mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

झोळीतच झाली महिलेची प्रसूती….. आजरा येथे राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

झोळीतच झाली प्रसूती…

पेरणोली धनगर वाड्यावरील प्रकार.

पेरणोली (ता.आजरा) धनगरवाड्यावर सोमवारी रात्री असह्य प्रसूतीच्या वेदना सहन करणाऱ्या विवाहितेला झोळीतून दवाखान्यात नेत असताना वाटेतच तिची प्रसूती झाली. या प्रकारामुळे धनगरवाड्यावरील वाहतूक, आरोग्य व दिवाबत्तीच्या गैरसोयी पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. धनगर वाड्यावर राहणाऱ्या सौ. रंजना जयवंत झोरे यांना सोमवारी सायंकाळनंतर प्रसुती वेदना सुरू झाल्या दवाखान्याला जाण्याकरता पायवाटेशिवाय इतर मार्ग नाही, समोर अंधार, डोंगरकपारीत राहणा-या या झोरे कुटुंबीयानी इतर धनगर बांधवांच्या मदतीने रंजना यांना झोळीतून धनगर वाड्यावरून दवाखान्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे त्यांनी साड्यांची झोळी करून त्यातून पाय वाटेने हळूहळू डोंगरावरून खाली उतरण्यास सुरुवात केली. या सर्वांचा सौ.रंजना यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न सुरु असतानाच साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांची झोळीतच प्रसुती झाली व त्यांनी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यातूनही त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत आणून दवाखान्यात दाखल करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षाचा कालावधी होऊनही आज हा धनगरवाडा रस्ते, वीज, आरोग्य या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या लोकप्रतिनिधीनी किमान आतातरी या सुविधा डोंगरकपारीत राहणाऱ्या धनगर बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाला उत्साहात सुरुवात

आजरा पंचक्रोशीतील नाट्य रसिकांचे आकर्षण असणाऱ्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.नवनाट्य मंडळ आजराचे ज्येष्ठ नेपथ्यकार गंगाराम रांगणेकर यांचे हस्ते व अभिनेत्री श्वेता कुलकर्णी, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूरचे प्रशांत जोशी यावेळी उपस्थित होते. नाट्य महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यातील नाटय  रसिकांकडून नाट्य महोत्सवाची मागणी केली जात होती, परंतु कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे यापूर्वी नाट्य महोत्सवाचे आयोजन करूनही तो वेळेत घेता आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून विविध भूमिका बजावणारे नामवंत कलाकार अनुभवण्याची आजरेकरांना ही सुवर्णसंधी असल्याचे नवनाट्य मंडळाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी सांगितले. स्वरदा फडणीस यांनी सूत्रसंचलन केले. 

नेटवर्क 24 x 7 या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन प्रसंगी सादरीकरण करण्यात आले. उद्घाटन समारंभास शंकर उर्फ भैय्या टोपले, प्रा.वासुदेव मायदेव, डॉ. अशोक बाचुळकर, सुभाष विभुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

.                            ………

संबंधित पोस्ट

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यात नव्या वर्षातील कोरोनाचा पहिला मृत्यू …

mrityunjay mahanews

राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे शासनाच्या योजना पतसंस्थेमार्फत राबविणार : आ. प्रकाश आबिटकर….  आजरा येथे ‘कॅश्यू मॅन्युफॅक्चर’च्या कार्यालयाचे उद्घाटन

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

अल्पवयीन मुलीला दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी चव्हाणवाडी येथील तिघा विरोधात गुन्हा नोंद…एकाचवेळी दोन हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर…सुलगाव व वेळवट्टी येथील प्रकार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!