
सहकाराला विश्वासार्हता देण्याचे काम आजरेकरानी केले… माजी खासदार धनंजय महाडिक
‘स्वामी विवेकानंद’च्या सुवर्ण महोत्सवी लोगोचे अनावरण उत्साहात
आजरा तालुक्यात सहकारी संस्था या आदर्शवत आहेत . अनेक मंडळीनी मोठ्या त्यागातून या संस्था उभ्या केल्या आहेत. नागरिकांनी दिलेल्या विश्वासार्हतेमुळे या संस्था प्रगतीपथावर पोहोचल्या आहेत.ही विश्वासार्हता कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खासदार महाडिक बोलत होते .
प्रास्ताविकपर भाषणात अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी संस्थापक संचालक हरी नार्वेकर, बापू (तुकाराम)कोटकर, काशिनाथ तेंडुलकर यांच्यासह बापू टोपले, संस्थापक संचालक व संस्थापक सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, सभासदांचा विश्वास संपादन करून सुरु असलेली संस्थेची वाटचाल कौतुकास्पद आहे. आजरा तालुक्यातील सहकार गौरवास्पद कामगिरी करत आहे. यापुढेही अधिक जबाबदारीने काम करावे. बँकाप्रमाणे पतसंस्था ठेवींना संरक्षण देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात माजी खासदार धनंजय महाडीक पूढे म्हणाले, संस्था काढणे सोपे पण त्या टिकवणे व त्यातील अडचणी दूर करणे अवघड आहे. विश्वासार्हतचे बळ आजरा तालुक्याने सहकाराला दिले आहे. आजरा साखर कारखान्याला संस्थेने आर्थिक सहकार्य केल्याबद्दल महाडीक यांनी संचालक मंडळाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, मुकुंदराव देसाई, संभाजी पाटील ,अस्मिता जाधव, सिकंदर दरवाजकर, विजय राजोपाध्ये ,सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार, अबूताहिर तकीलदार, प्रभाकर कोरवी शकुंतला सलामवाडे , बापू कोटकर, काशिनाथ तेंडूलकर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समीर देशपांडे यांनी केले तर उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.
.. ..
आज-यात महाशिवरात्र उत्साहात …

आजरा शहरासह तालुक्यामध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. ठिक-ठिकाणच्या महादेव मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात येऊन मंदिरांमध्ये धार्मिक विधी पार पडले. येथील रामतीर्थ यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे निर्बंध पाळत अनेक भाविकांनी रामतीर्थ परिसराला भेट दिली.
आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. दुपारी पालखी चा कार्यक्रम होणार आहे. तालुक्यातील खेतोबा, गजरगाव येथील लखमेश्वर मंदिर, आजरा येथील महादेव मंदिर येथेही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. आजरा येथील रामतीर्थ यात्रेस प्रारंभ झाला असून कोरोनाचे सर्व निर्बंध पाळत भाविक मोठ्याा संख्येने हजेरी लावत आहेत. आज(बुुुुुध.) दुपारी अडीच वाजता पालखी निघणार आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेला २२ जून दरम्यान प्रारंभ…? चार महिने लाट टिकेल !
संशोधकांच्या अंदाजानुसार २२ जून दरम्यान चौथी लाट सुरू होईल. २३ ऑगस्ट रोजी देशात कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेचा पिक गाठला जाईल आणि २४ ऑक्टोबर रोजी लाट ओसरेल.
लाटेला २२ जूनच्या दरम्यान प्रारंभ होईल आणि ती चार महिने राहील, असा अंदाज आहे. कानपूर आयआयटीच्या संशोधकांनी व्यक्त केला विषाणूचा प्रकार, लसीकरण, जनतेकडून बाळगली जाणारी सावधानता यासारख्या अनेक घटकावर या लाटेची तीव्रता अवलंबून राहील संशोधकांचे म्हणणे आहे.


बोधचिन्ह अनावरणाने स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आज शुभारंभ
….आजऱ्यातील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात पर्दापण करीत आहे. या सुवर्ण महोत्सवी शुभारंभप्रसंगी आज बुधवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात बोधचिन्ह अनावरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आम. प्रकाश आबिटकर तर अध्यक्षस्थानी माजी खासदार धनंजय महाडीक उपस्थित राहणार आहेत. नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, संस्थेचे मार्गदर्शक महादेव उर्फ बापू टोपले, संस्थेचे संस्थापक, सभासद, ग्राहक, हितचिंतक, संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती राहणार आहे.
२ मार्च १९७३ रोजी संस्थेचा पाया ४९ वर्षापुर्वी घातला गेला. कै. कृष्णाजी दत्तात्रय मायदेव, कै. गोविंद रामचंद्र कोंडकर, कै. विश्वनाथ रामचंद्र पेंडसे, कै. दत्तात्रय दाजी येसणे, कै. गणेश लक्ष्मण नुलकर, कै. शंकर रामचंद्र तुरंबेकर, कै. अन्नपुर्णा कृष्णाजी मायदेव, कै. विष्णूपंत गुंडोपंत कारेकर, कै. जगन्नाथ शंकरलाल चिंडक, कै. विठ्ठल बाळा नार्वेकर, कै. बाळकू दाजी येसणे, दिवंगत ज्येष्ठ नेते कै. बाबुरावजी कुंभार यांच्यासह हरी शंकरराव नार्वेकर, तुकाराम रामचंद्र कोटकर, काशिनाथ तेंडूलकर, सुभाष नलवडे, महादेव उर्फ बापू टोपले आणि १५३ संस्थापक सभासद या सर्वांनी मिळून स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे हे रोपटे लावले आणि वाढविले. उत्तम कारभाराची प्रचिती म्हणून नागपूर येथील नचिकेत प्रकाशन, बँको, सर्वोत्तम सेवा कार्य पुरस्काराने संस्थेला गौरविण्यात आले आहे. सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार यांनी मिळालेल्या उत्कृष्ठ व्यवस्थापक पुरस्कारांनी संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
संस्थेनेही काळाची पावले ओळखून सर्व बदल आत्मसात केले आहेत. सर्व शाखा संगणकीकृत, भारतातील सर्व प्रमुख शहरामध्ये डी. डी. मिळण्याची सर्व शाखांमध्ये सुविधा, ऑनलाईन वीज, फोन बील भरण्याची सुविधा, सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी उतरवण्याची सोय, बचत गटांना प्राधान्याने कर्जपुरवठा यासह एनईएफटी, आरटीजीएस, ्क्यु आर कोड, आयएमपीएस, बीबीपीएस, एसएमएस आदी सुविधा संस्थने उपलब्ध करुन दिल्या आहेत. संस्थेने सामाजिक क्षेत्रातही आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, शहीद जवानाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, पुरग्रस्तांना मदत, कोरोना काळात गरजूंना मदत आदी विविध उपक्रम संस्थेच्यावतीने राबविण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षामध्ये महादेव उर्फ बापू टोपले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रगतीचा वेग वाढला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष दयानंद भुसारी, संचालक नारायण सावंत, मलिककुमार बुरुड, रविंद्र दामले, रामचंद्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, सुरेश कुंभार, राजेंद्र चंदनवाले, सौ. प्रेमा सुतार, सौ. माधवी कारेकर, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार, सर्व शाखाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सभासदांचे पाठबळ मिळाले असून संस्था आता १५० कोटींच्या ठेवीचा टप्पा पुर्ण करणार आहे.
——————–
संस्थेची आर्थिक परिस्थिती
संस्थेची माहे ३१ जानेवारी २०२२ अखेर संस्थेचे एकूण सभासद १५५७८, वसुल भागभांडवल ३ कोटी ३१ लाख ५३ हजार ७३०असून एकूण ठेवी रुपये १४७ कोटी २४ लाख ४६ हजार २८३, कर्ज वाटप रुपये १२१ कोटी ७३ लाख ७२ हजार ८७, एकूण व्यवसाय रुपये २७० कोटी केला असून संस्थेची ही आकडेवारीच मजबूत आर्थिक परिस्थितीची साथ देते.

भाषेचे राजकारण करणारे लोक कधीच त्या भाषेवर प्रेम करत नाहीत :प्रा. इंद्रजीत भालेराव

जातीचे राजकारण करणारे कोणत्याच जातीवर प्रेम नसून ते लोकांना फक्त जातियवाद शिकवत असतात. तसच भाषेचे राजकारण करणारे लोक कधीच त्या भाषेवर प्रेम करत नाहीत तर ते भाषेवरील प्रेमाचे भांडवल करत असतात. विचारांचे राजकारण करणारे त्यातल्या त्यात बरे पण काही मंडळी विचारांचा दुराभिमान लोकांमध्ये पसरवत असतात असे प्रतिपादन प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित पाचव्या त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे होते.
दरम्यान सकाळी उत्तूर बस स्थानकापासून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ झाला. यामध्ये उत्तूर येथील शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच वैशाली आपटे, प्रा. इंद्रजीत भालेराव आदींसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘रसग्रहण’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष देशभूषण देशमाने यांनी ग्रामीण भागातही प्रतिभावान तरुण पिढी आहे त्यांना व्यासपीठ मिळालं तर मराठीला नव्या दमाचे लेखक मिळतील त्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन करणं गरजेचं असल्याचं सांगितले.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. किसनराव कुराडे यांनी ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात आम्हाला काय मिळालं..? या विषयावर व्याख्यान दिले. तिस-या सत्रात प्रणिता शिप्पूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुनीता तांबे यांच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले. यामध्ये अश्विनी पाटील, आनंदा गवस, हेमा दोडके, सागर मिसाळ सचिन दुधाळी आदिनी भाग घेतला. विजय जाधव यांच्या कथाकथन साहित्य संमेलनाची सांगता झाली .
यावेळी गंगाधर पाकले, अशोक जाधव आदींसह विश्वनाथ करंबळी विश्वासराव देसाई, शिरीष देसाई, डॉ. प्रकाश तौकरी सचिन उत्तुरकर ,विजय पोतदार,भिकाजी ढोनूक्षे,सदानंद व्हनबट्टे, सुनील सुतार, बाळासाहेब हजारे किरण अमनगी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आजरा साखर कारखाना गाळप रिपोर्ट
दिनांक-२८.२.२२
एकूण दिवस-१२०
एकुण गाळप= ३,४३,५०० मे.टन
एकुण साखर= ४,२३,७०० क्विंटल
सरासरी उतारा= १२.४१




