mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५

कोरीवडे लोकनियुक्त सरपंचावर  अविश्वासच…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कोरीवडेचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी गणपती पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. ठरावाच्या बाजूने २९८ मते पडली तर विरोधात १५२ मते पडली. याबाबत विशेष सभा झाली. विशेष सभेत ४६४ मते नोंद झाली होती. ४६२ मतदान झाले. दोन अनुपस्थित राहीले. १२ मते अवैध ठरली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

       अध्यासी अधिकारी म्हणून आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी काम पाहीले. आज सकाळी विद्यामंदिर कोरीवडेच्या प्रांगणामध्ये पहिल्या टप्प्यात सकाळी ८ ते ११ विशेष सभा झाली. ४६४ ग्रामस्थ मतदारांनी नोंद केली होती. सकाळी ११ नंतर मतदानाला सुरुवात झाली. ४ वाजता मतदान प्रक्रिया संपली. मतमोजणीनंतर निकाल घोषीत करण्यात आला.

      यापूर्वी सरपंच उपसरपंचाच्या ठरावाबाबत गुप्त मतदान झाले होते. यामध्ये सरपंचाच्या विरोधात ६ मते पडल्याने ठराव समत झाला होता. उपसरपंचाच्या विरोधातील ठराव बारगळला होता. आज सरपंच अविश्वास ठराबाबत विशेष सभा पार पडली. यामध्ये ठरावाच्या बाजूने जनमत
राहीले . १२ मते अवैध ठरली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

आजरा साखर कारखान्याची आज उपाध्यक्ष निवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याची उपाध्यक्ष निवड आज बुधवार दिनांक १२ रोजी विशेष सभेद्वारे होणार आहे.

      उपाध्यक्ष एम. के. देसाई यांनी आपल्या पदाचा कालावधी पूर्ण होताच राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या जागेसाठी सदर निवड होणार आहे. नूतन उपाध्यक्ष म्हणून शिरसंगी चे संचालक सुभाष देसाई यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते.

अखेर दिवे लावले…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गेले वर्षभर दिवसा शहराची शोभा वाढवणारे व रात्री गरजेच्या वेळी बंद अवस्थेत असणारे संकेश्वर – बांदा महामार्गवरील पथदिवे अखेर काल मंगळवारी सुरू करण्यात आले आहेत.

      संबंधितांनी ‘ दिवे ‘ लावण्याचे काम केले असले तरी हे दिवे नियमित व कायमस्वरूपी सुरू राहावेत अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करत आहेत.

रिक्षा स्टॉप संदर्भात तहसीलदारांना निवेदन

शुक्रवारी बैठक


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     बस स्थानक परिसरातील रिक्षा स्टॉपच्या संदर्भात अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

      शुक्रवार दि.१४ रोजी संबंधित अधिकाऱ्यांची सामुदायिक बैठक लावण्याचे ठरले.त्यामध्ये हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे इंजिनियर ,नगरपंचायत मुख्याधिकारी, वीज वितरण चे अधिकारी अधिकारी या सर्वांच्या बरोबर अन्याय निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यां सोबत सदर बैठक होणार आहे.

      यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांच्यासह सदस्य, रिक्षा युनियनचे अध्यक्ष रवी तेंडुलकर, उपाध्यक्ष समीर चौगले, इरफान शेख, पुंडलिक कोले,नामदेव घेवडे,राहुल सुतार,तनवीर मकानदार ,अजित नाईक,समीर तळगुळे, राजेंद्र चंदनवाले उपस्थित होते.

बाळासाहेब देसाई यांची कोल्हापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा येथील वसंतराव देसाई सहकारी साखर कारखान्यातील कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष बाळासो देसाई यांची कोल्हापूर जिल्हा साखर कामगार समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे .

       याबाबतच्या निवडीचे पत्र संघटनेकडून देण्यात आले आहे. साखर कामगार संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे साखर कामगार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

होनेवाडी विद्यामंदिरला पाणी फिल्टर व टाकी भेट

           आजरा : मृत्युंजय महान वृत्तसेवा

      विद्या मंदिर होनेवाडी शाळेला डॉ. शामराव कातकर ,चंद्रकांत कातकर, श्रीकांत कातकर,अरविंद पाटील, संतोष पाटील, सचिन पाटील, धोंडीबा सासुलकर यांनी मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे फिल्टर व पाण्याची टाकी भेट दिली.

      यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य, गावच्या सरपंच प्रियांका आजगेकर, अध्यक्ष अनिल पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थीत होते.

थोडे हटके…
शिक्षण व्यवस्थेच्या डोक्यात नारळ फुटला…


                 ज्योतिप्रसाद सावंत

        काल बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. आजरा  येथील एका विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी नारळ फोडत देवाला गा-हाणे घालून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. हा प्रकार म्हणजे विज्ञानाची कास धरून २१ व्या शतकाची वाटचाल सुरू आहे असा डांगोरा पिटणाऱ्या राज्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या डोक्यावरच हा नारळ फुटला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

       आज नारळ फुटला आहे उद्या कदाचित एखादी बकरे, कोंबडेही परीक्षा केंद्रासमोर कापले गेल्यास आश्चर्य वाटू नये…

आज शहरात…

      चर्मकार समाज, आजरा च्या वतीने श्री संत रोहिदास जयंती निमित्त सकाळी ११ वाजता फोटो पूजन व त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कोरीवडे सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र… आजऱ्यात ना. सतेज पाटील समर्थकांचा जल्‍लोष यासह आजरा स्थानिक बातम्या

mrityunjay mahanews

आजरा सूतगिरणी वार्षिक सर्वसाधारण सभा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

Admin

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!