अखेर पेरणोली-हरपवडे धनगरवाडा ‘प्रकाश’मय

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर हरपवडे व पेरणोली धनगरवाडा प्रकाशमय झाला आहे.येथे वीजपुरवठा सुरू करून वंचित घटकाला प्रकाश देता आला असल्याचे समाधान मिळत असल्याचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी व्यक्त केले.
धनगर वाडा येथे वीज पुरवठा उद्घाटनप्रसंगी बोलताना आ.प्रकाशअबिटकर म्हणाले, महावितरणच्या गडहिंग्लज विभागातील व आजरा तालुक्यातील हरपवडे व पेरणोली गावाशी संलग्न धनगरवाडा स्वातंत्र्यदिनी ७५ वर्षानंतर प्रकाशमान होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून महावितरणने ही कामगिरी केली आहे. दळवणापासून वंचित, अत्यंत दुर्गम व वनविभागाच्या क्षेत्रातील हा धनगरवाडा प्रकाशमान करण्यासाठी महावितरण यंत्रणेने अथक परिश्रम घेतले असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी आजरा कारखाना संचालक राजेंद्र सावंत, कल्याणराव निकम, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, आजरा उपविभागीय अभियंता सुहास मिसाळ, शाखा अभियंता शरद पाटील, ठेकेदार नितीन पेडणेकर, संदीप तेजाम, देवदास गुरव, गोविंद गुरव, पांडुरंग धाटुंबे, नेताजी कातकर, संतोष भाटले, रणजित सरदेसाई, इंद्रजित देसाई, काकासो देसाई, सुनील दिवेकर, वनविभागाचे बाळेश न्हावी आदी उपस्थित होते.
……………………………………………………
आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

आजरा शहरासह तालुक्यांमध्ये ठीक- ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
व्यंकटराव हायस्कूल येथे जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते, आजरा महाविद्यालयात अशोक चराटी यांच्या हस्ते,ध्वजारोहण करण्यात आले.
पेरणोलीत माजी सैनिक माजी सैनिक मारूती कळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पेरणोली हायस्कूल, प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना येथील सरपंच उषाताई जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे प्रा. डॉ. सुधीर मुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आजरा अर्बन बँकेमध्ये अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते तर जनता सहकारी बँकेमध्ये मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये जनार्दन टोपले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
………………………………………………..
ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी आजरा कार्यकारणी जाहीर.

आजरा तालुक्याची ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशनची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मौजुदअहमद युसूफ माणगांवकर यांची तालुकाध्यक्ष, महमदरसूल (बबलू )अल्लाउदिन शेख यांची आजरा शहर अध्यक्ष,तर जमील नूरअहमद निशानदार यांची सचिव म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जहांगीर हजरत यांच्या हस्ते काशिम मुल्लाणी (राष्ट्रीय उपाध्यक्ष )यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली.
यामुळे तालुक्यातील गरीब ओ बी सी धारकांना सहज ओबीसी दाखले मिळवून देणार आहोत असे यांनी यावेळी सांगितले.
माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही : शरद पवारांची स्पष्टाेक्ती

🔹अजूनही माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही. २०२४ मध्ये देशातील चित्र बदलण्यासाठी आम्ही कष्ट करणार आहोत, असे आज ( दि. १६) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.*
देवेंद्र फडणविसांप्रमाणेच पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, मी पुन्हा येईन, मात्र देशातील परिस्थिती वेगळी आहे. आम्ही मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आम्हाला बदल हवा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पत्रकार परिषदेत बाेलताना पवार म्हणाले की, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबाेधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील १५ ऑगस्टला मी पुन्हा येईन, असंही म्हटलं आहे. त्याचे मी पुन्हा येईन हे ब्रीदवाक्य फडणविसांप्रमाणेच आहे. फडणवीस आले; पण उपमुख्यमंत्री म्हणून आले. आता पंतप्रधान माेदी काेणत्या पदावर परत येणार हे त्यांना विचारले पाहिजे, असेही ते म्हणाले. मागील आठ ते दहा दिवस मी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. उद्या बीडमध्ये मी सभा घेणार आहे. ही सभा घेऊन मुंबईला परणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मणिपूरमधील परिस्थिती पीएम मोदींनी जाऊन पाहावी
भाजपची भूमिका समाजात तेढ निर्माण करणारी आहे. मोदी सरकारचे अनेक निर्णय हे अशाच प्रकारचे आहेत. त्यामुळे भाजपविरोधात जनमत तयार करणं गरजेचं आहे. समाजात कटुता निर्माण वाढवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आराेपही त्यांनी केला. देशाच्या फाळणीनंतर काही महत्त्वाच्या घडामोडी सध्या देशात घडत आहेत. मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. मणिपूरमधील परिस्थिती पीएम मोदींनी जाऊन पाहावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
इंडिया आघाडीच्या सभांबाबत बोलत असताना ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता देशपातळीवर दोन महत्त्वाच्या सभा घेण्यात येणार आहेत. ३१ तारखेला इंडियाची सभा होणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.
अजित पवारांबराेबरील बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही
अजित पवार आणि माझी भेट झाली. पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीनंतर मी लपून निघून गेलो नाही तर निघताना माध्यमांशी बोलून गेलो. त्यामुळे ही भेट गुप्त नव्हती असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. मी लहान लोकांवर भाष्य करणार नाही असा टोला देखील त्यांनी अजित पवारांना लगावला.
मविआत माझ्याशिवाय प्लॅन ही केवळ चर्चा वस्तुस्थिती नाही
काँग्रेस आणि ठाकरे गटाचा प्लॅन बी, ही केवळ चर्चा आहेत. त्यामुळे मविआत अस्वस्थता असल्याच्या चर्चा आहेत मात्र वस्तुस्थिती अशी नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मविआत माझ्याशिवाय प्लॅन ही केवळ चर्चा वस्तुस्थिती नाही असंही ते म्हणाले.
मला चिन्हाची चिंता नाही
माझ्या आयुष्यात मी १४ निवडणूका लढलो आहे. मला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. चिन्हापेक्षा आम्ही प्रामाणिक काम केलं म्हणून हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही; पण सत्तेचा गैरवापर करु नये असं माझं मत आहे. सध्या निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेत नाही. निवडणूक आयोगाने जर स्वत: निर्णय दिला तर मला चिंता नाही. शिवसेनेबाबतच्या निर्णयावर केंद्राने हस्तक्षेप केला होता. त्यामुळे आयोगात ठाकरेंसोबत जे झालं ते आमच्यासोबत देखील होऊ शकतं, असेही पवार यावेळी म्हणाले.
News Source :- https://chat.whstsup


