mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


योगेश पाटील याला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी


                         आजरा:प्रतिनिधी

          भादवण येथील आशाताई खुळे या ४३ वर्षीय महिलेचा शरीर सुखास नकार दिल्याने गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जेथे ही घटना घडली त्या उसासह संबंधित महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न केलेल्या योगेश पांडुरंग पाटील यास पोलिसांनी गडहिंग्लज येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

         गुरुवारी सदर खूनाचा प्रकार घडला होता. पुढील तपास आजरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे करीत आहेत.


बंद घर फोडून चार सिलेंडर लंपास


                       आजरा:प्रतिनिधी

          रवळनाथ कॉलनी आजरा येथील सौ. सुनंदा सुबराव पाटील (वय ६०) यांच्या राहत्या घरातील चार गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

         पाटील या सध्या पुणे येथे राहत असून एप्रिल २०२३ मध्ये गावी आल्या होत्या. पुणे येथे जातान घराचे मागील दरवाजास कडी लावली होती व समोरील दरवाजास कुलूप लावले होते. दिनांक २९ रोजी त्या घरी परतल्या असताना घराचा कडी कोयंडा काढून अज्ञात चोरट्यांनी एच. पी. कंपनीचे गॅस सिलेंडरच्या ४ टाक्या लंपास केल्या.

       चोरीची वर्दी आजरा पोलिसात देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


प्रभू श्रीरामांच्या जयजयकाराने आजरा नगरी दुमदुमली


                   आजरा : प्रतिनिधी

       २२ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठापणा निमित्त आज ३० डिसेंबर,२०२३ रोजी आजऱ्यात व्यंकटराव हायस्कुल पासून राम मंदिरा पर्यंत भव्य कलश यात्रा पार पडली. यावेळी प्रभू श्रीरामांच्या जयजयकाराने आजरा नगरी दुमदुमून गेली. शहरात ठिकठिकाणी कलश रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

        या मंगल प्रसंगी आजरा शहरातील महिला, तरुण , वृध्द नागरिक तसेच ग्रामीण भागातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीत वारकरी दिंडी, कलश रथ ,हलगी, ध्वज, आतषबाजी असे आकर्षण होते.

       इथून पुढे हे अक्षता कलश प्रत्येक गावात दिले जातील आणि १ ते १५ जानेवारी पर्यंत त्या अक्षता घरोघरी रामभक्तांना पोहोच करावयाच्या आहेत.तसेच या अभियानाच्या निमित्ताने आजरा तालुक्यातील अनेक गावांत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.याचे आयोजन आजरा व आजरा तालुक्यातील सकल हिंदू समाज,आजरा तर्फे आयोजन करण्यात आले होते.


उद्या तालुक्यातील मोटार पंपधारक शेतकऱ्यांचा मेळावा


                     आजरा: प्रतिनिधी

        मागील आठवड्यात झालेल्या मोटार पंप धारक शेतकऱ्यांच्या बैठकीत मेळावा घेऊन इरिगेशन फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे सोमवारी रवळनाथ मंदिराच्या माडीवर मेळावा आयोजित केला आहे .

       सोमवार दि १ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता रवळनाथ मंदिर, आजरा येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला तालुक्यातील सर्व मोटरपम्प धारक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ संपत देसाई, अल्बर्ट डिसोझा, तानाजी देसाई, जोतिबा चाळके, संजय तरडेकर, संभाजीराव सावंत, बजरंग पाटील, आनंदराव कुंभार, उदय कोडक, प्रकाश मोरुस्कर, शंकर पाटील, दशरथ घुरे, नारायण भडांगे, यांनी केले आहे.


भाजपाच्या महिला तालुका अध्यक्षपदी वर्षा बागडी

                    आजरा : प्रतिनिधी

       भारतीय जनताच पक्षाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख पदी आजरा पंचायत समितीच्या माजी सभापती वर्षा विकास बागडी यांची निवड करण्यात आली आहे.

         भारतीय जनता पक्षाच्या महिला युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आजऱ्याच्या माजी नगराध्यक्षा जोत्स्ना अशोक चराटी व ग्रामीण जिल्हा महिला उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद माजी सदस्या सुनीता रमेश रेडेकर यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी माजी बालकल्याण सभापती मनीषा गुरव यांची सदस्यपदी, सुचेता गड्डी यांची चिटणीसपदी, संयोगिता बापट यांची सरचिटणीसपदी, शहर अध्यक्षपदी माधवी दयानंद पाचवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

      निवडीसाठी समरजित घाटगे, राहुल देसाई, अशोक चराटी, अनिरुद्ध केसरकर यांनी प्रयत्न केले.


छाया वृत्त :

        जनता सहकारी दूध संस्था मर्यादित उत्तूर येथे आजरा साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष वसंतराव धुरे, उपाध्यक्ष एम.के. देसाई, संचालक मुकुंदराव देसाई, मारुती घोरपडे ,राजेंद्र मुरकुटे यांनी निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचा कृतज्ञतापूर्वक  सत्कार केला.


    आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते व पुस्तक मित्र वृषाल हुक्केरी यांचा वाढदिवसानिमित्त जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


निधन वार्ता

आजरा येथील गोवा स्थित संजय सुधाकर ओऊळकर (वय ५४वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित बहीण असा परिवार आहे.


.

संबंधित पोस्ट

आजरा कारखाना बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण अटकेत… धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’.कार्यकारी संचालकासह पाचजण गजाआड

mrityunjay mahanews

काय आहे 5G नेटवर्क… सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती…

mrityunjay mahanews

स्वामी विवेकानंद पतसंस्था ही जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था : चंद्रकांत दादा पाटील…कोरीवडे येथे चोरी…आजरा तालुक्यात जोरदार पाऊस

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आता आमची सटकले… आमास्नी रागबी यायलाय…

mrityunjay mahanews

एरंडोळ येथे महिलेची आत्महत्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!