mrityunjaymahanews
अन्य

१६ फेब्रुवारी नंतर येणाऱ्या उसाला आजरा साखर कारखान्याकडून ५० रुपये प्रति टन इन्सेंटिव्ह…. आज-यात बुधवारी व गुरुवारी ऊरुस… कोरोना अपडेटस..

आजरा साखर कारखान्याला १६ फेब्रुवारी पासुन येणा-या उसाला रू.५०/- इन्सेंटीव्ह देणार.. चेअरमन सुनिल शिंत्रे.

 

आजरा साखर कारखान्याने चार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. सदर उद्दीष्ट पुर्ततेसाठी कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्याकडे गाळपासाठी आणण्याचे नियोजन देखिल केलेले आहे.आजरोजी कार्यक्षेत्रात १६६ स्थानिक व बीड अशी तोडणी वाहतुक यंत्रणा कार्यरत आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रातुन प्रतिदिनी २००० में टन ऊस गाळपासाठी येत आहे. अद्यापही कार्यक्षेत्रात ७० ते ८० हजार मे. टन ऊस शिल्लक असुन तो गाळपासाठी येणार आहे. त्याचप्रमाणे कारखान्याकडे नोंद केलेला गेटकेन मधील ऊसदेखील कारखान्याकडे येत आहे. कारखाना आर्थिक अडचणीमुळे गेली दोन वर्षे बंद होता. त्यानंतर जिल्हयाच्या नेत्यांच्या सहकार्याने तसेच कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सहकारी संस्थांनी आर्थिक मदत केल्यानंतर आपल्या कारखान्यावर विश्वास ठेवून सुरूवाती पासुन तालुक्यातील ऊस उत्पादकांनी आपला ऊस गाळपासाठी पाठविला असुन आजपर्यंत सतत पाठवित आहेत. आजदेखील कारखान्याकडील सभासद शेतक-यांनी आपला उस आजरा साखर कारखान्याकडेच गाळपाकरीता पाठविणेसाठी ठेवला आहे. अशा शेतक-यांना कारखान्याकडून दिलासा मिळावा यासाठी दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासुन पुढे येणा-या उसाला प्रति टन रू. ५०/- उशीरा अनुदान देणेत येणार असलेची माहिती चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे यांनी दिली.

कारखान्याने आजअखेर २८२७३० मे. टन ऊस गाळप केले असुन अद्यापही कार्यक्षेत्रातुन गाळपासाठी ऊस उपलब्ध होत आहे. कारखाना १५ मार्च २०२२ पर्यंत गाळप सुरू ठेवणार असुन सभासद शेतक-यांनी आपल्या उसाची काळजी न करता आपला ऊस कारखान्यासाठी राखुन ठेवावा. सदर प्रमाणे संपुर्ण उसाचे गाळप करणेत येणार असलेची ग्वाहीही यावेळी दिली. त्याचबरोबर ऊस विलंबाने येणार असलेने वजन घट म्हणून प्रतिटन रू.५०/- प्रमाणे उशीरा अनुदान देणेचे नियोजन केले आहे. तरी सर्व उस उत्पादक शेतक-यांनी आपला सपुर्ण पिकविलेला उस आपले साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे असेही आवाहन याप्रसंगी चेअरमन यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक व कार्यकारी संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.

उचंगी प्रकल्पग्रस्तां सोबतची बैठक फिसकटली …कुटूंबाची व्याख्या व संकलन बाबत एकमत नाही : जिल्हाधिकाऱ्यांडून सकारात्मकची ग्वाही : अडीच तास बैठक

उंचंगी प्रकल्पग्रस्तांच्याबरोबर आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी झालेली चर्चा फिस्कटली, कुटूंबाची व्याख्या, संकलन रजिस्टर या मुद्द्यावर प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांच्यात एकमत झाले नाही. प्रकल्पग्रस्तांकडून मूळ संकलन रजिस्टर प्रमाणे पुनर्वसनाची कार्यवाही व्हावी घळभरणीपूर्व प्रकल्पग्रस्तांच्या सर्वच प्रश्नाचा निपटारा व्हावा अशी आग्रही मागणी केली. कायदेशीररित्या पुनवर्सनाचे प्रश्न सोडवले जातील कोणावरही अन्याय होणार नाही पण नियमापेक्षा जास्त जे असेल ते निर्णय येथे होणार नाहीत. त्यांनी शासनाकडे जावे. असे जिल्हाधिकारी श्री. रेखांवर यांनी सांगून पुनर्वसनासाठी सकारात्मक असल्याची ग्वाही दिली

शनिवार (ता. २९) ला प्रकल्पग्रस्तानी घळभरणी रोखल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यां समवेत चितळे (ता. आजरा) ये प्रकल्पस्तांच्यासोबत बैठक झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत प्रकल्पाच्या कामाबाबत निर्णय झाला नाही चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी पुन सनाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत घळभरणी करू देणार नाही असा इशारा दिला. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, कोल्हापूर पाटबंधारे परिडळचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रातांधिकारी वसुंधरा बारवे, दूधगंगा कालवा क्रमांक १ च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी, तहसीलदार विकास अहिर उपस्थित होते.

कॉ. अशोक जाधव यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मांडल्या. मूळ संकलन रजिष्टरप्रमाणे १२० प्रकल्पग्रस्ताना जमिन वाटा झालेली आहे त्याप्रमाणे वंचित प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना त्या प्रमाणे जमिन वाटप करावी. खासबाबमधील १५० घरांचा प्रश्न सोडवावा दोन मीटरने उंची वाढीचा खुलासा करून त्याबाबत निर्णय स्पष्ट करण्याची मागणी केली. आमदार राजेश पाटील यांनी आपण आमदार झाल्यापासून प्रकल्पग्रस्तांची जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून अडचणी संदर्भात मंत्री पातळीवर बैठक आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांच्या वतीने लोकसंख्या व मूळ संकलन रजिस्टर नुसार जमीन वाटप करण्यात यावे त्याचबरोबर २००९ च्या आदेशानुसार सदर जमीन वाटप करावे अशी मागणी करण्यात आली. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत बाबुराव गुरबे,  तानाजी राजाराम, सुनील शिंत्रे, राजू होलम, रचना होलम, मुकुंदराव देसाई,संजय तर्डेकर यांच्यासह अधिकारी वर्गाने भाग घेतला.

प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

आजरा तालुका शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणारा पाटबंधारे विभाग कोल्हापूरचा उंचगी मध्यम लघु पाटबंधारे प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. या लघु पाटबंधारे प्रकल्पाचे सांडवा व घळभरणी ही दोन कामे झालेली उंचगी लघुपाटबंधारे प्रकल्पातील धरणग्रस्ताचे पुनर्वसन गेली अनेक वर्षे आपल्या प्रशासनाचे लाल फितीच्या कारभाराने रखडले आहे. पाटबंधारे व पुनर्वसन खाते महाराष्ट्र शासन यांचे मंत्रीमहोदयानी दरमहा उंचगी प्रकल्पाचे धरणग्रस्त प्रांत, तहसिलदार व पुनर्वसन अधिकारी यांचे दरमहा बैठक घेऊन पुनर्वसन पूर्ण करावे असे आदेश २ वर्षापूर्वी दिले आहे पण ते कृतीत होत नाही. या सर्वामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचीत झाला आहे. शेतकरी आतुरलेने या उंचगी धरणपूर्तीची वाट पहात आहे. आज प्रत्यक्ष भेट देत आहात हे चांगले नाही म्हणून आम्ही आपणास मागणी करत आहोत. आजरोजी योग्य ते पुनर्वसनाचे निर्णय घेऊन उंचगी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे घळभरणी ७ दिवसात सुरु करावी अशी मागणी करत आहोत. तरी या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करावा अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करू नये… पूर्ततेसाठी सहकार्य करा… तहसिलदार यांचे आवाहन

आज दि. ४ / २ / २०२२ इ. रोजी चितळे, ता. आजरा येथे उचंगी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटूंबांच्या मागणीवरुन प्रकल्पग्रस्तांच्या अडी-अडचणी व व्यथा ऐकून घेणे व त्यांचे समाधान करणेकरिता मा. श्री. राहूल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर, मा. आमदार श्री. राजेश पाटील, आमदार चंदगड विधान सभा मतदार संघ, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सुर्वे, मा. अपर जिल्हाधिकारी श्री. किशोर पवार, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, श्रीमती अश्विनी जिरंगे, उपविभागीय अधिकारी, आजरा-भुदरगड श्रीमती वसुंधरा बारवे, व उचंगी प्रकल्पग्रस्त यांचे समवेत झालेल्या सविस्तर चर्चेमध्ये नियमातील तरतुदी पुन्हा सर्वाना समजावून सांगणेत आल्या व प्रकल्पग्रस्तांच्या मनातील संभ्रम कायदयाप्रमाणे दूर करण्यात आला. नियमातील तरतुदीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना देणसाठी सर्व लाभ उपलब्ध आहेत आणि प्रकल्पग्रस्तांनी त्वरीत लाभ घ्यावा..

प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा एकून घेवून त्याचा पूर्ण निपटारा करणेसाठी व पुनर्वसन कायदयाच्या सर्व अटी पाळून प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना मिळणारे सर्व लाभ देणेकरीता प्रशासन कटीबध्द आहे. अशी ग्वाही मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना दिली आहे. प्रकलपग्रस्तांनी व या प्रकल्पाशी संबधीत असणा-या सर्व घटकांनी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. याचे भान ठेवून प्रकल्प उभारणीस सहकार्य करावे.प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करुन त्यांना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवू नये असे आवाहन केले आहे.

हजरत दावल मलिकसो यांचा ९ व १० रोजी आज-यात उरुस ..

आजरा येथील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक अशी ओळख असणाऱ्या हजरत दावल मलिक यांच्या उरुसाचे बुधवार दिनांक ९ गुरुवार दिनांक १० रोजी आयोजन करण्यात आले आहे.                                      बुधवारी गंधफूल  मिरवणूक संध्याकाळी सहा वाजता तर बुधवारी गलेफ मिरवणूक हॉटेल समाधान, संभाजी चौक, आजरा येथून निघणार आहे. गुरुवार दिनांक १० रोजी गलेफ  मिरवणूक संध्याकाळी सहा वाजता निघणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

आजरा तालुक्यात आज नवीन नऊ रूग्ण

आजरा तालुक्यात आज दिनांक चार रोजी एकूण नऊ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यामध्ये कोळींद्रे, वेताळनगर,पोश्रातवाडी,  दाभेवाडी, मसोली,कोरीवडे, कीणे,आजरा येथील रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

चाफवडे हायस्कूल स्थलांतरास विरोध कायम…

mrityunjay mahanews

तरुणाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking

mrityunjay mahanews

पेद्रेवाडीच्या सरपंच सौ.रेडेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!