mrityunjaymahanews
अन्य

डॉ. सोमशेट्टी यांचे निधन

 

डॉ. सोमशेट्टी यांचे निधन

आजरा येथील सुप्रसिद्ध डॉ. महादेव गुरुलिंग सोमशेट्टी (वय 77)यांचे आकस्मित निधन झाले.

डॉ. सोमशेट्टी हे येथील आजरा अर्बन बँकेचे माजी चेअरमन होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुली, जावई,सुना नातवंडे असा परिवार आहे.तालुक्यातील वैद्यकीय वर्तुळात त्यांना आदराचे स्थान होते.

….

उत्तूर, वाटंगी पंचायत समिती   मतदारसंघ आरक्षित

इतर मागास प्रवर्गासाठी वाटंगी तर उत्तूर हा मतदारासंघ अनुसूचित जाती  प्रवर्गासाठी राखीव घोषित झाला आहे.

आजरा तालुक्यातील सहा पंचायत समिती मतदारसंघाकरीता झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये पेरणोली मतदारसंघ खुल्या प्रवर्गा करता जाहीर  झाला आहे. इच्छुकांची संख्या मोठी असणाऱ्या उत्तूर पंचायत समिती मतदारसंघाकरिता मात्र अनु.जाती प्रवर्गाकरीता आरक्षण आल्याने खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार विकास अहिर व देखारेख अधिकारी शक्ती कदम  यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीनुसार मतदारसंघनिहाय परिस्थिती पुढील प्रमाणे राहणार आहे :-

उत्तूर पंचायत समिती-अनु.जाती प्रवर्ग,

पेरणोली पंचायत समिती मतदारसंघ-  सर्वसाधारण, भादवण पंचायत समिती मतदारसंघ- सर्वसाधारण महिला, 

गजरगाव पंचायत समिती मतदारसंघ-सर्वसाधारण महिला, 

वाटंगी पंचायत समिती मतदार संघ-नागरिकाचा मागास प्रवर्ग,

भादवण पंचायत समिती मतदारसंघ -सर्वसाधारण महिला,

कासार कांडगाव पंचायत समिती मतदारसंघ -सर्वसाधारण महिला

 

जि. प.आरक्षण

कोळींद्रे जि.प. -सर्वसाधारण प्रवर्ग

पेरणोली जि.प.-

सर्वसाधारण महिला

उत्तूर जि.प.-नागरिकांचा मागास प्रवर्ग

निधन  वार्ता

 

भारती गुंजाटी यांचे निधन

 

आजरा येथील सौ.भारती संगम गुंजाटी (वय 58) यांचे अकस्मित निधन झाले.आजरा येथील ज्येष्ठ व्यापारी संगम गुंजाटी यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

अर्बन बँक झाली… जनता बँकही झाली तालुका खरेदी विक्री संघ व आजरा साखर कारखान्याच्या बिनविरोधचे काय…???

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात चोरी… सोन्या चांदीचे दागिने लंपास

mrityunjay mahanews

उचंगी प्रकल्पस्थळी १४४ कलम.. प्रशासन आक्रमक.. मारुती भाटले यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!