mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार 

१८ जुलै २०२६

सिकंदर पठाण यांचे अपघाती निधन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खेडे ता. आजरा येथील रहिवासी, युवा उद्योजक श्री. सिकंदर आप्पालाल पठाण यांचे अपघाती निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ५६ वर्षे होते.

पठाण हे कोल्हापूर येथे दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ते स्व. आप्पालाल पठाण यांचे चिरंजीव,
नीता ट्रॅव्हल्सचे मालक, तसेच स्व. वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.  रशिद पठाण यांचे  पुतणे होत.

सिकंदर  हे मनमिळाऊ, हसतमुख, सुस्वभावी आणि होतकरू युवा उद्योजक म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, चुलते व आप्तस्वकीय असा परिवार आहे.

आज शनिवार दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आजरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शेळप तालुका आजरा येथील संदीप गुणानाथ पाटील (वय १९ वर्षे) याने राहत्या घरी तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार असून शेळप चे पोलिस पाटील यांचा तो पुतण्या होता.

शिक्षण अर्धवट थांबवून तो घरी परतल्याने अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. वडील गुणानाथ पाटील यांनी याबाबतची वर्दी आजरा पोलिसात दिली आहे.

मृत्यूबद्दल शेळप येथे हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास हवालदार अनिल सरबळे करीत आहेत.

सिरसंगी येथील म्हैस दगावलेल्या दुध उत्पादक महिलेस ५९ हजार विमा रक्कम प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सिरसंगी ता.आजरा येथील वारणा सह. दुध संघाचे श्री गोठणदेव दुध संस्थेतर्फे महिला दूध उत्पादक श्रीमती सुशीला चाळू परीट यांना पन्नास हजार रुपये रकमेचा चेक प्रदान करण्यात आला.

१७ मार्च रोजी किरकोळ आजाराने म्हैस दगावली होती. श्री गोठणदेव दुध संस्थेमार्फत अमृत सुरक्षा कवच ही योजना राबवण्यात आली होती . या योजनेचा लाभ संस्थेची गरीब माहिला उत्पादक श्रीमती सुशील परीट याना झाल्याचे संस्थापक नारायण साटपे यांनी सांगितले .

यावेळी विमा ररक्कम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे संस्थेचे संचालक हणमंत भिकाजी बुडके यांचेहस्ते सदर विमा रकमेचा चेक देणेत आला . सदर दगावलेल्या जनावराच्या पंचनाम्यापासून ते विमा रक्कम सभासदाच्या हातात मिळेपर्यंत वारणा दूध संघाचे महाव्यवस्थापक डॉ. जे बी पाटील व पशू वैध्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे चेअरमन उत्तम बुडके यांनी सांगितले .यावेळी व्हा चेअरमन सुनीता बुडके , सौ सुनंदा बुडके, मारुती होडंगे , राजाराम सावंत , परशराम दळवी , भिकाजी बुडके , सचिव विठ्ठल गाइंगडे , अंजना बुडके , विजय साटपे , शिवाजी बुडके उपस्थित होते .

डॉ. सुखदीप म्हंकाळी चौगुले यांना पीएच.डी. पदवी प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या आजरा येथील डॉ. सुखदीप म्हंकाळी चौगुले यांनी के.एल. युनिव्हर्सिटी, विजयवाडा येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या पॅडल मिक्सर शाफ्टची संरचनात्मक कार्यक्षमता, Stress, Deflection आणि Fatigue Failure यांचा सखोल अभ्यास हा होता. अत्याधुनिक संगणकीय विश्लेषण तंत्रांचा वापर करून विविध कार्यरत परिस्थितीत शाफ्टचे वर्तन तपासण्यात आले.

प्रत्यक्ष औद्योगिक समस्यांवर आधारित अभियांत्रिकी उपाय सुचवून उपकरणांची कार्यक्षमता, सुरक्षितता, विश्वसनीयता आणि आयुर्मान वाढविण्यास उपयुक्त असे निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आले आहेत.

हे संशोधन उद्योगाभिमुख असून मिक्सिंग उद्योगातील उपकरणांच्या रचनेत सुधारणा, देखभाल खर्चात बचत तसेच अनपेक्षित बिघाड कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उद्योगाच्या प्रत्यक्ष गरजांशी सुसंगत असल्याने अभियांत्रिकी क्षेत्रासाठी हे उपयुक्त योगदान मानले जात आहे.

अभिनंदनीय…

पेरणोली येथील कुमारी प्रेरणा रवींद्र नावलकर हिने नीट/NEET परीक्षेत ५४२ गुणांसह यश संपादन केले आहे  तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १८ जुलै २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी तिथी (१९ जुलै रात्री ०३.४२ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (सायंकाळी ०६.०० पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : वरीयान योग (रात्री ०८.४५ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : भाव करण (सायंकाळी ०४.०६ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : सिंह राशी (रात्री ११.५८ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२८ ते सकाळी ११.०६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

विशेष सूचना

बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.

कांही वेळा ट्राफिक जाममुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

….मुख्य संपादक

संबंधित पोस्ट

आडवी बाटली उभी होणार…

mrityunjay mahanews

सोमवार-सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर – मुमेवाडी जवळ विचित्र  अपघात एक जण जागीच ठार !२५जखमी…

mrityunjay mahanews

गजरगाव बंधार्‍यावरून मोटरसायकल कोसळल्याने एक जण जागीच ठार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!