
भादवण येथे घरात घुसला बारा चाकी ट्रक
सकाळीच घडलेल्या या घटनेत एक मुलगी जखमी

गुगल मॅप वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पेद्रेवाडीच्या दिशेने जाणारा बारा चाकी ट्रक वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रमेश दशरथ खुळे रा. भादवण यांच्या घरात घुसल्याने घराचे तर मोठे नुकसान झाले आहेत परंतु एक शाळकरी मुलगीही जखमी झाली आहे.
या घटनेनंतर भादवण ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की , पेद्रेवाडीच्या दिशेने पोल्ट्रीखाद्य घेऊन जाणाऱ्या बारा चाकी आयशर चालकाने मार्ग समजण्याकरता गुगल मॅप चा वापर केला या मॅपच्या सहाय्याने तो जात असताना चुकून भादवण या गावात सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास शिरला याचवेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट खुळे यांच्या घरात घुसली. भरधाव असणारी गाडी घरात घुसल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरामध्ये असणारी एक शाळकरी मुलगीही जखमी झाली आहे. सुदैवाने घरातील इतर मंडळी शेतावर जनावरांचे दूध काढण्यासाठी गेली असल्याने बचावली या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले आहे.
आजरा महाविद्यालयाच्या सत्यजित व प्रणाली ची
‘ अश्वमेध ‘ साठी निवड

शिवाजी विद्यापीठ च्या आंतर विभाग मैदानी स्पर्धा रामराजे महाविद्यालय जत येथे पार पडल्या या स्पर्धा मध्ये आजरा महाविद्यालय चा खेळाडू सत्यजित पुजारी याने १२०० मिटर धावणे क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त केले त्याची औरंगाबाद येथे दिनांक ३ ते ७ डिसेंबर दरम्यान होण्याऱ्या अश्वमेध स्पर्धा साठी शिवाजी विदयापीठ संघात निवड झाली आहे.
तसेंच प्रणाली सासूलकर हिची औरंगाबाद येथे दिनांक ३ ते ७ डिसेंबर दरम्यान होण्याऱ्या अश्वमेध स्पर्धा साठी शिवाजी विदयापीठ महिला कबड्डी संघात निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, डॉ. दिपक सातोसकर, योगेश पाटील, दिनेश कुरुणकर, सुरेश डांग.प्राचार्य डॉ. अशोक सादले, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, डॉ. धनंजय पाटील , अल्बर्ट फर्नांडिस, प्राध्यापकवृंद, शिक्षककेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले .



