mrityunjaymahanews
अन्य

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे : बजरंग दल,मनसे व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक

आजऱ्यातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व येथे भोजनानंतर धबधब्याच्या पाण्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी हात धुतले अशी आख्यायिका असणाऱ्या श्री रामतीर्थ येथे नदीपात्रामध्ये लघुशंका  करणे, परिसरात प्रेमी युगलांची लुटमार करणे, मांसाहारी जेवण बनवून पार्टी करणे, मासेमारी करणे, दारू पिणे,, दमदाटी यासारखी गैरकृत्ये  करून देवस्थान बदनाम करण्याचा कट काही मंडळींकडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप करत आज बजरंग दल, मनसे व शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आजरा तहसीलदारांसह आजरा नगरपंचायत व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना हे प्रकार थांबवण्यासंदर्भातील निवेदन दिले आहे.

रामतीर्थ या ठिकाणी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. सदर प्रकार जेव्हा त्यांच्या नजरेस येतो तेव्हा ती मंडळी नाराज होऊन निघून जातात, प्रामुख्याने या पर्यटक मंडळींवर तेथील उपजीविका करणार-या  व्यावसायीकाना त्याचा चांगलाच फटका बसत आहे त्याचबरोबर रामतीर्थ व आजरा नगरीचे नाव खराब होत आहे. सदर प्रकार आज-यामधील स्थानिक रहिवाशांनी व  कार्यकत्यांनी सांगूनही हा प्रकार पुन्हा पुन्हा, घडत आहेत. यावर चांगलाच वचक बसवावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

आजरा अर्बन ‘ मार्फत रविवारी सभासदांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आजरा, या मल्टीस्टेट बँकेच्या वतीने आजरा परिसरातील सभासदांकरिता रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधीमध्ये सभासद प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे व उपाध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी दिली .

प्रशिक्षणाचे उद्घाटन सहकारी संस्था कोल्हापूर चे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी सहकारातून समृद्धीकडे, सुरक्षित आर्थिक व्यवहार, आर्थिक साक्षरता या विषयावर धीरज देशपांडे (सी.ए.) व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर हे मार्गदर्शन करणार आहेत. आजरा येथील अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये सदर कार्यक्रम होणार असल्याचेही डॉ. देशपांडे व कुरुणकर यांनी स्पष्ट केले आहे.

💫💫सॅम कुरन IPL चा सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने १८.५० कोटींना घेतले विकत

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव शुक्रवारी (२३ डिसेंबर) कोची येथे सुरू झाला. लिलावात इंग्लंडच्या सॅम कुरनने (Sam Curran) सर्व विक्रम मोडीत काढले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २ कोटींची मूळ किंमत असलेल्या सॅम करणला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी के.एल. राहुल (१७ कोटी रुपये) हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. लखनौ सुपरजायंट्सने गेल्या वर्षी मसुद्याद्वारे त्याचा संघात समावेश केला होता. दुसरीकडे, लिलावाबद्दल बोलायचे तर, दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी रुपये) सर्वात महागडा खेळाडू ठरला. सॅम करण याआधी पंजाब किंग्जकडून खेळला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जकडूनही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकवर पैशांचा वर्षाव करून सर्वांनाच चकित केले. त्याने हॅरी ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. ब्रूकची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती. हॅरी ब्रूकबद्दल सांगायचे तर, त्याने इंग्लंडसाठी २६ जानेवारी २०२२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला. त्याने आतापर्यंत २० सामन्यांच्या १७ डावात ३७२ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८१ आहे. ब्रूकची सरासरी २६.२५ आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १३७.७८ आहे.

सनरायझर्सने मयंकला आठपट जास्त किंमत दिली

सनरायझर्स संघ एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी मयंक अग्रवालसाठीही मोठी बोली लावली. मयंकची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. सनरायझर्सने त्याला आठपट जास्त पैसे देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. सनरायझर्सने मयंकला ८.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. तो संघाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो.

विल्यमसनवर पहिली बोली

न्यूझीलंडचा दिग्गज आणि सनरायझर्स हैदराबादचा माजी खेळाडू केन विल्यमसनची लिलावात पहिली विक्री झाली. त्याला गुजरात टायटन्सने केवळ २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. गुजरातशिवाय अन्य कोणत्याही संघाने विल्यमसनसाठी बोली लावली नाही. त्याचवेळी अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने ५० लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले.(source:-wp news)

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुडाळनजीक दुचाकी अपघातात कानोली येथील तरुण ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

आल्याचीवाडी येथे मारहाणीत एक जखमी… देवर्डे येथे हत्तीकडून नुकसान… रामतीर्थयात्रा आजपासून सुरू.. एस.टी.सुविधा नाहीच..

mrityunjay mahanews

डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही : खा. प्रा.संजय मंडलिक

mrityunjay mahanews

उचंगी येथे काजूच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!