील, धनाजी पाटील, बसवराज मुत्नाळे, नरेंद्र कुलकर्णी, सुरेश शिंगटे, निवृत्ती कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील, पांड्ररंग सावंत, काशिनाथ भादवणकर, धोंडीबा सावंत, बबन बार्देस्कर, राणोजी पोवार यांच्यासह संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदयराज पवार, एम. के. देसाई, अनिल फडके, रणजित देसाई, शिवाजी नांदवडेकर, दिगंबर देसाई, दीपक देसाई, हरीबा कांबळे, राजू जोशीलकर, राजू होलम,राजू मुरुकटे, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आजरा अर्बनच्या ना.म. जोशी मार्ग मुंबई शाखेचा सुवर्ण महोत्सव समारंभ उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या ना.म. जोशी मार्ग मुंबई शाखेचा सुवर्ण महोत्सव समारंभ गुरुवारी मा.नामदार हसन मुश्रीफ, वैद्यकिय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुबई यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला आ. शिवाजीराव पाटील श्री. सुनिल शिंदे-अमदार, वरळी विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुबई व श्री. अशोक अण्णा चराटीसो चेअरमन व अग्णा भाऊ संस्था समूह प्रमुख उपस्थितीत होते.

याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई येथील गिरणी कामगार व कामगार वर्ग हा सावकारी पाशातून जात होता त्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी बँकेचे संस्थापक कै. आण्णा आणि कै. भाऊ यांनी ५० वर्षापूर्वी दि २ एप्रिल १९७५ रोजी ना.म. जोशी मार्ग मुंबई शाखेची स्थापना केली. बँकेने अपल्या भागातील लोकांना घर खरेदीसाठी कर्ज वितरीत केल्यामुळे बहूसंख्य लोकांची घरे झाली व लोकांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा बँकेचा उद्देश साध्य झाला असल्याचे मत व्यक्त करून आजरा बँकेने केलेल्या अलौकिक प्रगतीबद्दल अभिनंदन केले व आजरा बँकेने खाजगी व राष्ट्रीयकृत बँका प्रमाणेच प्रगती केली असलेचे गौरवोद्गार काढले व समाधान व्यक्त केले. तसेच आ. शिवाजीराव पाटील व आ. सुनील शिंदे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष श्री. अशोकअण्णा चराटी यानी बँकेच्या कार्याचा आढावा घेत ग्रामीण भागात स्थापन झालेली व शहरामध्ये शाखांचा विस्तार असणारी मल्टीस्टेट दर्जाची आजरा बँक अग्रगण्य बँक म्हणून राज्यासह देशभरात नावलौकिकास पात्र झाली असलेचे सांगितले .

तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी बँकेकडून पूरविल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांचा आढावा घेतला.

या प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन श्री. संजय चव्हाण, श्रीमती अन्नपूर्णा चराटी, श्री. सुरेश डांग, श्री. विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर. डॉ. अनिल देशपांडे, श्री. रमेश कुरुणकर, श्री. किशोर मुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. अनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर , श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस , श्री. सुनील मगदूम, श्री. सुर्यकात भोईटे, श्री. किरण पाटील,ॲड. सचिन इंजल, श्री. मनोहर कावेरी, श्री. जयवंत खराडे आ्् तसेच शाखा मार्गदर्शक श्री.भैरु टक्केकर, श्री. गिरीधर कुराडे, श्री. कान्होबा माळवे व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक बँकेचे सहाय्यक सख्यवस्थापक श्री. तानाजी गोईलकरसो व स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी केले तर आभार व समारोप बँकेचे संचालक डॉ. अनिल देशपांडे यांनी मानले.

शाहीर लहू कुंभार यांचे निधन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर पंचक्रोशीत नावाजलेले शाहिर लहु शंकर कुंभार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

कुंभार हे आपल्या शाहिरी कलाकारीसाठी ओळखले जात. आपल्या प्रभावी आणि जोशपूर्ण शाहिरीने त्यांनी उत्तूर गावाचे नाव दूरवर पोहोचवले. शाहिरीबरोबरच ते डाक पूजनसारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सक्रिय सहभागी होत असत.मठातील महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने ते दरवर्षी सेवा बजावत असत.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुना आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शाहिरी क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आजरा आगारात शिवसेनाप्रणीत शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेची स्थापना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा आगारामध्ये शिवसेनाप्रमुख शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेची स्थापना करण्यात आली.

या संघटनेच्या आजरा आगार अध्यक्षपदी संदीप कोगेकर तर उपाध्यक्षपदी विलास डोंगरे व विजय राणे यांची निवड करण्यात आली आहे.

आजरा आगाराची इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे…

सचिव- हरीश तावडे उपसचिव -अमित वारके/ विलास पाटील, खजिनदार -दयानंद कदम, सह खजिनदार- अजित भोईटे कार्याध्यक्ष- इरफान भुसारी/ संदीप राऊळ प्रसिद्धीप्रमुख- किशोर पाटील, अमित खुर्दळ दीपक कांबळे, दीपक राऊळ, परसराम मेटकर,विवेक कांबळे संघटक- शरद कांबळे/ सचिन बागडी सल्लागार- भालचंद्र सावंत, रवींद्र नातलेकर

यावेळी शिवाजी संकपाळ, विजय थोरवत इंद्रजीत देसाई, संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष संतोष भाटले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजरा येथे “वंदे मातरम् , राष्ट्राचा श्वास, स्वातंत्र्याचा जयघोष!”

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजरा येथे शिवतीर्थजवळ भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून व सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १५० हून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन वंदे मातरमचा जयघोष केला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. दत्तात्रय मोहिते यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या प्रसंगी वंदे मातरम गीताचा इतिहास व त्याच्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली प्रवासाविषयी माहिती श्री. श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.

सामूहिक गायनाची सेवा श्री. शंकर आपटे, श्री. अभिषेक देशपांडे, सौ. शर्मिला सातोस्कर, सौ. स्मिता गव्हाणकर, सौ. श्रद्धा वाटवे, सौ. चेतना केळकर, सौ. विनया केळकर यांनी भावपूर्णपणे पार पाडली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. विनायक चिटणीस यांनी केले. या वेळी मंदार बापट, नागराज रायकर, अभिषेक रोडगी, विक्की संकपाळ, अनिल पोवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कानोलीच्या उपसरपंच पदी चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कानोली-हारूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी चंद्रकांत पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील होत्या. कानोली-हारूर चे उपसरपंच प्रा. स्वप्निल आर्दाळकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर जेष्ठ सदस्य चंद्रकांत पांडुरंग पाटील यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन निवड केली.
यावेळी सदस्य सुधीरकुमार पाटील, प्रा. स्वप्निल आर्दाळकर अनिल पां. पाटील, सौ. सारिका शहाजी भोसले, सौ. शुभांगी अशोक पाटील, सौ.आरती सूर्यकांत देसाई, सौ. दिपाली दिपक सुतार, सौ. मायादेवी विठ्ठल लोहार ग्रामअधिकारी स्नेहदीप सरदेसाई, बाजीराव पाटील, सुभाष पाटील, दिपक देसाई, प्रकाश पाटील, गोपाळ भोगण शहाजी भोसले, सूर्यकांत मुरुकटे, दिपक सुतार, जैमलसिंह देसाई उपस्थित होते. आभार सुभाष पाटील यांनी मानले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आंबोली घाटात चिरा डंपर कोसळला…सौ. संजीवनी सावंत यांचा आंतरराज्य पुरस्काराने गौरव…क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचे घवघवीत यश…चंद्रशेखर फडणीस यांची निवड

mrityunjay mahanews

उत्तूरला चोरट्यांचा हवेत गोळीबार ; सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!