mrityunjaymahanews
अन्य

सुपडा साफ…

आमदार प्रकाश आबिटकर यांची हॅटट्रिक…

लाडक्या बहिणी व तरुणाईने दिले बळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी हॅटट्रिक साधून राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात इतिहास रचला आहे. लाडक्या बहिणींसह विकासकामे व तरुणाईचे असणारे बळ या जोरावर त्यांनी घसघशीत मताधिक्य मिळवल्याने विरोधी आघाडीच्या दृष्टीने हा विजय धक्कादायक समजला जातो.

        आबिटकर यांना पराभूत करण्यासाठी मोठी यंत्रणा सक्रिय झाली होती. दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या होम ग्राउंड वर जाहीर सभा घेत आबिटकर यांना पराभूत करण्याचे आवाहन केले होते. शिवसेना, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासह राष्ट्रीय काँग्रेसच्या नेते मंडळींनी आबिटकर यांना पराभूत करण्याचा चंग बांधला होता. प्रत्यक्षात मात्र मतदारांनी या सर्वांचे आदेश धाब्यावर ठेवत भरभरून मतदान केल्याने आबिटकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे.

       राधानगरी विभागातून आबिटकर बॅकफूटवर जाणार असा कयास बांधला जात असतानाच आबिटकर यांनी या तालुक्यात घसघशित मताधिक्य मिळवल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. हा कल असाच पुढे चालू राहील असे दिसते.

मंत्रीपदाच्या शर्यतीत…

      यापूर्वी या मतदारसंघात झालेल्या जाहीर कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबिटकर यांना तुम्ही आमदार करा मी नामदार करतो असे वचन दिले होते मतदारसंघ वासीयांनी आबिटकर यांना आमदार केले आहे आता मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना मंत्री करावे अशी अपेक्षा मतदारांतून व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात मधमाशांच्या हल्ल्यात 50 वर जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेपत्ता शेतकऱ्याचे प्रेत विहिरीत आढळले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!