mrityunjaymahanews
अन्य

आजरा जनता बँक निवडणूक बिनविरोध


 

 

 आजरा जनता बँक निवडणूक बिनविरोध

आजरा येथील जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बहुतांशी इच्छुक उमेदवारांनी समजूतदारपणा दाखवत बँकेवरील निवडणूक खर्चाचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने घेतलेल्या भूमिकेने निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग खुला झाला. बँकेच्या स्थापनेपासून प्रथमच निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे…..

सर्वसाधारण प्रतिनिधी :-

देसाई रणजीत नारायण (सुलगाव)

देसाई मुकुंद बळीराम(आजरा)

शिंपी जयवंत गुंडोपंत(आजरा)

कोडक जयवंत गणपतराव(पेरणोली)

नाईक बाबाजी भाऊ(आजरा)

नार्वेकर शशिकांत सूर्याजी(पोळगाव)

सामंत अमित रमेश(आजरा)

टोपले महादेव केशव(आजरा)

पाटील शिवाजी धोंडीबा(आजरा)

देसाई विक्रमसिंह मुकुंद(आजरा)

महिला राखीव प्रतिनिधी:-

देसाई रेखा सुरेश(वाटंगी)

केसरकर नंदा निवृत्ती(साळगाव)

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी :-

कांबळे महेश दिनकर(आजरा)

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग :-

तोरगले पांडुरंग शंकर (मासेवाडी)

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :-

पाटील संतोष मारुती(पारपोली)

जयवंतराव शिंपी यांची भूमिका महत्त्वाची ठरली…

निवडणुकीमध्ये विविध गटांनी व नेते मंडळींनी आपआपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. तर काही इच्छुकांनी आपणाला संधी मिळणार असे गृहीत धरून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये जयवंतराव शिंपी यांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती अखेर शिंपी यांच्या भूमिकेनंतर इच्छुकांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेऊन निवडणूक बिनविरोध पार पडण्यास सहकार्य केले.

निवडणुक प्रकिया बिनविरोध पार पडल्याने विद्यमान अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्यावर सभासदांनी विश्वास दाखवल्याचेही पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे .

दीपक देसाई आक्रमक…

पेरणोलीचे दीपक देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणुकीला सामोरे जाणार असे स्पष्ट करून माघार प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला ठेवले होते. अखेर जनता बँकेच्या कारभाऱ्यांना त्यांचे मन वळविण्यात यश आल्याने शेवटच्या क्षणी देसाई यांनी माघार घेतली यामुळे इतर बिनविरोध च्या वाटेवर असणाऱ्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मेंढोली येथे शेतकऱ्याचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातला बातमी… एक वाजता स्टॅन्ड चकाचक

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!