गुरूवार दि. ११ सप्टेंबर २०२५

शालेय विद्यार्थिनींचा आकस्मिक मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुंगूस वाडी येथील कु. चैत्राली विकास नरके या १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनींचा आकस्मिक मृत्यू झाला.
गेले पंधरा दिवस सदर विद्यार्थिनीचा मृत्यूची संघर्ष सुरू होता. पंधरा दिवसापूर्वी ताप आल्याचे निमित्त झाल्याने तीला उपचाराकरीता दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अखेर मंगळवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
तिच्या पश्चात आई-वडील, थोरली बहीण व लहान भाऊ असा परिवार आहे. तिच्या या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तालुका खरेदी विक्री संघाचा कारभार लोकाभिमुख करण्यास बांधील… अध्यक्ष महादेवराव पाटील यांची ग्वाही…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका खरेदी विक्री संघाचा कारभार सभासदांना विश्वासात घेऊनच सुरू आहे सभासदांच्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष महादेवराव पाटील यांनी केले तालुका खरेदी विक्री संघाच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.
सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्रद्धांजलीचा ठराव उपाध्यक्ष डी.ए. पाटील यांनी मांडला.
यावेळी गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या संघाच्या एकंदर व्यवसायावर चर्चा करण्यात आली. व्यवस्थापक जनार्दन बामणे यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले.
सभेमध्ये तानाजी देसाई, सचिन पावले, देवदास बोलके, धनाजी किल्लेदार, संजय देसाई, दयानंद भोपळे यांनी विविध प्रश्न मांडले. तालुक्यातील खताची मागणी पाहता संघाने खत कारखाना सुरू करावा. याचबरोबर इतर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पूरक बाबीही विचारात घ्याव्यात अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.संचालक सुधीर देसाई व व्यवस्थापक जनार्दन बामणे यांनी त्यांच्या प्रश्नाबाबत योग्य ते खुलासे केले.
सभेमध्ये सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केले.

यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, उपाध्यक्ष सुभाष देसाई, वसंतराव धुरे, राजू होलम, सहदेव नेवगे, रणजीत देसाई, अनिल फडके, काशिनाथ तेली, मारुतीराव घोरपडे, रशीद पठाण, धनाजी शिंदे,सौ.रचना होलम, राजू होलम, विक्रमसिंह देसाई, अनिकेत कवळेकर, प्रा. तानाजी राजाराम, सहदेव नेवगे, दिगंबर देसाई, विक्रम देसाई, शिवाजी बिद्रे,भीमराव वांद्रे, रामचंद्र पाटील, धनाजी शिंदे, शिवाजी नांदवडेकर, संचालक विठ्ठलराव देसाई, मधुकर देसाई, महादेव हेब्बाळकर, अल्बर्ट डिसोझा, उदयराज पवार,राजाराम पाटील, दीपक देसाई, गणपती सांगले, सौ. राजलक्ष्मी देसाई, सौ. मायादेवी पाटील , निसार दरवाज कर,मधुकर यलगार, ज्ञानदेव पोवार,सुनील देसाई,रवींद्र होडगे, जोतिबा चाळके, संजय उत्तुरकर, गणपती कांबळे,महेश पाटील,, भाऊसो किल्लेदार, जयराम संकपाळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार संचालक संभाजी तांबेकर यांनी मानले.
प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे...
♦ तालुक्यातील मलिग्रे, उत्तुर व गवसे येथे शेती सेवा केंद्र उभारणार…
♦ शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाबरोबरच केशर आंबा, केळी इत्यादीची लागवड करून उत्पन्न वाढवावे व त्यासाठी तालुका योग्य ती मदत करणार…
♦ मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल जरांगे यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला…
♦ वन्यप्राणी बंदोबस्तासाठी शासनाने योग्य ते उपाय करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा मागणीचा ठरावही करण्यात आली…

आजरा येथे दिंडी सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यासह गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ह. भ. प. मोरजकर महाराज यांच्या सप्ताहानिमित्त मुख्य आकर्षण असणारा दिंडी सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या संख्येने भजनी मंडळी व मोरजकर महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन, झिम्मा फुगड्या यासह विविध कार्यक्रमांचे सादरीकरण या दिंडीमध्ये करण्यात आले.
दिंडीत विविध गावची भजनी मंडळ, स्थानिक अबालवृद्ध नागरिक, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठीक ठिकाणी दिंडीचे व पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
आज गुरुवारी दुपारी बारा ते तीन या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री दहा वाजता तांदळाचा प्रसाद होणार असल्याचे ट्रस्टी सुभाष मोरजकर यांनी सांगितले.

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबत संयुक्त बैठकीचे आयोजन करा… उबाठा शिवसेनेची संरक्षकांकडे मागणी.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आणि चंदगड या दोन तालूक्यात हत्तीसह अन्य वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. गेल्या दशकभरापासून वन्यप्राण्यांनी खासकरून हत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. दरवर्षी हा प्रश्न केवळ चर्चेत येत असतो. शासनाने या प्राण्यांचा कायमस्वरूपात बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने होऊन देखील शासनाने हा प्रश्न गांभियनि घेतलेला नाही. विधासभेच्या अध्यक्षपदावर बाबासाहेब कुपेकर असल्यापासून विधीमंडळाच्या व्यासपीठावर या प्रश्नांची वारंवार बर्चा झाली आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी आंबोलीनजीक हत्तीग्राम उभारण्याचा प्रकल्प तत्कालीन कोकणचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. घोषणे पलिकडे काहीच प्रगती झाली नाही. हत्तीच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग दहशतीखाली आहे. रात्रीच्यावेळीच नव्हे तर दिवसासुद्धा आपल्या शेताकडे जाण्यासाठी शेतकरी वर्ग एका भितीच्या छायेखाली आहे. अलिकडे हत्ती त्यात खासकरून टस्कर नागरी वसाहतीत येऊन हल्ले करीत आहेत.
या हत्तीशिवाय गवे, रानडुक्कर आणि अन्य प्राण्याकडून पिकांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता या संदर्भात उपाययोजना तातडीने आणि गांभिर्याने होण्याची गरज आहे. त्यासाठी आपण आजरा कार्यालयात संयुक्त बैठकीचे आयोजन करून उपाययोजनेबाबत आराखडा तयार करावा आणि शासनाचे लक्ष वेधावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने संरक्षकांकडे करण्यात आली आहे.
हत्तीग्राम झाल्यानंतर गोवा आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांचेसुद्धा हे आकर्षण उरून पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकते. सर्व बाजूनी या विषयाचा अभ्यास करून उपाययोजनेसंदर्भात आराखडा करण्यासाठीच ही बैठक महत्वाची असल्याने आपण तातडीने आठवडाभरात या बैठकीचे आयोजन करावे असेही याबाबत खात्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे , आजरा तालुका प्रमुख श्री. युवराज पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शारदीय नवरात्र मंडळ उत्तुरच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

उत्तूर : मृत्युंजय महादेव वृत्तसेवा
शारदीय नवरात्र मंडळ, उत्तूर या मंडळाच्या सन २०२५-२६ या वर्षाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून विनोद अजित लकांबळे, उपाध्यक्ष शशांक शिवाजी येजरे, सचिव उत्तम परशराम गिरी, खजिनदार किरण सदाशिव मुळीक, बातमीदार मुकुंद विठ्ठल सुतार यांची निवड झाली आहे.
या बैठकीत सर्व सदस्यांनी पारंपारिक उपक्रम यंदाही उत्साहात राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

वाटंगी येथील बबन कांबळे सेट परीक्षा उत्तीर्ण

शिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी या.आजरा येथील बबन सोनबा कांबळे सेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांचे घाळी कॉलेज गडहिंग्लज येथे एम. ए. अर्थशास्त्र मधून शिक्षण झाले आहे. अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेले बबन कांबळे यांच्या यशाने परिसरातून कौतुक होत आहे.

आजचा वाढदिवस...


आज आजऱ्यात…
ह.भ.प.लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज सप्ताहा निमित्त दुपारी बारा वाजता शिवाजीनगर विठ्ठल मंदिर येथे महाप्रसाद…
वेळ दुपारी १२ ते ३



