mrityunjaymahanews
गुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

पंजाब येथील  एक कोटीच्या दरोडा  प्रकरणातील चार आरोपीना आजऱ्यात अटक…विनयभंग प्रकरणी मुम्मेवाडी येथील एकाविरोधात गुन्हा नोंद

पंजाब येथील  एक कोटीच्या दरोडा  प्रकरणातील चार आरोपीना आजऱ्यात अटक….

 

पोलिसांची धाडसी कारवाई

पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे कोल्हापूर यांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाब राज्यातील डेराबसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जागा खरेदी विक्री व्यवसायाचे ऑफिसवर दरोडा टाकुन तेथील एका इसमावर गोळ्या घालुन गंभिर जखमी करुन, ऑफिसमध्ये धाडसी दारोडा टाकुन एक कोटी रुपये रक्कम लुटुन नेेले.त्यांच्या सूचनेनुसार कारवाई करत चौघांना पोलिसांनी आजऱ्यात ताब्यात घेतले.  डेराबसी पोलीस ठाणे येथे सदर गुन्हा नोंद आहे.

आज दिनांक १९/०६/२०२२ रोजी या गुन्हयातील चार आरोपी हे पांढ-या रंगाची कोरोला (गाडी क्र.एच आर ७० डी ३०८३) या गाडीतुन ते पुणे- बेंगलोर हायवे रोडने कोल्हापूरचे दिशेन आलेले आहेत. त्याचेकडे हत्यारे असण्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली, सदरची गाड़ी ही हायवे रोडने गोव्याचे दिशेन जात असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी सदर आरोपीना ताब्यात घेणे बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले याना सुचना दिल्या.

पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शना प्रमाणे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यानी त्याबावत कागल पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जाधव यांना कोगनोळी टोल नाका या ठिकाणी नाकाबंदी करणेस सुचना दिल्या व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गोर्ले, सहा पोलीस निरीक्षक किरण भोसले व पथक असे हायवेरोडने कोगनोळी टोल नाका येथे तात्काळ पोहचले. त्यावेळी सदरची गाडी ही काही वेळापुर्वीच कोगनोळी टोल नाका येथुन दिशेन पास झाल्याचे समजून आले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी आजरा पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांना सदर गाडीचे वर्णन व त्यातील आरोपी यांचेकडे हत्यारे असण्याची दाट शक्यता असुन योग्यती सावधगीरी घेवुन गोव्याकडे जाणारे मार्गावर नाकाबंदी करणे बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे आजरा पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे व त्यांचे पोलीस ठाणे कडील पाच अमलदार यांनी मुमेवाडी फाटा येथे नाकबंदी सुरु केली. दरम्यान त्याना दिलेल्या वर्णनाची गाडी दिसुन येताच सुनिल हारुगडे व त्यांचेकडील पथकाने अत्यंत धाडसाने सदरची गाडी आडवुन त्यांना पकडुन ताब्यात घेतले. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक त्या ठिकाणी पोहचले. सदरची गाडी ही हरियाणा राज्यातील असुन सदरचे आरोपी हे डेराबसी पोलीस ठाणेत दाखल गुन्हयातील १) अभय प्रदिप सिंग (वय २० रा.बांध ता. इश्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाण) २) आर्य नरेश जगलान (वय २० रा. इश्राना जिल्हा – पानिपत राज्य हरियाणा) ३) महिपाल बलजित झगलान (वय ३९ रा. इत्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाणा) ४) सनि कृष्ण झगलान (वय १९ रा. इश्राना जिल्हा पानिपत राज्य हरियाणा) असल्याची खात्री झाल्याने त्याना आजरा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने  ताब्यात घेवुन कोल्हापूर येथे आणले. व सदरचे आरोपीला पुढील योग्यत्या कारवाई करीता पंजाब येथुन आलेल्या पोलीस पथकातील डेराबसी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी ए.आय. जसकमल शेखो यांचेसह त्यांचे पथकाचे ताव्यात देण्यात आले.

मा. पोलीस अधीक्षक कोल्हापुर, यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गोर्ले यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे आजारा पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी व त्यांचेकडील पथकातील अमंलदार सहा. फौजदार विरप्पा कोचरगी, राजेश आंबुलकर, निरंजन जाधव, अमोल पाटील यांनी केलेल्या अत्यंत साहसी व धाडसी कारवाई केल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक कोल्हापुर यांनी त्याना १०,०००/- रोख बक्षीस जाहिर करुन कोल्हापूर पोलीसांचे कौतुक करण्यात आले.

विनयभंग प्रकरणी मुम्मेवाडी येथील एकाविरोधात गुन्हा नोंद

मुम्मेवाडी( ता. आजरा) येथील 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिल गंगाराम कांबळे ( रा. मुम्मेवाडी तालुका आजरा) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित महिला व अनिल कांबळे एकाच गावात शेजारी- शेजारी राहण्यास येथीलआहेत दिनांक 19 रोजी कांबळे हे संबंधित महिलेच्या घरामध्ये घुसून त्यांच्या पतीसह त्यांना शिवीगाळ करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

संबंधित पोस्ट

शेवटी ‘आपुनका राज है …’ संडे का फंडा

mrityunjay mahanews

जिल्हा बँक निवडणुकीतील चुरस वाढली निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शिवसेनेची विजयादशमी ! दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाने शिंदे गट आणि पालिकेची याचिका फेटाळली शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा मानला…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!