mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या …

बनावट धनादेश देणाऱ्यास शिक्षा…

दि आजरा अर्बन को ऑप बँक लि आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या शाखा नेसरी ता. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर यांचे कडील थकीत कर्जदाराने  थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी रक्कम रु.एक कोटी ११ लाखांचा धनादेश दिला होता. धनादेश वटला नसल्यामुळे दि आजरा अर्बन को ऑप बँक लि आजरा (मल्टी-स्टेट) यांनी मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो। आजरा यांचे कोर्टात बँकेचे थकीत कर्जदाराविरोधात भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा १३८ व १४२ अन्वये फिर्याद दाखल केली होती त्याचा निर्णय दि.८ सप्टेबर रोजी मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो। एस. पी. जाधव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आजरा यांनी दिला असून बँकेचे थकीत कर्जदार यांना १ वर्षे कैदेची शिक्षा व रक्कम रु ५०००/- दंड व दंड न भरलेस ३ महिनेची कैद तसेच धनादेशातील नमुद रक्कम रु. १,११,००,०००/- बँकेस ३० दिवसाचे आत देणेबाबत आदेश दिला आहे व धनादेशातील नमुद रक्कम ३० दिवसाचे न दिलेस पुन्हा ६ महिन्यांची कैद असा निकाल दिला आहे. फिऱ्यादी बँकेतर्फे विधितज्ञ डी.डी. आजगेकर व एस. टी. पाटील यांनी काम पाहिले.

गोंधळ बिगर शेतीचा…
दलाल आणि मध्यस्थ यांच्या विळख्यात यंत्रणा…

मिनीचे बिगरशेती करण करणे म्हणजे फार मोठे दिव्य आहे असे भासवून यामध्ये निष्णात असणारी काही मंडळी अधिकारी वर्गाच्या नावावर लाखो रुपये लाटत असल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षात या साखळीतील अधिकाऱ्याला चार आणे तर मध्यस्थ आणि एजंटांना बारा आणे असा रुपयाचा साधा हिशोब घालून अधिकाऱ्यांच्या नावावर अनेकांनी आपली दुकाने थाटली आहेत. अधिकाराचे भान नसणारे मंडळी मात्र अशा मंडळींच्या आमिषाला बळी पडून स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून बेकायदेशीर कामे बिनधास्तपणे करताना दिसतात. मध्यस्थ व एजंटामध्ये अशा अधिकाऱ्यांचा सर्रास असणारा वावर निश्चितच विचार करावयास लावणार आहे.

ढीगभर कागदपत्रे गोळा करताना सर्वसामान्यांची दमछाक होत असल्याने लाखो रुपयांना अशी कामे करून देण्याचा ठेका एजंट व दलाल यांना दिला जातो. प्रत्येक कागदामागचे ठरलेले पाकीट सरकवत ही कागदपत्रे जमा केली जातात. जी कागदपत्रे इतर वेळी जमा करताना,७/१२ नोंदी घालताना चप्पल झिझवावे लागतात, तीच कागदपत्रे अगदी अल्पशा कालावधीत मध्यस्थांकडे जमा होऊ लागतात. कागदपत्रात एखादी त्रुटी असल्यास जादाची कमाई ठरलेली. चुकी काढण्यासाठी ‘ एक्स्ट्रा चार्जेस ‘ लागू हा अलिखित नियम.

सगळी कागदपत्रे जमा झाली की मुख्य साहेबांचा सही अन शिक्का. अधिकाराचे भान नसलेले वरिष्ठ हे बिनधास्तपणे सही शिक्का मारून बिगर शेतीकरणावर शिक्कामोर्तब करून रिकामे होतात. याच जाळ्यात आज-यातील एक अधिकारी नाहक भरडला गेला आहे. सध्या या अधिकाऱ्यावर सर्व खापर फोडले जात आहे. परंतु या मागचे बोलवते धनी निश्चितच वेगळे आहेत.

सही शिक्के पडताळून पहाण्याची गरज…

मंजुरीवेळी असणा-या सहया व शिक्के हे बोगस असल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे. काही मंडळींनी विविध अधिकाऱ्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांचे बोगस सही व शिक्केच  आपल्या ताब्यात ठेवले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आता अशा प्रकरणावर वापरण्यात आलेल्या सही व शिक्क्यांची शहानिशा करणे गरजेचे ठरत आहे.


जनता बँकेला नवीन तीन शाखांची मंजूरी


आजरा येथील जनता सहकारी बँकेला नेसरी, कळंबा व पेठवडगाव अशा तीन नवीन शाखा सुरू करण्यास रिझर्व बँकेने नुकतीच परवानगी दिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील व बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांनी दिली.

जनता बँकेवर दाखविलेल्या सभासद व खातेदारांच्या विश्वासावर १७ शाखांचा विस्तार असणाऱ्या बँकेच्या रु. ३३० कोटी इतक्या ठेवी, रु. २३० कोटी इतकी कर्जे, गुंतवणूक रु. १२७ कोटी, रु. १५ कोटी इतके वसुल भागभांडवल असून रिझर्व बँकेच्या सर्व निकाषांची पूर्तता करुन FSWM मध्ये वर्गीकृत असणाऱ्या जनता बँकेचा गौरव रिझर्व बँकेने नवीन तीन शाखांना परवानगी देवून केला असून नवीन शाखा लवकरात लवकर सुरु करणार असलेची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी दिली.

यापूर्वी वेगवेगळया १२ आदर्श बँक पुरस्कारांनी गौरविलेल्या बँकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवल्याने जनता बँक परिवारात उत्साहाचे वातारण निर्माण झालेचे बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांनी सांगितले.


भाजपाच्या रक्तदान शिबिरात ७१ जणांचा सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे रक्तदान हेच श्रेष्ठदान या अनुषंगाने तालुका भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ७१ जणांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम आजऱ्याचे नूतन भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध(बाळ) केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रम प्रसंगी रोहित बुरुड,सुरेश पाटील, शिवाजी खामकर, नंदकुमार देसाई,रुपेश परीट, गौतम भोसले, भास्कर पेंडसे, राहुल पेंडसे, तौफिक आगा, संजय सावंत, शुभम पाटील, सतीश शिंदे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिजीतने केले ८९ वेळा रक्तदान

आजरा अर्बन बँकेचे कर्मचारी व स्वराज्य तालीम मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अभिजीत केसरकर यांनी आज आपल्या कारकिर्दीतील ८९ वे रक्तदान केले.


सुवर्णपदक विजेत्या रितूचा ‘व्यंकटराव’मध्ये सत्कार

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल, आजरा या प्रशालेची माजी विद्यार्थिनी रितू जितेंद्र शेलार हिने ‘बॅचलर ऑफ आर्किटेक्चर’ या पदवी शिक्षणामध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये गोल्ड मेडल मिळवून अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्दल आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते रितूचा व पालक जितेंद्र शेलार , प्रशालेच्या पर्यवेक्षिका व रितूच्या आई सौ. व्ही.जे. शेलार यांचेसमवेत तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव एस.पी. कांबळे, संचालक अभिषेक शिंपी, प्राचार्य आर. जी. कुंभार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

आजऱ्यातील पाच तरुणांना २८ सप्टेंबर पर्यंत आजरा तालुक्यात प्रतिबंध

गणेश उत्सव सण शांततेत पार पडावा व या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आजरा शहरातील पाच तरुणांना दि.१९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३ अखेर आजरा तालुका कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी पारित केले आहेत.

यामध्ये राहील असलम खेडेकर, आफताब सादिक सिराज, हुझेफा शकील सिराज, आरिफ मोहम्मद शिराज व सादिक रहिमबक्ष सिराज (सर्व रा. आमराई गल्ली, आजरा) या पाच जणांचा समावेश असल्याचे आज-याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी सांगितले.                                                           ……………….

…निवड…

गवसे ता. आजराच्या सरपंच पदी सौ. रेखा रणजीत पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सौ. पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

जखमी सांबरावर वनविभागाकडून उपचार

वनपरिमंडळ चंदगड कडील नियतक्षेत्र उमगाव कडील मौजे नागवे जंगल कक्ष क्रमांक २६ मध्ये सांबर वन्यप्राणी जखमी अवस्थेत चिखलात रुतून बसलेले फिरतीचे वेळी वनरक्षक, वनसेवक यांना आढळून आले.

 

सदर घटनेची माहिती वनरक्षक उमगाव यांनी  कृष्णा डेळेकर वनपाल, चंदगड यांना दिली. तात्काळ वनपरीमंडळ चंदगडकडील सर्व वनरक्षक, वनसेवक यांना घटनास्थळी पाठवून देऊन चिखलात जखमी अवस्थेत बसलेले सांबर वन्यप्राणी याला चिखलातून बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी चंदगड यांना घटनास्थळी बोलावून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. सदरची कारवाई  नंदकुमार भोसले वनक्षेत्रपाल चंदगड , कृष्णा डेळेकर वनपाल, चंदगड यांचे मार्गदर्शनाखाली श्री तानाजी कळवीकट्टीकर व वन कर्मचाऱ्यांनी केली.

गणेश दर्शन :- लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळ आजरा..


अध्यक्ष :- रुपेश डांग                            उपाध्यक्ष ;- शेखर शेट्टी                            सचिव ;- अनिकेत शिंत्रे

भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ


अध्यक्ष :- अण्णा फडके
उपाध्यक्ष :- उमेश पारपोलकर

शिवसेनाप्रणित जय शिवराय गणेशोत्सव मंडळ, आजरा


अध्यक्ष:-अभिषेक देऊसकर
खजिनदार:- रोहन गिरी

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

धक्कादायक… रोहन देसाई यांचा अखेर मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

अर्ध्या तासात पावसांने उडाली आजरेकरांची दैना ; ऐन आठवडी बाजारात पावसाचे थैमान

mrityunjay mahanews

कीणे येथे भिंत कोसळून महिला ठार

mrityunjay mahanews

आजऱ्यात मधमाशांच्या हल्ल्यात 50 वर जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!