mrityunjaymahanews
अन्य

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक : आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

 

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक…

आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करून देतो असे सांगून आजरा येथील विजयकुमार लक्ष्मण पाटील व विलास अण्णासो नाईक यांची आठ लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्या बद्दल विजयकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोलाराम रामेश्वर चव्हाण   ( रा. चिखलदरा, पोस्ट गिरडा ता. मंगरूळपिर जिल्हा वाशिम ) व भारत हिरा राठोड (रा. मिलडोंगर, ता. मानोरा जिल्हा वाशिम) या दोघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 2 ऑगस्ट 2021 रोजी आजरा येथे पाटील व नाईक यांनी चव्हाण व राठोड या तोडणी यंत्रणा ठेकेदारांना तोडणीसाठी रोख रक्कम रुपये पन्नास हजार व  त्यानंतर  टप्प्याटप्प्याने असे आठ लाख साठ हजार रुपये पुरविले. वेळोवेळी या संदर्भात विचारणा केली असता ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून त्यांनी सदर पैसे न देता संबंधित फिर्यादी यांची फसवणूक केली आहे दोघांविरोधात पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रविवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!