mrityunjaymahanews
अन्य

पतीच्या निधनापाठोपाठ पित्याचेही निधन…

पतीच्या निधनापाठोपाठ पित्याचेही निधन
आठवडाभरात दुसरा धक्का…

चार चाकी व दूचाकीच्या झालेल्या अपघातानंतर दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या पती रोहन सदानंद देसाई (रा. वाटंगी ता. आजरा) यांचे निधन झाले. या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत वडील शिवाजीराव माने यांचे निधन झाले. एकीकडे पतीच्या मृत्यूचा धक्का तर दुसरीकडे पित्याचे झालेले निधन अशा नियतीच्या विचित्रतेचा अनुभव सध्या शांभवी रोहन देसाई यांना घेण्याची वेळ आली आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती अशी…
सोमवार दिनांक १९ रोजी आजरा -गडहिंग्लज मार्गावर झालेल्या अपघातात शांभवी यांचे पती रोहन गंभीर जखमी झाले. उपचार करता त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी अनपेक्षित व धक्कादायकरिता मृत्यू झाला.

या धक्कयातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शांभवी यांचे वडील शिवाजीराव केशवराव माने (रा. कोल्हापूर) यांचे देखील शनिवारी रात्री निधन झाले. ते गेले तीन महिने आजारी होते.

शांभवी यांच्या पतीच्या निधनापाठोपाठ पित्याचेही निधन झाल्याने वाटंगीसह आजरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देशाच्या समृद्धीकरणांमध्ये सहकारी चळवळीचा मोठा हातभार : अरुण काकडे

महाराष्ट्रातील सहकार चळवळ समृद्ध व व्यापक बनवण्यासाठी दूरदृष्टी असणाऱ्या अनेक मंडळींनी आपआपल्या परीने योगदान दिले त्यामुळे सहकार चळवळीचा पाया भक्कम होण्यास मदत झाली. ही चळवळ सक्षम होण्यासाठी केवळ संस्था चालकच नव्हे तर संस्थांचे ग्राहक व सभासदांच्याही मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. आपले सभासद अथवा ग्राहक म्हणून संस्थेची दिलेले योगदान काय आहे याचा विचारही सभासदांनी करण्याची गरज आहे. सभासदांचे सहकारी संस्थांमधील योगदान, सहकाराबद्दल असणारे ज्ञान व दूरदृष्टी यावरच सहकारी संस्थांचे भवितव्य अवलंबून आहे. सद्यस्थितीला समृद्धीच्या एका वेगळ्या वळणावर देशाला सहकार चळवळ नेत आहे. विविध प्रकारच्या संस्था देशाला समृद्ध करण्यामध्ये हातभार लावत आहेत असे प्रतिपादन अरुण काकडे, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी केले.

येथील आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आजरा या बँकेच्या वतीने अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृह येथे सभासदांकरिता आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी काकडे बोलत होते.

बँकेची ज्येष्ठ संचालक विलास नाईक यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले.प्रास्ताविकपर भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना धीरज देशपांडे (सी ए ) म्हणाले, ९० च्या दशकानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होत गेले. सध्या संगणकीकरण हा बँकांचा मुख्य पाया राहिला आहे. कोअर बँकिंग प्रणाली या पायावर स्थिरावत चालली आहे. ग्राहक म्हणून आपण कोणत्या दक्षता घ्याव्यात याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या खात्यावरील व्यवहार करताना खात्यासंदर्भातील माहिती इतरांपर्यंत आपण नकळतपणे सहजरित्या शेअर करत जातो. परिणामी आपणाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हॅकर्सचे प्रचंड जाळे आजूबाजूला विस्तारले असून या जाळ्यामध्ये आपण अडकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी ‘काळजीपूर्वक व्यवहार’ हा एकमेव उपाय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. बँकिंग क्षेत्रात होणारी ग्राहकांची फसवणूक व त्यावरील उपाय यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनीही मनोगत व्यक्त केले. चराटी यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अरुण काकडे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी डॉ. दीपक सातोसकर,सुरेश डांग,प्रकाश वाटवे,शैला टोपले यांच्यासह बँकेचे संचालक, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, प्रा. विजय बांदेकर शंकरराव शिंदे, बंडोपंत कातकर, रमेश कारेकर, दत्तात्रय मोहिते, प्रकाश पाटील, पत्रकार समीर देशपांडे, शिवाजी इंजल,रमेश शेट्टी, बंडोपंत चव्हाण, अर्जुन भुइंबर,प्रा. दिलीप भालेराव, सदानंद रोडगी, अमानुल्ला आगलावे प्रा. बाळासाहेब रक्ताडे, शंकर उर्फ भैया टोपले, वासुदेव मायदेव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

उपस्थियांचे स्वागत व आभारप्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले.
सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोइलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रशांत गंभीर यांनी आभार मानले.

स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना आजरा भाजपाच्यावतीने आदरांजली

भारतरत्न व भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आजरा तालुका भाजपा कार्यालयात यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजपाचे नेते आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बापू टोपले, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष व आजरा साखर कारखाना संचालक जनार्दन टोपले,अरुण देसाई,नगरसेवक आनंदा कुंभार,अभी इंजल, उदयराज चव्हाण, राजेंद्र चंदनवाले, दिगंबर सुतार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

देवकांडगाव येथून वृद्ध बेपत्ता

देवकांडगाव (ता. आजरा) येथून राजाराम रामचंद्र देसाई (वय ९२) हा वृद्ध बेपत्ता झाला असून त्यांचा शोध सुरू आहे. शनिवार दिनांक १७ डिसेंबर रोजी देवकांडगाव येथून कोणालाही न सांगता देसाई हे घरातून निघून गेले आहेत.ते अद्याप परतले नाहीत अशी वर्दी सदानंद राजाराम देसाई यांनी आजरा पोलिसात दिली असून त्यांचा शोध सुरू आहे.

छाया वृत्त :-

सुलगाव (ता. आजरा) येथे गोव्याच्या दिशेने जाणारी चारचाकी रविवारी पहाटे सव्वापाच वाजता धुक्यामुळे चालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटी झाली. यामध्ये चौघे जण जखमी झाले आहे. जखमी है घाटकोपर- मुंबई येथील आहेत. त्यांच्यावर गडिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

 

 

संबंधित पोस्ट

उमेश आपटे यांचा राष्ट्रीय काँग्रेसला रामराम

mrityunjay mahanews

सातला बातमी… एक वाजता स्टॅन्ड चकाचक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकर आक्रमक…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!