mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

आजरा पोलीस व LCB ची संयुक्त कारवाई; घरफोडी करून म्हैस चोरी करणारे दोन अटकेत, १ लाख ४५ हजाराच्या दोन म्हैशी हस्तगत

आजरा : प्रतिनिधी

आजरा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून म्हैस चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना आजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी संयुक्त कारवाई करीत अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या दोन म्हैशी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

गडहिंग्लज विभागामध्ये जनावरांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता वाडा गल्ली, आजरा येथील दोन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची व त्यापूर्वी आंबोली वसाहत येथून एक मुरा जातीची म्हैस चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणाच्या तपासात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे समीर कांबळे, वैभव गवळी, साजिद शिकलगार, सूर्यकांत सुतार, दीपक मऱ्यागोळ यांनी भाग घेतला.

या कारवाईत १ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या दोन्ही म्हैशी हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

भाजपा युवा वॉरियर्स जिल्हा सहसंयोजक पदी ऋषिकेश महाळंक यांची  निवड..

आजरा: प्रतिनिधी

आज युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक यांच्या जागर युवाशक्तिचा गडहिंग्लज दौऱ्यावेळी युवा वॉरियर्स जिल्हा सहसंयोजक पदी श्री ऋषिकेष महाळंक याच्या निवडीचे पत्र देणेत आले,या निवडी कामी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रविश पाटील-कौलवकर,  अशोकआण्णा चराटी, जयवंतदादा सुतार, अनिकेत चराटी, हर्षवर्धन महागांवकर, डॉ. विनायक परूळेकर याचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी प्रीतम कापसे, आनंदराव कातकर, अमोल सुतार, गणपती पाटील,दयानंद बुगडे,सचिन गुरव, धीरज पताडे आदी उपस्थित होते..

बॅरिकेट्सच्या हलगर्जीपणाचा फटका PQC थरावर टायरचे चट्टे.

उत्तूर-गड मार्गावर रांगोळीप्रमाणे जाळे, वाहन घसरण्याचा धोका वाढला.

उत्तूर : प्रतिनिधी

उत्तूर-गडहिंग्लज मार्गावर काँक्रिट रस्त्याचे काम करण्यात आले असून, DLC थरावर PQCचा थर टाकण्यात आला आहे. मात्र PQCचा थर टाकल्यानंतर त्याचे योग्य पद्धतीने संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात न आल्याने आणि स्थानिकांकडूनही निष्काळजीपणे वाहतूक सुरू राहिल्याने या नव्या थराची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. PQC थर पूर्णपणे सेट होण्यापूर्वीच अनेक वाहनांची ये-जा झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी.टायरच्या पट्ट्यांचे ठळक चट्टे पडले असून, ठिकठिकाणी रांगोळीप्रमाणे जाळे तयार झाले आहे. हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.या चट्ट्यांमुळे रस्त्याचा पृष्ठभाग असमतोल व घसरडा झाला असून, वाहनांचे टायर घसरण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे.

रात्रीच्या वेळी हे चट्टे व जाळे स्पष्टपणे दिसत नसल्याने अचानक वाहन घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी लाटांसारखे उंच-सखल भाग व खाचखळगे निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता खराब झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदाराकडून अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती अथवा उपाययोजना करण्यात आलेली नाही.आधीच रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये नाराजी असताना आता PQC थराच्या नुकसानीची भर पडली आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणारे स्थानिक नागरिक, चाकरमानी, दुचाकीस्वार व इतर वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. एखादा अपघात घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

रस्ता की अपघाताचा सापळा?

PQC थराचे संरक्षण करणे ही कंत्राटदार व संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. बॅरिकेट्स व सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे खराब झालेला थर तातडीने तांत्रिक निकषांनुसार दुरुस्त करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावा.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हप्ते जमा करा…

रिपब्लिकन सेनेची मागणी तहसीलदारांना निवेदन

आजरा : प्रतिनिधी

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा व दहावा हप्ता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्विकारले.निवेदनात म्हटले आहे, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता अ‌द्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा. पहिला हप्ता जुलै, आगस्ट व सप्टेबर मधे दर चार महीन्यानी समान तीन हप्त्यात मिळतात. राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचे मार्च २०२६ व जुलै २०२६ चे दोनही हप्ते अजून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेले नाहीत. शेतीला लागणारे बि बियाणे, खते व शेतीपुरक गोष्टीसाठी लागणाऱ्या खर्चाला या योजनेतून हातभार लागतो. सदरचे हप्ते वेळेत जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीची भावना आहे. तरी उर्वरीत दोन हप्त राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावेत.

संघटनेचे विधानसभा अध्यक्ष (राधानगरी) चे विनय कांबळे, तालुका उपाध्यक्ष गोपाळ होन्याळकर, तालुका संपर्क प्रमुख परशराम कांबळे, तालुका युवाअध्यक्ष अविनाश कांबळे, तालुका युवा उपाध्यक्ष मधुकर कांबळे, शंकर कांबळे, शामराव कांबळे, नंदकुमार कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

सुलगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

आजरा : सुलगांव प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. आरव देसाई याने २६८ तर ऋतुजा पाटील हिने २६६ गुण मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्यांना रवींद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

आजचे पंचांग

दिनांक : ४ सप्टेंबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (५ सप्टेंबर रात १२.१३ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (रात्री ११.०३ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : हर्षण योग (दुपारी ०३.४३ पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : बलवा करण (दुपारी ०१.२० पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०४ ते दुपारी १२.३७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.२५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संव

 

संबंधित पोस्ट

रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकरांमध्ये उत्सुकता

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या -मंगळवार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!