mrityunjaymahanews
अन्य

शेतकऱ्याच्या सोळा बकऱ्यांवर अज्ञातांनी मारला डल्ला… सुळे येथील प्रकार…

 

 

शेतकऱ्याच्या सोळा बकऱ्यांवर अज्ञातांनी मारला डल्ला… सुळे येथील प्रकार…

 

सुळे (ता. आजरा) येथील दशरथ भीमा फडके यांच्या मालकीच्या झरा नावाच्या शेतातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपये किंमतीच्या सोळा बक-या रातोरात चोरून नेल्या. याबाबतची फिर्याद आजरा पोलिसात देण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत.

 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सुळे येथील दशरथ फडके हे शेळी पालन करतात. त्यांच्या मालकीच्या गोठ्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी गुरूवार दिनांक १४ जुलै सायंकाळी सात वाजता ते दिनांक १५ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर बकरी चोरून नेली. या बकऱ्यांची अंदाजे किंमत रुपये ६८ हजार ५०० इतकी आहे.

 

 

गवसे येथे हत्तिकडून शेड उध्वस्त…
तीन गाड्यांचे नुकसान

गवसे तालुका आजरा येथे गुरुवारी रात्री  आंबोली रस्त्यावर तुलसी धाब्यानजिक असणार्‍या रमेथ फर्नांडीस यांच्या घराचे घरासमोरील गाड्या लावण्याचे शेड उध्वस्त करून त्यामधील छोटा हत्ती या वाहनासह चार चाकीला धडक देऊन पलटी मारली तर इतर दोन दुचाकींचे मोठे नुकसान केले आहे.

याबाबत फर्नांडिस यांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री हत्तीने आजरा आंबोली मार्गावरील तुलसी  धाब्यानजीक असलेल्या त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला व घरासमोर असणारे गाड्या लावण्याची शेड ढकलून पाडले. याचबरोबर शेडमध्ये असणारी छोटा हत्ती ही गाडी देखील धडक मारून पलटी केली. त्यानंतर येथील दोन दुचाकी वाहनांचे नुकसानही केले आहे. या प्रकाराने गवसे भागात घबराहट पसरली असून हत्तीचाचा बंदोबस्त होणार तरी कधी? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 

संबंधित पोस्ट

हात्तीवडे येथे महिला नदीत बुडाली…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!