mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


होनेवाडी येथील एक जण मृतावस्थेत आढळला

.         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      होनेवाडी, ता. आजरा राजाराम यशवंत आजमेकर (वय ५६ वर्षे ) यांचा मृतदेह रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान होनेवाडी येथील पाणी नसलेल्या ओढ्याच्या पात्रात आढळून आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

     राजाराम हे दारुचे व्यसनाधिन होते. भाऊ अशोक आजगेकर यांच्यासोबत शनिवारी शेतामध्ये खत टाकून झाल्यानंतर परत जाताना रात्री त्यांची गाडी चालू न झालेने   अशोक यांनी राजाराम  यांना आपण दोघे आपल्या घरी जावू असे म्हणाले असता राजाराम यांनी भावाचे काही न ऐकता ते तसेच पुढे निघून गेले. त्यावेळी त्यांचा शोध घतला असता ते मिळून आले नाहीत.

त्यांनतर रविवारी त्यांचा परत शोध घेत असताना ते मृतावस्थेत शेतजमीन गट नंबर ३५२ ला लागून असले पाणी नसलेल्या ओढ्याकाठी मिळून आले. अशोक यशवंत अजगेकर यांनी याबाबत वर्दी दिली आहे .

वाटंगीत गव्यांच्या कळपाकडून धूडघूस

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वाटंगी (ता. आजरा) येथे गव्यांच्या कळपाने धुडघूस घातला आहे. अंजना कसलकर व सुरेश मटकर यांची दोन एकरातील ऊस पिक फस्त केले आहे. हुडे, चाफवडे जंगलातून गव्यांचा कळप सायंकाळी शेतात उतरतो. शेतकऱ्यांनी गव्यांना रोखण्यासाठी विविध उपाय योजले तरी देखील गव्यांकडून होणारे नुकसान बघून शेतकरी हवालदिल झाला आहे.

      गव्यांच्या कळपाने वाटंगीबरोबर सिरसंगी, हुडा, मोरेवाडी परिसरातही गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला आहे. या कळपात पंचवीस ते तीस गवे असल्याचे शेतकरी सांगतात. गव्याच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ऐन सणासुदीत पाण्याचा शिमगा…
शहरवासीयांकडून संताप

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      निम्म्या आजरा शहराला पाडवा व रमजान ईद ची धामधूम सुरू असतानाच तब्बल चार दिवस पाणीपुरवठा झाला नसल्याने शहरवासीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेली दोन वर्षे नगरपंचायतीकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सातत्याने पाणीपुरवठा योजनेला लागणारी गळती याला कारणीभूत ठरत आहे. गेले चार ते पाच दिवस शहरवासीयांना पाणी नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागानेही या रस्त्याचे काम पूर्ण होईल तसे नगरपंचायतीकडे बोट दाखवून या पुढची जबाबदारी नगरपंचायतीवर ढकलली आहे. नगरपंचायत प्रशासनाचे मात्र संथ गतीने काम सुरू असल्याने शहरवासीयांचा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. नदीमध्ये पाणी असतानाही केवळ नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे शहरवासीयांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

मोबाईल बंद…

     एकीकडे पाणीपुरवठा नसल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत तर नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बहुतांश कर्मचारी हे मोबाईल बंद ठेवत असल्याने शहरवासीयांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आजऱ्यात आज रंपंमी

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहर व परिसरात प्रथेप्रमाणे आज सोमवार दिनांक ८ एप्रिल रोजी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे.

      रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर दुपारपासून मुख्य बाजारपेठ बंद राहणार आहे. सध्या लोकसभा निवडणुका सुरू असून रंगपंचमी कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता तरुणांनी घ्यावी असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भाकरी फिरणार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गॅस सिलेंडरच्या आगीतील जखमीचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!