शुक्रवार दि. ५ सप्टेंबर २०२५

गर्दीचा फायदा घेत महिलेची पाटली लंपास…
एक लाख साठ हजारांचा फटका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रवासाच्या निमित्याने आजरा बस स्थानकावर गेलेल्या कांचन धोंडीराम चव्हाण ( वय ७५ वर्षे रा. आझाद कॉलनी आजरा ) या वृद्धीच्या हातातील दोन तोळे सोन्याची पाटली अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
याबाबतची फिर्याद कांचन चव्हाण आजरा यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

वाघाच्या हल्ल्यात रेडा ठार
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली पैकी हरपवडे धनगरवाड्यावर वाघाने केलेल्या हल्यात रेडा ठार झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. शेतकरी अंकुश झोरे यांचा तो रेडा आहे. यामुळे पशुपालकांच्यात भितीचे वातावरण आहे.
पेरणोली पासून अडीच किलोमीटर अंतरावर धनगरवाडा आहे. या धनगरवाड्यावर धनगरबांधवांची वीस घरे आहेत. हे सर्वच पशुपालक आहे. श्री. झोरे यांनी नेहमीप्रमाणे जनावरे शेतात सोडली होती. जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. यामधे रेडा ठार झाला आहे. वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. वनविभागाकडून सदरच्या प्राण्याच्या पायाचे ठसे मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण पावसामुळे ते मिळालेले नाहीत. वनविभागाकडून तो प्राणी बिबट्या असल्याचे सांगण्यात येते. तर स्थानिक नागरीक तो पट्टेरी वाघ असल्याचे सांगतात.
धनगर वाड्यावरील चार जनावरे ठार
दीड महीन्यापूर्वी हरपवड़े धनगरवाड्यावर वाघाच्या हल्यात चार जनावरे ठार झाली. हल्ल्याची पद्धत पाहता हा पट्टेरी वाघच असल्याचे सांगितले जात आहे.

आजऱ्यात ठाकरे शिवसेनेच्या वतीने तबला, मृदंग वादन स्पर्धा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शिवसेना (उबाठा )व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात भव्य तबला व मृदंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर डी जे किंवा इतर कार्यक्रमापेक्षा मृदंग तबला वादन सारखे पारंपरिक कार्यक्रम आयोजित करणे ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे.
आजरा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, अभिषेक शिंपी तसेच भाजपा उपजिल्हाप्रमुख सुधीर कुंभार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
लहान गटात प्रथम क्रमांक- ऋत्विक पाटील, द्वितीय क्रमांक- आशितोष लोहार, तृतीय क्रमांक- वर्धन वाशीकर, चतुर्थ क्रमांक- आदित्य निवरेकर, पाचवा क्रमांक- करण धनवडे.
मोठ्या गटात प्रथम क्रमांक -करण कवठणकर, द्वितीय क्रमांक- उत्तम येडगे, तृतीय क्रमांक -धीरज पाताडे, चतुर्थ क्रमांक -निवृत्ती गजरे, पाचवा क्रमांक -अनिकेत मिटके यांनी पटकवला. यावेळी विजेत्यांना पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, राजू पोतनीस, युवराज पोवार, संजूभाई सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. पर्यवेक्षक म्हणून सोहम सुतार (हिरलगे)यांनी जबाबदारी पार पाडली तर संदीप कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद भोपळे यांनी केले.
यावेळी आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, सुधीरभाऊ देसाई, संभाजी पाटील, अनिकेत चराटी, किरण कांबळे, सौ. अस्मिता जाधव, सौ. दर्शना दयानंद भोपळे, सौ. दीपाली कवठणकर, प्रभाकर कोरवी, संजयभाऊ सावंत, जी. एम. पाटील, अमित गुरव, समीर चांद, ओंकार मद्याळकर,दिनेश कांबळे (पेरणोली), नारायण कांबळे, दत्तात्रय धडाम, सुरेश पाटील, विवेक घोडके, आदिसह तबला- मृदंगप्रेमी उपस्थित होते.

माकडांच्या उपद्रवाने उत्तूरवासीय त्रस्त
बंदोबस्त करण्याची मागणी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता आजरा येथे माकडांच्या कळपाने थैमान घातले आहे . माकडांचा कळप घरावरील खापऱ्यांचे, फळ झाडांचे मोठे नुकसान करीत असून या माकडांच्या कळपांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे .
माकडांचा कळप आपल्या पिल्लांसह तळेगल्ली , पागारगल्ली , इंदिरानगर आदी परिसरात ही माकडे फिरत आहेत . पाऊस सुरू असल्याने घरावरील खापऱ्या भिजल्या आहेत त्यामुळे माकडांनी उड्या मारल्यानंतर खापऱ्या फुटून घरात गळती सुरु झाली आहे .
माकडे घरावरील सोलर , खिडक्या यांना फोडत आहेत . दारात उभ्या असलेल्या मोटरसायकली उड्या मारून मोटरसायकलींचे नुकसान सुरू आहे . माकडांचा उपद्रव मोठा असून या माकडांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे .माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने वनविभागाशी संपर्क साधून पुढाकार घ्यावा अशी मागणीही ग्रामस्थ करीत आहेत.

चितळे उपसरपंच पदी मारुती गुरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रुप ग्रामपंचायत चितळेच्या उपसरपंच पदी मारुती गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे. उदय सरदेसाई यांनी दिल्यामुळे उपसरपंच रिक्त झाले होते. ग्रामपंचायत सरपंच सौ. रत्नप्रभा भूतुरले यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित राणे, संगीता येडगे, माया गुडूळकर, सुष्मिता पवार, मारुती चव्हाण, संजय सांबरेकर, संजय तर्डेकर, आनंदा भूतुर्ले, दिगंबर सरदेसाई, जयवंत सुपल, प्रकाशराव सरदेसाई, दत्तू सुतार, एकनाथ पवार, पुंडलिक सुतार, सहदेव सांबरेकर, धोंडीबा मळेकर, पुंडलिक बंडू सुतार नामदेव दोरुगडे, विश्राम घुरे, सुभाष गोरे, गोविंद गोरे, शामराव घुरे, नामदेव घुरे, संतोष ढोणुक्षे, धोंडीबा सांबरेकर यांच्यासह चितळे ,- जेऊर भावेवाडी धनगरवाडा ग्रामस्थ उपस्थित होते.
भादवण येथील सत्यम मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथील सत्यम कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.लोकनियुक्त सरपंच सौ माधुरी रणजित गाडे यांच्या हस्ते गणेश देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.माजी शिक्षणाधिकारी श्री आनंदराव जोशीलकर ,सेवा सोसायटी माजी चेअरमन श्री मारुती ईश्वर देसाई गुरुजी, श्रमिक महिला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू मुळिक गुरुजी, मार्गदर्शक श्री शांताराम माने व केदारलिंग दूध संस्था चेअरमन श्री रघुनाथ पोवार हे उपस्थित होते.
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री. उमेश साहेब व सौ. वैशाली आपटे, माजी सरपंच उत्तूर यांचा सत्कार करण्यात आला .
अध्यक्ष प्राचार्य रणजित गाडे यांनी मंडळाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला .यावेळी श्री उमेश आपटे यांनी भादवणच्या प्रत्येक नागरिकाच्या तसेच मंडळाच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.
विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या तसेच विविध पदांच्या वर निवड झालेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले .
कार्यक्रमासाठी केदारलिंग दूध संस्थेच्या व्हा . चेअरमन सौ. सुधा जयसिंग गोडसे ,संचालक श्री. बाबुराव दाभोळे ,श्री. बाळासाहेब सुतार ,श्री. सुरेश कांबळे ,सौ. आक्काताई पाटील ,सेवा सोसायटी माजी व्हा चेअरमन श्री दशरथ डोंगरे, संचालिका रत्नाबाई केसरकर, ऑल इंडिया कबड्डी पंच श्री प्रकाश मुळीक ,श्री विजय माने ,श्री शंकर कांबळे याचबरोबर मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला सदस्य ,युवक युवती व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

छायावृत्त…

भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आजरा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ग्रामीण रुग्णालय आजरा यांचे मार्फत आरोग्याचा श्री गणेशा या कार्यक्रमांतर्गत सर्व रोग तपासणी शिबिर, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, डोळे तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.
निधन वार्ता
गणेश निऊंगरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडीलगे तालुका आजरा येथील गणेश श्रीकांत निऊंगरे ( वय ३२ वर्षे ) यांचे गुरुवारी निधन झाले
त्यांच्या पश्चात आई , एक भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.

गणेश दर्शन…
अष्टविनायक मित्र मंडळ किणे, ता. आजरा

अध्यक्ष – नंदकुमार पाटील
उपाध्यक्ष – साहिल केसरकर
सेक्रेटरी – किशोर नांदवडेकर
खजिनदार – दिगंबर घोळसे
प्रमुख मार्गदर्शक : एकनाथ बामणे
मोरया ग्रुप, भादवण

अध्यक्ष : राहुल कांबळे उपाध्यक्ष : निलेश कांबळे
खजिनदार : श्रीधर कांबळे
सचिव : अजित कांबळे
केदारनाथ कला क्रीडा व सांस्कृतीक मंडळ,भादवण

अध्यक्ष – राहुल देसाई
उपाध्यक्ष – सुशांत पाटील
सेक्रेटरी – अजित पाटील
खजिनदार – श्रीधर वांगणेकर
विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होनेवाडी

अध्यक्ष : शिवाजीराव बेळगुळकर
उपाध्यक्ष : अशोक आजगेकर
खजिनदार : संदीप पाटील.

आज तालुक्यात…
होनेवाडी येथील विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व प्राथमिक केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने होनेवाडी येथे आरोग्य शिबिर…
वेळ -सकाळी दहा वाजल्यापासून

आज शहरात…
♦ शिवसेना प्रणित जय शिवराय गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसाद
वेळ – दुपारी १२ ते ४



