mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शनिवार   दि. १३ सप्टेंबर २०२५   

पेरणोली येथे ४५ जणाचे रक्तदान सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली ता.आजरा येथील संस्थापक एकता गृहतारण व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर झाले. ४५ जणांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पेरणोलीच्या सरपंच सौपत्नी प्रियांका संतोष जाधव अध्यक्षस्थानी होत्या. माजी सभापती उदयराज पवार, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, , उपसरपंच संकेत सावंत, ग्रामपंचायत सदस्य रणजीत फगरे, सामाजिक कार्यकर्ते उदय कोडक, एकता समुहाचे अध्यक्ष अनिल पारदे, यशवंत कोडक सचिन देसाई , युवराज लोंढे,संजय दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन उद्घाटन झाले.

यावेळी अण्णासाहेब गळतगे ब्लड बँक गडहिंग्लजचे डॉ. सुभाष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. यावेळी संतोष जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. व्यासपीठावरील मान्यवरांचाही सत्कार झाला.

यावेळी अमर पवार, पांडुरंग दोरुगडे,सुरेश कालेकर,मारुती देसाई, अमर कालेकर, काकासो देसाई, मुरली देसाई, हर्षद लोंढे, निलेश चव्हाण, संतोष सावंत, संदीप पारदे, लाँरेन्स डिसोजा , अवि जोशीलकर ,एकनाथ जोशिलकर , राजेंद्र कळेकर ,राहुल लोखंडे, अरविंद लोखंडे सोपान फगरे, राजेंद्र भोकरे,के पी चव्हाण, यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रणजीत कालेकर स्वागत व प्रास्ताविक केले.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अखेर आजरा तालुक्यात सेवा पंधरवडा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्त सेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन व महात्मा गांधी जयंती यांच्या निमित्त आजरा तालुक्यामध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अखेर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.

या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मंडलनिहाय एक एक गावांची निवड करून पाणंद रस्ते कार्यक्रम प्रसिद्ध करणे, गाव शिवार फेरी काढणे, गावातील रस्त्यांची यादी तयार करणे, ग्रामसभा घेऊन यादी अंतिम करणे, ग्राम ठरावासह यादी तहसीलदारांना सादर करणे, अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे, भूमि अभिलेख विभागाकडून गाव नकाशातील रस्त्याबाबत आवश्यक ठिकाणी सीमांकन करणे, तहसीलदार यांनी रस्त्यावर अतिक्रमणाबाबत सुनावणी घेऊन आदेश पारित करणे, अतिक्रमण निष्कसित करणे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे यासह विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.

निधन वार्ता
शकुंतला गुरव

सुलगाव तालुका आजरा येथील शकुंतला बाळकृष्ण गुरव (८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने कोल्हापूर मुक्कामी निधन झाले.

त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा असून विवाहित मुली,जावई ,सून,नातवंडे असा परिवार आहे.

एस.टी. महामंडळाचे परिवहन अधिकारी प्रशांत/वैभव गुरव यांच्या त्या मातोश्री होत.

मोरजकर महाराज सप्ताह सांगता समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेले सात दिवस उत्साहात सुरू असलेल्या आजरा येथील ह.भ.प.लक्ष्मण बुवा मोरजकर यांच्या सप्ताहाची सांगता महाप्रसाद व तांदळाच्या प्रसादाने झाली.

सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ दिवस भजन, कीर्तन, प्रवचन या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच नेत्र तपासणी शिबिर, दिंडी असे विविध कार्यक्रम पार पडले.

पंचक्रोशीतील भाविकांसह महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातील भाविकांनी या सप्ताह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात धामणे येथे उद्या बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शासनाने गिरणी कामगारांना घरे देण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले. काही प्रमाणात घरे वाटप झाली, पण अजूनही हजारो गिरणी कामगार व वारस हक्काच्या घरापासून वंचित आहेत. मुंबईतच घर मिळावे हीच त्यांची एकमुखी मागणी असून या प्रश्नावर आजवर अनेक मोर्चे, आंदोलने व उपोषणे झाली आहेत. तरीदेखील शासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही.

अलीकडेच काहींनी गिरणी कामगारांना फोन करून “आम्ही म्हाडा मधून बोलत आहोत, तुमचे व्हेरिफिकेशन बाकी आहे” असे सांगून त्यांना फसवले. कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून OTP मागवला जातो आणि त्यानंतर खोटी कागदपत्रे व संमती पत्रे भरून घेतली जातात. ही संमती पत्रे पूर्णपणे फसवी असून, सदर बैठकीत ती संमती पत्रे तातडीने रद्द करून घेण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. अंबाजी गुरव यांच्या पुढाकाराने व आवाहनानुसार उद्या दिनांक १४ सप्टेंबर रविवार, संध्याकाळी ७ वाजता हनुमान मंदिर, धामणे येथे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस सागर चव्हाण (गिरणी कामगार वारसदार) यांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे बैठकीस नवे बळ आणि दिशा मिळणार आहे.

सोमवारी सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा किसान सभेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची आजरा तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुक्यातील देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या बाबत सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीन धारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होत आहेत. सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. निदर्शने आजरा तहसिलदार कार्यालयासमोर होऊन तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

देवस्थान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य व न्याय निर्णय व्हावा.ही अखिल भारतीय किसान सभेची आग्रही भूमिका आहे.अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.असा इशारा देण्यासाठी व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी हा निदर्शने करण्यात येणार आहेत असे कॉ.संग्राम सावंत , ॲड.दशरथ दळवी, कॉ.शिवाजी गुरव, हणमंत गुरव, शिवाजी गिलबिले, संजय गुरव, जानबा धडाम, काशिनाथ तेली यांनी स्पष्ट केले आहे.

पाऊस पाणी…

आजरा शहरासह परिसराला काल शुक्रवारी जोरदार पावसाने झोडपले. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एक वेळ पावसाने आठवडा बाजारा दिवशी हजेरी लावल्याने स्थानिक नागरिकांसह व्यापारी वर्गाची मोठी धावपळ उडाली.

आज आजऱ्यात..‌.

रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, आजरा व सुयश शिक्षण संस्था,आजरा यांच्यावतीने स्पर्धा परीक्षातील यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, यशस्वी शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण दुपारी एक वाजता डॉ. जे.पी.नाईक पतसंस्था सभागृहात होणार आहे.

आनंदा घाटगे डॉ. सुजित मिणचेकर ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील चिमणे येथील आनंदा दादू घाटगे यांना डॉ. सुजित मिणचेकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्या मंदिर शाहूनगर, रेंदाळ या इमारतविरहित शाळेला त्यांनी ग्रामपंचायत व पालकांच्या मदतीने ४५ लाखांचा निधी उभा करून स्वतंत्र इमारत व डिजिटल सुविधा मिळवून दिल्या. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक धुमशान सुरू

mrityunjay mahanews

कारण नसताना विरोधकांनी जिल्हा बँकेची निवडणूक लादली:ग्रामविकासमंत्री मुश्रीफ… मुरुडे येथे भांडण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा नोंद.

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यात काँग्रेस साधणार संवाद…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!