



विजेचा धक्का बसून आज-यात एकाचा मृत्यू

शेतीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या चाफे गल्ली आजरा येथील प्रकाश सदाशिव शिवगंड या ५५ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागू मृत्यू झाला.
शिवगंड हे आज दुपारी शेताला पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.



आजरा येथे आज आमदार आबीटकर यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका…

आजरा येथे आज शनिवार दिनांक ४ मार्च रोजी आमदार प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते विविध विकास कामाच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.४ रोजी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आजरा तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी अकरा वाजता आजरा येथील माहेर हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे उद्घाटन त्यानंतर दुपारी बारा वाजता आवंडी धनगर वाडा क्रमांक तीन येथे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण, सामाजिक सभागृहाचे उद्घाटन, अंगणवाडी लोकार्पण, अंगणवाडी वाडा क्रमांक तीनचे भूमिपूजन, जलजीवन योजना वाडा क्रमांक तीन चा शुभारंभ करण्यात येणार आहे. एरंडोळ येथे दुपारी दोन वाजता गांधीनगर- पोळगाव या मार्गाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याचवेळी बुजवडेकडे जाणाऱ्या रस्त्याचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पासून ते शाळेपर्यंतच्या अंतर्गत रस्ता या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. याचबरोबर ग्रामपंचायतच्या इमारत विस्तारित कामाचा शुभारंभही करण्यात येणार आहे. मागासवर्गीय वस्ती मधील ब्लॉक बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
पेरणोली येथे सायंकाळी पाच वाजता एकता सहकारी गृहतारण संस्थेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर रवळनाथ मंदिर सुशोभीकरण, तलाठी कार्यालय, जलजीवन योजना, पाझर तलाव, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत नावलकरवाडी येथील रस्ता, धनगरवाडी रस्ता, धनगर वाडा वीज कामांचे शुभारंभ करण्यात येणार आहेत. याचबरोबर मसोली येथे रात्री सात वाजता जलजीवन योजना, अंतर्गत रस्ते, मागासवर्गीय समाज मंदिराची सुशोभीकरण अशा विविध कामांची आयोजनही करण्यात आले आहे.

माहेर मल्टी- स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आज शुभारंभ

आजरा येथील माहेर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ आमदार प्रकाशराव आबीटकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ. बर्नाड गॉडद व डॉ. सौ. बर्नडेट गॉडद यांनी दिली.
आजरा तालुकावासीयांची या योजनेला सुरुवात व्हावी अशी कित्येक दिवसांची मागणी आज प्रत्यक्षात अमलात येत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक विविध सेवा उपलब्ध होणार आहेत.सदर कार्यक्रमास आज-याचे तहसीलदार विकास अहिर, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, शिवसेनेचे नगरसेवक संभाजी पाटील, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, माजी सभापती उदय पवार, भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपतराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माहेर हॉस्पिटल येथे सदर कार्यक्रम शनिवार दिनांक ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला असल्याचेही डॉक्टर गॉडद यांनी सांगितले.




