mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

उत्तूरला चोरट्यांचा हवेत गोळीबार ; सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला

 

उत्तूरला चोरट्यांचा हवेत गोळीबार ; सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला

    उत्तूर (ता.आजरा ) येथे सायंकाळी  ७.३० वाजता दिनकर लहू कुंभार या सराफाला अज्ञात तीन चोरट्यानी लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरीक जमा झालेने एका चोरट्यानी हवेत गोळीबार केला. यावेळी झालेल्या झटापटीत सुशांत आपके हा युवक व स्वतः  कुंभार जखमी झाले. नागारीकानी एका चोरट्याला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.  याबाबत रात्री उशीरा पर्यंत  आजरा पोलीसात घटनेची नोंद करणेचे काम सुरु होते.
‌ याबाबत मिळालेलीअधिक माहिती अशी की,
कुंभार यांचे नेहरु चौकानजीक श्री अवधुत ज्वेलर्स नावाचे सोने चांदी विक्रीचे दुकान आहे.  सायंकाळी  साडेसात वाजता ते दुकान बंद करुन घरी चालले होते. त्यानी एका पिशवीत सोन्याचे व दुस-या पिशवीत चांदीचे दागीने भरले होते. दोन्ही बॕगा त्यानी दुकानाबाहेर ठेवल्या व दुकानाला कुलूप लावून जात असताना दुकानासमोर पल्सर मोटरसायकलवर थांबलेले  अज्ञात तिघे युवक  त्यांच्या दिशेने धावत आले व त्यांच्या  हातातील बॕग हिसकावून घेवू लागले.यावेळी  झटापट होवून एका चोरट्याने चांदीचे दागीने असलेली बॕग हिसकावून घेतली. सोने असलेली बॕग कुंभार यानी छातीशी घट्ट पकटून ठेवली. यावेळी चोरट्यानी पिस्तुलच्या मागच्या बाजूने कुंभार यांच्या पाठीत मारले.कुंभार यानी आरडाओरडा  सुरु केलेने नागरीक जमा झाले. यावेळी सुशांत आपके या युवकाने मोठ्या धाडसाने एका चोरट्याला पकडून ठेवले. यावेळी इतर दोघांनी सुशांतच्या डोकीत मारहाण केली.
यामध्ये तो गंभीर जखमी झाला.  तोंडावर ठोसे मारल्याने एक दात पडला.  यावेळी इतर युवक जमा होवून त्या चोरट्याला पकडून त्यांचे हात पाय बांधले. आपल्या सहका-याला पकडल्याचे लक्षात येताच इतर दोघानी पोबारा केला. जाताना त्यानी हवेत गोळीबार केल्याने  भितीचे वातावरण तयार झाले.दरम्यान याबाबात पोलीसाना माहीती देण्यात आली पोलीसानी घटनास्थळी जावून एका युवकाला एक पिस्तूल व एक काडतूससह ताब्यात घेतले.   पोलीसानी बराच प्रयत्न करुन त्याचे नाव माहित घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने आपले नाव व पत्ता सांगितला नाही. घटनेनंतर नागरीकानी उत्तूर औट पोस्ट पोलीस दुरक्षेत्र समोर गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत या घटनेची आजरा पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते.
——————
कुंभार यांचे दुकान चोरट्यांकडून ‘टार्गेट’

 

कुंभार यांच्या दुकानात यापुर्वी दोन वेळा चोरी झाली होती. कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागीने लंपास केले होती. या घटनेचा अद्याप तपास लागला नाही.  यावेळी चोरट्यानी दुकानाची रेकी करुन त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकांनी दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रयत्न असफल झाला.
——————-
तरुणांचे धाडस…

 

सुशांत आपके, विश्वास उत्तूरकर , बाळासाहेब  कुंभार,उत्तम उत्तूरकर ,विजय उत्तूरकर ,विश्वजित उत्तूरकर ,उदय कुंभार  या तरुणांनी धाडस दाखवून चोरट्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
———–


 

संबंधित पोस्ट

आजऱ्यात जिल्हा बँकेकरिता कांटे की टक्कर …’ डी फॅक्टर’चा फॉर्म्युला सुरू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष आजरा परिवर्तन विकास आघाडी

mrityunjay mahanews

आजरा आंबोली मार्गावर गव्याची कारला धडक… दानोळी (चंदगड )येथे ६३ लाख ६९ हजार रूपयांची विज चोरी उघडकीस… जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!