mrityunjaymahanews
अन्य

होण्याळी येथून विवाहिता बेपत्ता…

होण्याळी येथून विवाहिता बेपत्ता…

 

होण्याळी (ता. आजरा) येथून सौ.मनीषा नागेश साठे ही २४ वर्षीय विभागात बेपत्ता आहे याबाबतची वर्दी दत्तात्रय मारुती ससाने यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

शनिवार दिनांक ११ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडलेली सौ. मनीषा अद्याप घरी परतलेली नाही आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

संपूर्ण भारतीयांचा आवडता केक आता आज-यात मिळणार…

माँनजिनीस केक दालनाचे आज उद्घाटन…

संपूर्ण भारतीयांचे आकर्षण असणाऱ्या माँनजीनीस या ब्रँडचे केक आजरा शहरात आता उपलब्ध होणार असून बस स्थानकाशेजारी आंबोली रोडवर असणाऱ्या या केक दालनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक १४ रोजी होणार आहे.

एकाच वेळी पन्नास पेक्षा जास्त फ्लेवरचे केक या दालनामध्ये उपलब्ध होणार आहेत.किफायतशीर दरात हे विविध प्रकारच्या फ्लेवरचे ब्रँडेड केक आजरेकरांच्या दृष्टीने पर्वणी ठरणार आहेत.

संवेदना महिला शक्तीचा जागर मेळावा

संवेदना फाउंडेशन आजरा मार्फत खास महिला दिनानिमित्त दिनांक १२ मार्च रोजी गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे ग्रामविकास व महिला सशक्तिकरण प्रबोधनात्मक व्याख्यान व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. गीता पोतदार या होत्या .प्रास्ताविकात सौ. भारती चव्हाण यांनी संवेदनाच्या विविध उपक्रमांचा आढावा विस्तृतपणे मांडला.त्यानंतर एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात चौथी आलेली कु. श्रद्धा चव्हाण व वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेली कु. तेजस्विनी चव्हाण त्याचबरोबर आशीयाई क्रॉस कंट्री स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेते कु. सृष्टी रेडेकर या यशस्वी मुलींचा सत्कार यावेळी करण्यात आला .त्याचबरोबर उत्तुर येथे लागलेली आग विझवण्यासाठी श्री. गिरीश प्रकाश कुंभार यांनी दाखवलेले धैर्य आणि निरपेक्ष भावनेने केलेले काम करत असताना त्याचे जे आर्थिक नुकसान झाले होते. त्याबद्दल संवेदना फाउंडेशन कडून गिरीशला पाच हजार रुपये आर्थिक मदत व सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या सरिता राऊत यांनी आपल्या व्याख्यानात स्त्रियांचे हक्क ,अधिकार, कर्तव्य, जाणीव ,स्त्रीशक्तीचे महत्त्व आधी विषयावर आजरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत महिला सरपंच व सदस्या, नगरसेविका यांना मार्गदर्शन केले. यावेळी आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी उपस्थित होत्या.

दुसऱ्या चर्चासत्रामध्ये निर्मलग्राम, स्मार्ट ग्राम पुरस्कार विजेते ग्रामसेवक श्री.वैभव गुरव व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त श्री.मुरली कुंभार यांनी परिसंवादामध्ये ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

यावेळी आदर्श नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. या महिला मेळाव्यामध्ये आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या २०० महिला सदस्य यांनी सहभाग घेतला.

अध्यक्षीय मनोगतांमध्ये सौ.गीता पोतदार यांनी महिलांना ‘स्व’ची जाणीव होण्यासाठी महिला मेळावा आयोजित करणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले .

या कार्यक्रमाला सौ. धनश्री देसाई,सौ भैरवी सावंत, सौ.आसावरी मुणनकर,सौ. मिलन केसरकर, सौ.वर्षा होडगे आदी महिला सदस्य व संवेदना सदस्य तसेच टिम महिला शक्तीचे प्रमुख श्री.समीर चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले .

आभार सौ. समिधा देशमुख यांनी मानले. सूत्रसंचलन डॉ. पल्लवी कांबळे यांनी केले.

 

संबंधित पोस्ट

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!