mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

आजरा येथील शिवाजीनगर घाट परिसरात हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

 

आजरा येथील शिवाजीनगर घाट परिसरात हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

 

आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज

आजरा येथील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या ह. भ. प. लक्ष्मणबुवामहाराज मोरजकर समाधी स्थळापासून वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीपात्रामध्ये ,५० ते ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आज नदीपात्रात पाण्यात तरंगताना आढळला. सदर मृतदेह पाहता अंदाजे ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा असून अंगावर पूर्ण कपडे असल्याने हा आत्महत्येचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक महिला धुणे धुण्यासाठी घाट परिसरातील हिरण्यकेशी नदीपात्रामध्ये उतरल्या असता त्यांना पाण्यामध्ये तरंगताना मृतदेह आढळला. त्यांनी गोंधळ घातल्यानंतर या परिसरात राहणाऱ्या तरुणांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. आजरा पोलिसात सदर बातमी समजताच पोलिसांनीही तातडीने धाव घेतली मृतदेह पाण्याबाहेर काढला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.

दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून तो   देवर्डे (ता.आजरा) येथील शांताराम गुंडू चाळके यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

संबंधित पोस्ट

शरद शेट्टी यांचे निधन

mrityunjay mahanews

‘त्या’ बातमीने आजरा तालुकावासीयांची झोप उडाली…….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पंजाब येथील  एक कोटीच्या दरोडा  प्रकरणातील चार आरोपीना आजऱ्यात अटक…विनयभंग प्रकरणी मुम्मेवाडी येथील एकाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

आगामी सर्व निवडणुकांमध्ये  जिल्हा भाजपा अशोकअण्णांच्या पाठीशी  : भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या बेरिंग्ज चोरी प्रकरणाचा छडा लागणार कधी….? ऐन निवडणूक तोंडावर सदर प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!