mrityunjaymahanews
अन्य

हत्तीचा धुमाकूळ… ट्रॅक्टर सह बैलगाडी केली पलटी

गुरुवार दि.६ फेब्रुवारी २०२५

वाटंगीत हत्तीचा धुडगूस…
ट्रॅक्टरसह, बैलगाडी पाण्याच्या टाकीचे नुकसान…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वाटंगी तालुका आजरा येथे गुरुवारी पहाटे हत्तीने धुमाकूळ घालत विष्णू गिलबिले यांच्या शेतातील ट्रॅक्टरसह बैलगाडी, पाण्याची टाकी, काजू व नारळाची झाडे यांचे प्रचंड नुकसान केले आहे.

        पूर्व भागात हत्तीचा धुमाकूळ सुरूच असून हत्तीने पेद्रेवाडी, हाजगोळी, यमेकोंड,मलिग्रे परिसरामध्ये नुकसान सत्र आरंभले आहे. गुरुवारी पहाटे तर हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला.

       या सर्व प्रकारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. वनविभागाकडून हत्ती हटवण्याची मोहीम राबवली जात असली तरी यामध्ये फारसे यश येत नसल्याने गेले तीन ते चार महिने पूर्व भागात हत्ती तळ ठोकून आहे.

      हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार तरी कधी ? असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक : आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात रविवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची माहिती

mrityunjay mahanews
error: Content is protected !!