mrityunjaymahanews
गुन्हामहाराष्ट्र

आजरा अर्बन बँकेला पंधरा कोटी ६ सहा लाखांचा नफा… अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांची माहिती

 

आजरा अर्बन बँकेस १५ कोटी ६ लाखाचा नफा  :
अध्यक्ष डॉ. देशपांडे यांची

माहिती

 

 

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये आजरा बँकेने रु. ११६२.६२ कोटीचा व्यवसाय केला आहे. आर्थिक वर्ष २०२२ अखेर बँकेकडे एकूण ठेवी रू.७२० कोटी ७५ लाखाच्या झाल्या असून एकूण कर्ज पुरवठा रु.४४१ कोटी ८७ लाख इतका आहे. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असून देखील बँकेच्या व्यवसाय वृद्धीवर फारसा परिणाम झालेला नाही. गत आर्थिक वर्षात पंधरा कोटी ६ सहा लाखांचा नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे यांनी आहे..

बँक म्हणजेच विश्वास. हा ‘विश्वास’ सार्थ ठरवत ग्राहकांनी या आर्थिक वर्षात बँकेकडे व्यक्तिगत ७० कोटींनी ठेवी मध्ये वृद्धी झाली आहे. तसेच या वर्षात १०० कोटी इतक्या कर्जाचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे घर बांधकाम खरेदी यासाठी गरजू सभासदांना १५ कोटीची कर्जे कमी व्याजदराने उपलब्ध करून दिली आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना या बँकेमध्ये सुरू असून त्या योजनेमध्ये खाद्य उद्योगाच्या संबंधितांनी केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याचा लाभ उद्योजकांनी घेतला आहे. राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या ०% व्याजाच्या योजनेमध्ये १०० तरुण उद्योजकांनी लाभ घेतला आहे. सर्व जगभर कोविडच्या प्रभावामुळे व्यवहार थांबले होते. असे असताना देखील बँकेच्या सर्व संचालक आणि कर्मचारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नाने बँकेचे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण हे ०% झाले आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी दिली.

बँकेमध्ये सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध असून, पुढील महिन्यात यूपीआय सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. याच बरोबर सभासद यांचे आर्थिक ज्ञान वाढावे यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन या आर्थिक वर्षात विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. बँकेमध्ये छोट्या कर्जाचे म्हणजे रु.२५ लाखाच्या आतील एकूण कर्जाशी प्रमाण है ६८% इतके आहे.

कै. काशिनाथअण्णा आणि कै. माधवराव देशपांडेभाऊ यांनी छोट्या लोकांना आपल्या प्रापंचिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या बँकेची स्थापना केली आणि हेच या बँकेचे वैशिष्ट्य आहे. आणि ही परंपरा आज देखील विद्यमान संचालक मंडळाने राखली आहे. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व बँकेचे संचालक म्हणून मा.श्री. अशोक चराटी यांचे मार्गदर्शनाने या मार्गावर ध्येयाप्रती वाटचाल सुरू आहे.

अद्ययावत तंत्रज्ञान, समाधानी ग्राहक आणि लोकहिताला प्राधान्यक्रम हे ध्येय समोर ठेऊन आज बैंक कार्यरत आहे. या प्रयत्नाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन या निमित्ताने संस्था प्रमुख व बँकेचे संचालक श्री. अशोक चराटी यांनी केले.

याप्रसंगी  बँकेचे व्हा. चेअरमन श्री. किशोर भुसारी यांच्यासह सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर उपस्थित होते.

……..

 

डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक भरतीतील पाच जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अंजुमन इत्तेहादुल इस्लाम, आजरा संचलित डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा   या शैक्षणिक संस्थेमध्ये चुकीची माहिती देऊन नोकर भरती केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक (माध्यमिक) जिल्हा परिषद , कोल्हापूर यांनी नुकतेच दिले आहेत.

या शाळेबाबत अधीक्षक धर्मादाय सहआयुक्त, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी दिलेल्या पत्रानुसार अंजुमन इत्तेहादुल इस्लाम या संस्थेच्या पीटीआर उताऱ्यामध्ये सन 1999 ते 2004 पर्यंत च्या विश्वस्त बदलाची नोंद दिसून येते. तिथून पुढे कोणतीही नोंद दिसून येत नाही. संस्था कार्यकारिणी अस्तित्वात नसताना मुख्याध्यापक, व प्रेसिडेंट यांनी खोटी कागदपत्रे जोडून श्रीमती शाहिस्ता यासीन शेख यांचा विनाअनुदानित पदावरून अनुदानित पदावर मान्यतेबाबतचा प्रस्ताव सादर केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला मुख्याध्यापक, लिपिक प्रेसिडेंट, सूचक व अनुमोदक यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. त्यामुळे शेख यांची नियुक्ती मान्यता रद्द करण्यासह उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी या प्रकरणातील संबंधित पाच जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश एकनाथ  आंबोकर यांनी दिले आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी नुकतेच दिले आहेत.

1952 साधी स्थापन झालेल्या या संस्थेच्या शिक्षक भरती प्रकरणावरून व अंतर्गत वादातून संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.

 

आजऱ्यात आज  रंगपंचमी

 परंपरेनुसार आजरा शहरामध्ये आज शुक्रवार दिनांक 1 एप्रिल रोजी रंगपंचमी होणार आहे.रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

संबंधित पोस्ट

आजरा छेडछाड प्रकरणी दोघाना अटक. – दोन दिवसांची पोलीस कोठडी.

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लढण्याचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात : सूर्यकांत नार्वेकर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!