mrityunjaymahanews
अन्य

प्रवाशाचे बेचाळीस हजार रुपये हातोहात लंपास…

प्रवाशाचे बेचाळीस हजार रुपये हातोहात लंपास

आजरा बस स्थानकावर आवंडी धनगर वाडा येथील हॉटेल कर्मचारी भिकाजी जानू कोकरे यांची ४२ हजार रुपये इतकी रोकड अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली.

गावी जाण्यासाठी कोकरे हे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील बेचाळीस हजार रुपये लंपास केले याबाबतची फिर्याद भिकाजी कोकरे यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस नाईक संतोष घस्ती पुढील तपास करीत आहेत.

आजरा येथे सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करणार : अनिरुद्ध केसरकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुक्यात दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अखेर सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे भाजपाचे आजरा तालुका अध्यक्ष व नगरसेवक अनिरुद्ध(बाळ) केसरकर यांनी सांगितले.

ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे दि.१७ रोजी फळे वाटप, गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथे २२ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर व २४ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिर तर एक ऑक्टोबर रोजी रामतीर्थ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट करत तालुकावासीयांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहनही केसरकर यांनी केले आहे.

आजरा येथे अभियंता दिन साजरा

आर्किटेक्ट अँड इंजिनिअर वेल्फेअर असोसिएशन, आजरा यांचे वतीने. राष्ट्रीय अभियंता दिन आजरा येथे उत्साहात साजरा करणेत आला. सदरच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शासकीय विभागाचे प्रमुख अभियंते, त्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा आजराचे उपअभियंता,
पी.डी. माने , पंचायत समिती (बांधकाम) विभागाचे उपअभियंता सूर्यकांत नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मा सुर्वे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत पाटील, त्याचबरोबर शाखा अभियंता कुंभार, यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. विजयकुमार पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पुजन उपअभियंता पी.डी. माने व सूर्यकांत नाईक यांचे हस्ते करणेत आले. त्याचबरोबर इंजि. के. एच. पाटील, पांडूरंग सावरतकर, इंजि. एन.व्ही. पाटील, इंजि. तुकाराम गुरव या तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी अभियंत्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष इंजि.जी.एम. पाटील यांनी आपल्या स्वागत / प्रास्ताविक भाषणामध्ये सर्वांचे  स्वागत करत सर विश्वेश्वरय्या यांच्या महान कार्याचा जीवनपट मांडला. त्याचबरोबर नवनिर्वाचित सभासदांचे असोसिएशनच्या वतीने स्वागत करत सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.

यावेळी कु. रितु जितेंद्र शेलार यांचा शिवाजी विद्यापीठामार्फत आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यानंतर उपअभियंता ग्रा.पा.पु.आजरा पी.डी. माने, उपअभियंता (बांधकाम) पं.स. आजरा, सूर्यकांत नाईक, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा, सुर्वे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी वास्तुशास्त्र अभ्यासक इंजि. चिंतामणी लोंढे यांचे वास्तुशास्त्र-सारांश या विषयावर व्याख्यान झाले. वास्तुशास्त्र, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र ही एकमेकाशी परस्परांशी संबंधीत असणारी शास्त्रे आहेत ही पृथ्वी, अग्नि, पाणी, वायु, आकाश ह्या पंचमहाभुतांशी म्हणजेच निसर्गाशी जोडली गेली आहेत. यावेळी लोंढे यांनी वास्तुदोष त्यावरील उपायायबाबतची उदाहरणे देऊन पटवून दिली.

अध्यक्षीय भाषणामध्ये इंजि. विजयकुमार पाटील यांनी असोसिएशनच्या वाटचालीमध्ये जेष्ठ इंजिनिअर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभते त्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर नवनिर्वाचित सभासद इंजिनिअर व आर्किटेक्ट्स यांनी झोकुन देऊन चिकाटीने आपआपल्या कामाचा ठसा उमटवण्यासाठी सुक्ष्मपणे सचोटीने काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल कांबळे यांनी केले व असोसिएशानचे खजिनदार इंजि. अमोल जाधव, इंजि. जितेंद्र शेलार ,इंजि.अभिजित देसाई,इंजि.युवराज येसणे,यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

आभार इंजि. सुधीर कुंभार यांनी मानले.


आज-यातील रवळनाथ पतसंस्थेला १७ लाखांवर नफा : अध्यक्षा सौ. फडके

३९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत


आज-यातील श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेची ३९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी   संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी उपस्थित  होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुरेखा फडके होत्या.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ. फडके यांनी संस्थेकडे ११ कोटींवर ठेवी असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला १७ लाखांवर नफा झाल्याचे स्पष्ट केले.

जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी, अध्यक्षा सौ. सुरेखा फडके, उपाध्यक्ष किरण कांबळे यासह मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यकमाला सुरुवात झाली. प्रारंभी स्वागत संस्थेचे मैनेंजर विश्वास हरेर यांनी स्वागत केले. श्रध्दांजलीचा ठराव संचालक सुधीर नार्वेकर यांनी मांडला. अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्षा सौ. फडके यांनी संस्थेकडे अहवाल सालात ११ कोटी ४६ लाखांवर ठेवी असून आर्थिक वर्षात १ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. ९ कोटी ३३ लाखांवर कर्जे वाटप केली असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात १७ लाख ४३ हजारांचा नफा झाला असून गतवर्षीपेक्षा नफा २ लाख ३४ हजार रूपयांनी वाढला आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात बँकींग क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. या सगळया बदलत्या आव्हानांशी संघर्ष करत आपली पतसंस्था आपल्या सर्वांचे सहकार्य आणि पाटीव्यावरच उत्तरोत्तर प्रगती करीत असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर एमपीएससी कृषीसेवा परीक्षेतून कृषी उपसंचालकपदी निवड झालेबद्दल मिलींद चंद्रमणी, संख्याशास्त्र विषयावर पीएचएडी मिळविल्याबद्दल राजश्री मलामवाडे, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल रोहीत गिलबिले, दहावी, बारावीतील गुणवंत विदयार्थी शुभम जाधव, रोहीत जाधव या सभासदांच्या पाल्यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुण्प देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर सभेपुढील विषय व अहवाल वाचन संस्थेचे मॅनेंजर विश्वास हरेर यांनी केले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाकडून समर्पक उत्तरे देण्यात आली. सभासद गोविंद गुरव यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी वर्गाचे असलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.

यावेळी संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. संचालक अभिषेक शिंपी यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला सर्व संचालक, आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आण्णा पाटील, एम. पी. कांवळे, सुनील देसाई, के. जी. पटेकर, अभिजीत हुक्केरी. विकम पटेकर, विलास पाटील, विश्वास जाधव, मारुतीराव देशमुख यासह सभासद उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कककक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!