शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४

नानासाहेब उर्फ बंटी देसाई यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा सहकारी साखर कारखाना व भूविकास बँकेचे माजी संचालक नानासाहेब गणपतराव उर्फ बंटी देसाई (वय ७४ वर्षे ) यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, मुलगी ,सून ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. अण्णाभाऊ सूतगिरणीचे संचालक डॉ. इंद्रजीत देसाई यांचे ते वडील होत.
रविवारी सकाळी आजरा येथे सकाळी आठ वाजता आजरा येथे मृतदेह आणण्यात येणार असून मृतदेहावर सकाळी अकरा वाजता पेठेवाडी/पारेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आमदाराबरोबर नामदारही व्हा…
अण्णाभाऊ समूहाचा आम. प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अशोक अण्णा चराटी यांनी आम. प्रकाश आबिटकर यांना कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राधानगरी विधानसभा मतदारसंघात अण्णाभाऊ संस्था समूहाचा पाठिंबा जाहीर केल्याने चराटी यांच्या गटाचे नाराजी नाट्य संपुष्टात आले आहे. केवळ आमदार नव्हे तर नामदारही व्हा… अशा शुभेच्छाही चराटी यांनी प्रकाश आबिटकर यांना दिल्या.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी चराटी गटाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्यात येईल असे सांगितले तर अशोक चराटी यांनी आबिटकर यांची आमदारकीची हॅटट्रिक पूर्ण होणार असून आगामी काळात ते नामदार होतील असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक करताना जनता शिक्षण संस्था संचालक विजयकुमार पाटील म्हणाले, गेली दहा वर्ष अशोक चराटी ताकतीने आमदार आबिटकरांसोबत आहेत. येत्या निवडणुकीमध्ये चराटी गटाच्या माध्यमातून आमदार आबिटकर यांना आजरा जिल्हा परिषद मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळेल.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, नेहमीच अशोकअण्णा चराटी यांची स्पष्टपणे भूमिका असते. चराटी यांची स्पष्ट भूमिका सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी असते. सध्या काही प्रमाणात मतभेद झाले, पण मनभेद झाले नाहीत. त्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील उच्चांकी मताधिक्याची परंपरा कायम राहणार आहे. राज्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. गेल्या सहा महिन्यात लोकहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना ही ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. बुद्धिभेद व मनभेद करण्याचे काम विरोधक करत आहेत हे सगळे मोडून काढण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाचे मन जपण्याचे काम करून प्रत्येक माणसाला आपल्याबरोबर घेऊन काम करूया असे त्यांनी सांगितले.
चराटी म्हणाले,मतदार संघामध्ये चराटी गटाची निर्णायक ताकद असल्यामुळे चराटी गटाला सोबत घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण आमदार आबिटकर हे नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करत असल्यामुळे तसेच युतीधर्म म्हणून महायुती बरोबर राहणार आहे. आमदार आबिटकर यांनी आजरा शहरासाठी भरघोस निधी दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येऊन आमदार आबिटकर हे मंत्री व्हावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
आजरा बँकेचे संचालक विलास नाईक म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मध्ये काही मतभेद होते, पण ते आता दूर झाले आहेत. आजरा जिल्हा परिषद मतदार संघात अण्णा गट व आमदार गट वेगळा नाही. आगामी काळात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व कार्यकर्त्यांचा मान राखून आमदार आबिटकर यांनी काम करावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर,दिनेश कुरूणकर, भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जनार्दन टोपले, गोविंद गुरव, जी. एम. पाटील, दशरथ अमृते, राजू पोतनीस, सरपंच धनंजय पाटील, रणजीत सरदेसाई, लहू वाकर, डॉ. संदीप देशपांडे, समीर पारदे, पांडुरंग लोंढे, योगेश पाटील, समीर चांद,दिलावर चांद,असिफ पटेल, मकसूद लमतुरे, एम.डी. दरवाजकर, यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.

झाले गेले विसरून जाऊ… मंत्री मुश्रीफ अशोकअण्णा एकत्र

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेऊन मंत्री मुश्रीफ यांच्यापासून दूर गेल्यानंतर आलेल्या अडचणी जाहीररित्या कबूल करत गेल्या आठ वर्षांमध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेल्या बऱ्या -वाईट गोष्टी विसरून जाऊन कागल विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले.
स्वागत व प्रास्ताविक के. व्ही. येसणे यांनी केले.प्रास्ताविकपर भाषणात आजरा बँकेचे संचालक विलास नाईक म्हणाले, मागील चुका टाळून भविष्यात एकत्र काम करणार आहोत. चराटी गटाच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. भाजपाचे तालुका सरचिटणीस अतिशकुमार देसाई म्हणाले, अशोक अण्णा चराटी यांचा सगळ्यांनाच पाठिंबा हवा आहे, पण अशोक अण्णांना सन्मान देण्याचीही गरज आहे. आगामी काळात विधानपरिषद किंवा महामंडळावर त्यांना संधी देण्यात यावी. प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करण्याची गरज आहे.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अशोक चराटी यांच्या पाठीब्यांमुळे एका राजकीय ऐतिहासिक अशा वळणावर दहा हत्तीचे बळ मिळाल्याचे सांगितले. चराटी यांच्या कार्यकर्त्यांचा अपमान अथवा अवहेलना कदापिही होणार नाही असा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला.
अशोकअण्णा चराटी म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात होतो पण कामाच्या बाबतीत मंत्री मुश्रीफ यांच्यासारखा नेता होणे नाही हे आपण वेळोवेळी मान्य केले आहे. मंत्री मुश्रीफ हे सहाव्या वेळी उच्चांकी मताने निवडून येणार आहेत .
यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, विजयकुमार पाटील, जी. एम. पाटील, दशरथ अमृते, राजू पोतनीस,सचिन पावले, अनिकेत कवळेकर, प्रकाश कोंडुसकर, संदीप पाटील, सौरभ नाईक, सिद्धेश नाईक, शामराव चौगुले यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.

‘जनता सहकारी गृहतारण’ कडून सभासदांना ११ % लाभांश आणि कर्मचा-यांना १६.६६% टक्के दिवाळी बोनस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता सहकारी गृहतारण संस्थेने अत्यंत खडतर परिस्थितीतून बाटचाल करत कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच संस्थेने ८७.५४ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. मागील आर्थिक वर्षाकरीता संस्थेकडून ११ लाभांश प्रदान करण्याबाबत संचालक मंडळाकडून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सभासदांच्या खात्यावर ही लाभांश रक्कम जमा करण्यात आली आहे.
संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचा-यांचे योगदान लक्षात घेऊन संस्थेकडून (१६.६६%) म्हणजेच दोन पगार इतका दिवाळी बोनस, इंज्युएटी, विमा संरक्षण, ड्रेसकोड आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्था चेअरमन मारूती मोरे, संचालक डॉ अशोक बाचूळकर, डॉ. तानाजी कावळे, प्रा. विनायक चव्हाण, जनरल मॅनेजर मधुकर खवरे व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पावेळी बोलताना मारूती मोरे यानी सांगितले की जनता सहकारी संस्था फक्त घरकुलं उभी करत नाही, तर माणसं उभी करते, घराला घरपण देते. त्यामुळे माणसं जोडणारी संस्था म्हणून संस्था ओळखली जाते. कार्यक्षम आणि घरपोच सेवा हा संस्थेचा वसा आहे. सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्याशी जिव्हाळ्याचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं जपत संस्थेने सत्याऐंशी कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे.
दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर संस्थेकडून ठेवीवर आकर्षक व्याजदर दिले जाणार आहे. ५६ कोटी हुन अधिक कर्जवितरीत केले आहे. सन २००८ नंतर सभासदांच्या मागणीनुसार संस्थेने आपला विस्तार महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र झालेला आह. घर किंवा फ्लॅट खरेदी, घरबांधणी, वाढीव बांधकाम, घरदुरुस्तीकरीता एक कोटीपर्यत २० वर्ष मुदतीकरीता सुलभ व्याज दराने संस्था कर्ज पुरवठा करत आहे. शिवाय प्लॉट खरेदीसाठी वीस वर्ष मुदतीचे पंच्याहत्तर लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गृहकर्जाच्या हप्त्यांना (मुद्दल व व्याज) आयकर सवलत आहे. याचा फायदा कर्जदारांना होतो. शिवाय कमीत कमी वेळेत आवश्यक कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी या दिवाळीच्या मुहुर्तावर जनता सहकारी गृहतारण संस्थेकडून गृहकर्ज घेऊन आपले घरकुलाचे स्वान साकार करावे.
पारदर्शी आणि स्वच्छ कारभार, काटेकोर नियोजन, व्यवस्थापन मंडळाचे काटकसरीचे धोरण, दूरदृष्टी आणि अधिकारी व कर्मचारी वर्गाची कार्यतत्परता यामुळे दिवसे दिवस संस्थेची भरभराट होत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून आरंभीपासूनच संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.

महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करावे…
अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या चार वर्षापासून आज-यातील शिवाजी महाराज पुतळा विविध कारणांनी चर्चेत आहे. या बाबत आज रहिवाशी अन्यायनिवारण समितीमार्फत दिनांक २६/०६/२०२४ रोजी विधानसभा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करावे असे सूचित केले होते. त्याम अनुसरून पुतळा उभारणी समितीने पत्रकार परिषद घेऊन अनावरण लवकर करायचे जाहीर केले होते.
विविध संस्थांनी व्यक्तीनी, लोकप्रतिनिधींनी भरघोस निधी दिलेला हा पूर्णाकृती पुतळा सध्या अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. दोन महिन्यापूर्वी अनवरणच्या हालचाली सुरू असताना विविध कारणे पुढे करून अनावरण प्रक्रियेला खो घालण्यात आला. अनावरणमाठी कोणाला आणायचे? त्याचे श्रेय कोणी घ्यायचे ? या राजकीय वादात पुतळ्याचे अनावरण लांबले आहे.
आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती तर्फे छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संबंधित मंडळींनी पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी केली आहे. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकावर समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे,वाय.बी. चव्हाण,पांडुरंग सावरतकर, नाथ देसाई,बंडोपंत चव्हाण, जोतीबा आजगेकर,दिनकर जाधव
गौरव देशपांडे, राजु विभूते आदींच्या सह्या आहेत.


महायुतीकडून महाविकास आघाडीची हवाई कोंडी ! सर्व हेलिकॉप्टर बुक , तासाचं भाडं किती?

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रचाराचा आता धुरळा उडणार आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आता प्रचारासाठी संपुर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. त्यासाठी रस्ते मार्गाचा वापर होतोच. पण प्रचारासाठी नेते मंडळींची पहील पसंती असते ती हेलिकॉप्टची. त्यामुळे वेगवान प्रवास तर होतो पण जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचताही येते. हे लक्षात घेता हेलिकॉप्टरची आगाऊ बुकींग केली जाते. त्यात महायुतीने बाजी मारली आहे. राज्यात उपलब्ध असलेली सर्व हेलिकॉप्टर महायुतीने बुक केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची हवाई कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याआधीच महायुतीने महाविकास आघाडीची हवाई कोंडी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण लोकसभेचा निकाल लागताच भाजपने विधानसभेच्या प्रचारासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरकरिता राज्यात उपलब्ध सर्व 25 हेलिकॉप्टर बुक केल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी जे पैसे मोजले आहेत ते पाहून तुमचे ही डोळे फिरू शकता. हेलिकॉप्टरमध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे ट्विन इंजिन आणि दुसरा म्हणजे सिंगल इंजिन. या दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टरचे भाडेही वेगवेगळे आहे. हे भाडे प्रतितास या प्रमाणे आकारले जाते.
ट्विन इंजिन या प्रकारच्या हेलिकॉप्टरला अधिक मागणी असते. या हेलिकॉप्टरमध्ये 2 पायलट असतात. शिवाय इंजिनिअर ही त्यांच्या बरोबर असतात. या हेलिकॉप्टरची आसन क्षमता ही जास्त असते. यात जवळपास 10 ते 12 जण बसून शकतात. या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित आणि जलद प्रवास करता येतो. संकट प्रसंगी हे हेलिकॉप्टर एका इंजिनवरही काम करते. या हेलिकॉप्टरसाठी तासाला साडे चार ते पाच लाख रूपये मोजावे लागतात.
हेलिकॉप्टरमधला दुसरा प्रकार हा सिंगल इंजिन हेलिकॉप्टर हा आहे. यात 2 पायलट असतात. त्यांच्या मदतीला इंजिनिअर ही असतो. यात एकूण 4 ते 5 जण बसू शकतात. तुलनेने हे लहान हेलिकॉप्टर असते. हे हेलिकॉप्टर थोड्या कमी वेगात जाते. या हेलिकॉप्टरसाठी तासाला तीन ते साडेतीन लाख रूपये मोजावे लागता. राज्यात जी हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. ती सर्व आता महायुतीने बुक केल्याचे समोर येत आहे. त्यासाठी अडव्हान्स पेमेंटही देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या हवाई वाहतूकीत अडथळा येण्याची शक्ता नाकारता येत नाही. त्यामुळे मविआची हवाई कोंडी झाली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रचाराची रणधुमाळी आता उडणार आहे. त्याच वेळी हेलिकॉप्टर बुक झाली आहेत. याची कल्पना महाविकास आघाडाच्या नेत्यांना होती. त्यामुळे त्यांनीही त्यावर उपाय शोधून काढला आहे. मविआच्या नेत्यांना प्रचारासाठी राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातहून हेलिकॉप्टर मागवण्यात आली आहेत. त्यांचे बुकींगही करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन प्रचारात निवडणुकीतील हवाई कोंडी टाळण्यासाठी विरोधकांनीही तयारी केल्याचे आता समोर आले आहे.
(viral news…online news)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



