mrityunjaymahanews
अन्य

एक वेळ घरी बसेन पण भाजपात जाणार नाही…

एक वेळ घरी बसेन पण भाजपात जाणार नाही : आ.राजेश पाटील

मंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून यापूर्वी आणलेल्या सुमारे शंभर कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थगिती आल्याने तालुक्यात मतदार संघाच्या विकास कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदारसंघाचे नुकसान करून घेणे शक्य नव्हते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही यामुळे कार्यकर्त्यांशी विचारविनिमय न करताच मला सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा लागला. यापुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून भाजपामध्ये कदापिही जाणार नाही. एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडून घरी बसू पण भाजपामध्ये जाणार नाही, असा खुलासा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केला. वाटंगी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा होते.

आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. सुरेश बुगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, अनपेक्षितपणे राजकीय घडामोडी घडत गेल्या. अशावेळी निर्णय घेणे मोठे अडचणीचे होते. गेल्या साडेतीन वर्षात अजितदादा, मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा निधी मतदार संघाकरिता आणला. त्यानंतर मात्र राजकीय समीकरणे बदलल्याने विकास कामांमध्ये अडथळे येऊ लागले. जे मुश्रिफ व अजितदादा आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांच्या सोबत यावेळी राहणे गरजेचे होते, यामुळे विकास कामे मार्गी लागण्याबरोबरच उचंगी प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नही निकाली निघण्यास मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात अल्बर्ट डिसोझा म्हणाले, विकास कामे समोर ठेवून मंत्री मुश्रिफ व आम. पाटील यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आपण आहोत. त्यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहू. परंतु भाजपामध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेऊ नये.

जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, अजित दादा व मुश्रीफ साहेब यांच्या मदतीने भरीव निधी मिळाला आहे.मंत्री मुश्रिफ हे जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभे असल्याने जिल्ह्यातील साखर कारखानदारी व्यवस्थित सुरू आहे. सध्या आमची भाजपाला गरज आहे. परंतु लोकसभेनंतर त्यांना आमची गरज राहीलच असे नाही. त्यामुळे उर्वरित राष्ट्रवादीही आपल्या सोबत येऊन आपण पुन्हा एकदा एकसंघ पद्धतीने काम करू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आजरा साखर कारखान्याचे संचालक एम.के. देसाई, अनिल फडके, सुभाष देसाई यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

उपस्थित कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रिफ व आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत असा विश्वासही व्यक्त केला .

कार्यक्रम प्रसंगी आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई ,अभय देसाई, भीमराव वांद्रे, प्रा. तानाजी राजाराम, जनार्दन बामणे,सौ. स्वातीताई गुरव, सौ.इंदूताई कुंभार,सौ.मीनाक्षी देसाई, सौ मंगल वांद्रे, वसंत गुडूळकर अशोक शिंदे,जयराम संकपाळ, भीमराव सुतार यांच्यासह कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

तो केवळ योगायोग...

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी  आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही… असे जाहीर केले होते. यामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा आपणाला कदापिही अंदाज नव्हता. माझे बोलणे आणि सुरू असलेल्या घडामोडी हा निव्वळ योगायोग असल्याचेही आ.पाटील यांनी सांगितले.

शरद पवार ,जयंत पाटील यांच्यासह मुकुंददादांचा विसर नाही.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह मुकुंदराव देसाई यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचे स्मरण यावेळी वक्त्यांनी त्यांच्या विरोधात कोणताही अपशब्द न वापरता आदरपूर्वक पद्धतीने केले. अप्रत्यक्षपणे आपल्या कृत्याची शरद पवार यांच्याकडे माफीही आमदार पाटील यांनी मागितली तर व्यासपीठावर मुकुंददादा नसल्याची कमतरता सुधीर देसाई यांनी बोलून दाखवली.

                        ………..

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

मोटरसायकल अपघातात एक ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

Big Breaking….

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!