mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

गच्चीवरून पडून आजऱ्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

 

 

गच्चीवरून पडून सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

 

 

आजरा येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकारी शिवाजी  खंडू पाडेकर ( वय 62, रा.सिद्धिविनायक कॉलनी,आजरा) यांचा रहात्या घरावरील गच्चीतून खाली पडुन मृत्यू झाला.रविवारी पहाटेच्या सुमारास सदर घटना घडली.

याबाबत पोलीस व पाडेकर कुटुंबियांकडून  मिळालेली माहिती अशी की,आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील पाडेकर कुटुंबीय गेली कांही वर्षे  आजरा येथे वास्तव्यास आहेत.दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पाडेकर यांना शनिवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने ते गच्चीवर  झोपण्यासाठी गेले होते.दरम्यान त्यांचा रात्री गच्चीवरून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी पाडेकर हे मद्याच्या नशेत गच्चीवरून खाली पडले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

याबाबतची फिर्याद प्रमोद केसरकर (रा. किणे )यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

विजेच्या तारांना चिकटून माकडाचा मृत्यू

 

 

आजरा बसस्थानकानजीक असणाऱ्या विद्युत खांबावरील तारांना चिकटून विजेचा धक्का बसून  माकडाचा मृत्यू झाला. सायंकाळी  7 वाजण्याच्या  सुमारास  घडलेल्या या  घटनेनंतर  कांही  काळ विजपुरवठा खंडीत झाला होता.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे शासनाच्या योजना पतसंस्थेमार्फत राबविणार : आ. प्रकाश आबिटकर….  आजरा येथे ‘कॅश्यू मॅन्युफॅक्चर’च्या कार्यालयाचे उद्घाटन

mrityunjay mahanews

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews

कासारकांडगाव येथे हत्तीकडून चारचाकीचा  चुराडा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

ऊस ट्रॅक्टर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला बेलेवाडी घाटातील प्रकार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!