mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरमहाराष्ट्रराजकीयविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मंगळवार  दि.२१ आक्टोंबर २०२५

नावलकरवाडी परिसरात बिबट्याचा वावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली (ता. आजरा) येथील नावलकरवाडी व वारे पठार परिसरात बिबट्‌याचा वावर सुरु आहे. त्यांने आठ दिवसात दोन कुत्री पळवली असून त्यांचा फडशा पाडला आहे. त्याच्या वावराने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण आहे.

गेले पंधरा दिवस या परिसरात बिबट्‌या वावरत आहे. घरासमोर बांधलेली कुत्री तो पळवून नेत आहे. भिमराव दळवी यांचे शेत वारे पठारापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. येथील शेतात त्यांचे राहते घर आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या घरासमोरील राखणीसाठी बांधलेले कुत्रे पळवले. मध्यरात्री दळवी यांना कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आला. पण अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्‌याने कुत्रे अलगद पळवले. दोन दिवसांपूर्वी तो परत या परिसरात आला. त्यांने पेरणोली वारे रस्त्यावरील भटकत असलेले कुत्रे पळवल्याचे भिमराव दळवी यांनी पाहिल्याचे सांगीतले. बिबट्‌याच्या वावराने ग्रामस्थामधे भितीचे वातावरण पसरलेले आहे.

सोमवारी रात्री दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या समोरून बिबट्याने रस्ता ओलांडला.

आजरा ग्रामीण रुग्णालयात अँटी रेबीज लसींचा पुरेसा साठा

रुग्णाला आलेल्या रिअ‍ॅक्शन्समुळे पुढील उपचारासाठी पाठविले : डॉ. सुश्रृत जमदाडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे अत्यावश्यक लसींच्या कमतरतेबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीकडून डॉ. सुश्रृत जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. जमदाडे यांनी सदर प्रकरणाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले.

कु. प्रथमेश बयाजी कोकरे हा रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता. रुग्णास ARV लस टेस्ट केली असता रिअ‍ॅक्शन्स आली. त्यामुळे दुसरी वायल उघडून दुसऱ्या हातावर टेस्ट केली असता पुन्हा रिअ‍ॅक्शन्स दिसल्याने रुग्णाला तातडीने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे पाठविण्यात आले. तेथून पुढे रुग्णाला जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले.

डॉ. जमदाडे पुढे म्हणाले, “रुग्णाला गंभीर रिअ‍ॅक्शन्स आल्याने तातडीने पुढील उपचार व्हावेत म्हणून काळजीपूर्वक निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात सर्व प्रकारच्या लसी व तातडीच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.”

लशींची कमतरता असल्याचा उल्लेख रुग्णाच्या नातेवाईकांकडून गैरसमजुतीतून झाला असून, ग्रामीण रुग्णालयात लसींचा कोणताही तुटवडा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सचिव पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव रामचंद्र पंडीत, मिनीन डिसोझा, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर मदन तानवडे उपस्थित होते.

 

निधन वार्ता
सागर पाटील


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गवसे तालुका आजरा येथील सागर बळीराम पाटील (वय ३७ वर्षे )ग यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन गुरुवार दि. २३ रोजी आहे.

गोपाळ शिंत्रे

पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील गोपाळ आप्पासो शिंत्रे (वय ७५वर्षे ) यांचे सोमवार, दिनांक २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते शंकर हरी पाटील (होनेवाडी) – माजी पाटबंधारे अभियंता यांचे मावसभाऊ होत.

रक्षाविसर्जन गुरुवार, दि. २३ रोजी सकाळी ९.०० वाजता होणार आहे.

शंकर उत्तुरकर

उत्तूर या.आजरा येथील शंकर विठोबा उत्तूरकर (वय ८७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, जावई, सून,नातवंडे असा परिवार आहे.

गुरुवार दिनांक २३ रोजी रक्षा विसर्जन आहे.

उत्तूरमध्ये वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई वाटप

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर परिसरात दि. ३० जून २०२५ रोजी कोल्ह्याच्या हल्ल्यात उत्तूर येथील शेतकरी कृष्णा मारुती दळवी यांच्या दोन शेळ्या ठार झाल्या होत्या. या प्रकरणी शासनाकडून मंजूर अनुदानाचा धनादेश आज प्रत्यक्ष पीडित शेतकरी कृष्णा दळवी यांना वनपाल सागर पोवार आणि वनरक्षक रुद्रगोंडा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, ग्रामपंचायत सरपंच किरण शंकर आमणगी, तसेच राजू खोराटे, महेश करंबळी, अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

‘त्या’ महिलेचा अद्याप शोध नाही…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील पंचायत समिती बस स्टॉप वरून गडहिंग्लज बसमधून निघून गेली सौ. सुशीला संदीप पोवार ही कौलगे येथील ३४ वर्षीय महिला तब्बल आठवडाभरानंतरही घरी परतलेली नाही.

याबाबतची वर्दी यमेकोंड येथील पार्वती परशराम होडगे यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

सदर महिला कोणाला दिसून आल्यास आजरा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आजरा महाविद्यालयाचे चित्रकला परीक्षेमध्ये धवल यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयामधील इयत्ता अकरावी विज्ञान मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्रेया संजय पाटील हिने कोल्हापूर शाही दसरा २०२५ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. तिला कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी श्री. रवींद्र मस्कर व पालक उपस्थित होते.

किणे येथे विकासकामाचे उ‌द्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

किणे (ता. आजरा) येथे विविध विकासकामांचे उ‌द्घाटन झाले. किणे पैकी चाळोबावाडी येथील तांडा वस्ती व ग्रामपंचायत पंधरावा वित्त आयोगातून कॉंक्रीट रस्ता, पेव्हींग ब्लॉक्स व गटर्स, मराठी शाळेच्या स्टेजवरील शेड आदींचे उ‌द्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

या वेळी उपसरपंच विजय केसरकर, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ बामणे, महेश पाटील, सौ. मनिषा केसरकर, सौ. अलका बामणे, सौ. गुलाबी केसरकर, ठेकेदार आप्पासाहेब रावण, ग्रामसेविका सौ. कविता कोकीतकर तसेच वसंत नाईक, बसवंत वांजोळे, रमेश वांजोळे, दीपक नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

माऊली दुध संस्थेमार्फत दुध फरक वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सिरसंगी माऊली दूध संस्थेमार्फत दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त दूध फरक व फराळ साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी म्हैस दुधासाठी प्रति लिटर ७.५० रु. तर गाय दुधासाठी ३.२० रु. प्रति लिटर देण्यात आले. यावेळी संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्यांमध्ये प्रथम दत्तात्रय मातवणकर, द्वितीय क्रमांक श्रावण देसाई, तृतीय गिता संजय पाटील, चौथा शिवाजी सावंत, पाचवा क्रमांक गणेश मातवणकर. काढण्यात आले.तर गाय दुधामध्ये प्रभाकर देसाई यांनी जास्तीत जास्त दूध पुरवठा केला.

यावेळी चेअरमन दत्तात्रय मातवणकर यांच्या हस्ते दुध उत्पादकांना फराळ साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन मारूती बुडके, आनंदा गुरव, मारुती सावंत, रामचंद्र देसाई, कमल जाधव, संतू पताडे, भिमराव सडेकर, सुवर्णा बुडके, विद्याताई बुडके, पांडुरंग गुरव उपस्थित होते. सचिव अनिल मुळिक यांनी आभार मानले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कोवाडे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भादवण येथून तरुणी बेपत्ता…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!