शुक्रवार
१७ जुलै २०२६

अस्मिता मृत्यूप्रकरणी व्यापक आंदोलन छेडणार
आजरा तालुकावासियांचा इशारा

आजरा तालुक्यातील लाटगाव येथील सौ. अस्मिता काटकर हिचा सासरी कोल्हापूर येथे झालेला मृत्यू हा संशयास्पद आहे. एक महिन्याची मुलगी पदरात असताना तिने केलेली आत्महत्या ही अनेक प्रश्नांची मालिका तयार करणारी आहे. समाज म्हणून तिला आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी कोणालाही साधा फोन करावासा न वाटणे ही बदलत्या समाजाची शोकांतिका आहे. तिचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून तिला वेळीच न्याय मिळावा अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल असा इशारा आजरा तालुकावासियांनी संघटीतरित्या दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसिलदार समीर माने यांच्याकडे सुर्पूद करण्यात आले. यावेळी अस्मिता यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. राजू पोतनीस यांनी निवेदनाचे वाचन केले.
यावेळी बोलताना नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार म्हणाल्या, बेटी बचाओ, बेटी पढाओ और मरने के लिये दुसरे के घरो मे छोड दो… अशी अवस्था मुलींची झाली आहे. मुलींवर संस्कार करताना अडचणींच्या वेळी लढण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. याचबरोबर लोकांची पारख करण्यासही तिला शिकविण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई म्हणाले, आत्महत्याग्रस्त अस्मिता यांच्यासाठी लढा उभारून संबधित आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी संघटीतरित्या प्रयत्न करूया. यावेळी रणजित सरदेसाई, संभाजी सरदेसाई, डॉ. धनाजी राणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसभापती सौ.यशोदा पोवार, आजरा साखर कारखाना संचालक सुभाष देसाई, सौ.मनिषा देसाई, माजी सभापती सौ.रचना होलम, माजी नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, अभिषेक शिंपी, सुधीर कुंभार, जनार्दन टोपले, विजय थोरवत, अभिजीत रांगणेकर, दीपक बल्लाळ, संतोष भाटले, नंदकुमार सरदेसाई, प्रकाश सरदेसाई, मराठा महासंघाचे मारूती मोरे, अभिषेक शिंपी, अनिरूद्ध केसरकर, जी. एम. पाटील, उदय सरदेसाई, दत्तात्रय मोहिते, दयानंद नेऊगरे, सुधीर सुपल, बापू निऊंगरे, अमानुल्ला आगलावे, वामन सुतार, सुजित देसाई, संदेश दळवी, सौ.भारती डेळेकर, सौ.कल्याणी सरदेसाई, संदीप सरदेसाई, प्रताप सरदेसाई, विलास पाटील, संजय गुरव, गौरव देशपांडे, सी. डी. सरदेसाई, संतोष चौगले, रवींद्र तळेवाडीकर, सिद्धार्थ तेजम, राजश्री सुपल,वर्षां यमगेकर, सविता जाधव, मंगला देसाई, रूपाली गंभीर ल, शशिकला देसाई यांच्यासह तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गवे व बिबट्याची धास्ती
जाये तो जाये कहा…?

….ज्योतिप्रसाद सावंत/मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नदी व आजूबाजूला गर्द जंगल असणाऱ्या आजरा शहरवासीयांचे सकाळी व संध्याकाळी फिरावयास जाणे गवे, बिबट्याच्या धास्तीने कमी होऊ लागले असून शहराच्या सीमेवर बिबट्यासह गव्याचा वावर असल्याने आता ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध मंडळी व अशा सकाळ -संध्याकाळ फिरण्यासाठी जाणाऱ्या मंडळींवर जाये तो जाये कहां…? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मुळातच शहरवासीयांना भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड आहे. पहाटे लवकर फिरावयात जायचे म्हटले तर भटक्या कुत्र्यांपासून बचाव करण्याची कसरत करत फिरावयास जावे लागते. आठवडाभरापूर्वी बिबट्याने दर्शन दिल्याने व बिबट्याचा वावर अधोरेखित झाला असल्याने रामतीर्थ परिसरासह साळगाव रोड,, आंबोली रोड येथे फिरावयास जाताना विचार करण्याची वेळ आली आहे.
हीच परिस्थिती गवांच्याबाबतही आहे. अनेक ठिकाणी गवे खुलेआम रस्त्यावर येत असल्याने गव्यांपासूनही स्वतःचा बचाव करत जीव मुठीत धरुन फिरावयास जाण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. नेसरी रोड, पोळगाव रोड, साळगाव या मार्गावर हमखास गवे दर्शन देताना दिसतात.
एकंदर आता गव्यांनी, बिबट्यांनी व भटक्या कुत्र्यांनी शहरवासीयांवर जाये तो जाये कहां..? असे म्हणण्याची वेळ आणली आहे

सरपंचांचीच कुत्री पळवली…
आवंडी धनगर वाड्यावर बिबट्याची दहशत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आवंडी धनगर वाडा क्रमांक एक येथे घराच्या पोर्चमध्ये बसलेली दोन कुत्री बिबट्याने पळवल्याची घटना घडली आहे.
सरपंच बयाजी मिसाळ यांच्या पोर्चमध्ये नेहमी बसणारी दोन कुत्री बिबट्याने गायब केली आहेत. बिबट्याच्या पावलाचे ठसे पोर्चमध्ये दिसत असल्याने हे काम बिबट्याकडूनच घडले आहे असा संशय व्यक्त होत आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आजरा तालुका सेवानिवृत प्राथमिक शिक्षक संघटनेचा पाठिंबा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
केंद्रिय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकशाही मार्गाने दिल्लीतील जंतर मंतर येथे गेले अठरा दिवस उपोषण करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते यांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारणे तातडीने हस्तक्षेप करावा यासाठी चे निवेदन समीर माने तहसिलदार आजरा यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री विष्णु मोरे , उपाध्यक्ष श्री बळवंत शिंत्रे , सचिव जनार्दन पाटील , कार्याध्यक्ष मारुती वरेकर ,श्री सुभाष विभुते , श्री सुनिल सुतार , श्री बाळासो पाटील , रघुनाथ येसणे श्री बाळकृष्ण गुरव , विलास वांजोळे , श्री तानाजी चव्हाण ,श्री भैरु माळवकर श्री तुकाराम पाटील व श्री आनंदा कुंभार हे यावेळी उपस्थित होते .

उत्तूरच्या कन्या विद्या मंदिरात नवीन वर्गखोली व स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील कन्या विद्या मंदिर येथे नवीन वर्गखोली व स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ माजी कारखाना चेअरमन वसंतराव धुरे आणि जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत शाळेस वर्गखोली व स्वच्छतागृह बांधकामासाठी ₹ ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामामुळे शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक विलास वाईंगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष गुरव यांनी प्रास्ताविकातून बांधकामाच्या उद्देशाची माहिती दिली. केंद्रशाळेचे मुख्याध्यापक बाळगोंडा कोकितकर यांनी आभार मानले.
यावेळी पंचायत समिती सदस्य विकास चोथे, सरपंच किरण आमणगी, उपसरपंच सुनिता हत्तीरगे, सदस्य महेश करंबळी, समीक्षा देसाई, अनिता घोडके, सुजित लोखंडे, पुंडलिक पाटील, तानाजी डोंगरे, नजीर लमतुरे तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निधन वार्ता
धोंडीबा मोरस्कर

धनगरमोळा ता. आजरा येथील श्री.धोंडीबा सखाराम मोरस्कर ( वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नाती, नातवंडे,भाऊ, बहीण असा परिवार आहे.
राजश्री व जयश्री या दोघी बहिणींनी मिळून मुखाग्नी दिला .

आजचे पंचांग
दिनांक : १७ जुलै २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया तिथी (सकाळी ०६.२७ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : मघा नक्षत्र (सायंकाळी ०६.३४ पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
योग : व्यातीपात योग (रात्री १०.४५ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : गराजा करण (सकाळी ०६.२७ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०६ ते दुपारी १२.४५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.११
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
विशेष सूचना
बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.
कांही वेळा ट्राफिक जाममुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
….मुख्य संपादक


