mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

मुलीच्या लग्नादिवशीच प्राध्यापक पित्याचे निधन

मुलीच्या लग्नादिवशीच प्राध्यापक पित्याचे निधन आजरा येथील घटना 

 

आजरा येथील आजरा महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्राध्यापक हसनसाब अब्दुल माणगावकर यांचे मुलीच्या लग्नाच्या मुहूर्तावेळीच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आजरा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,आजरा महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्राध्यापक हसनसाब माणगावकर यांच्या मुलीचा आज सकाळी साडेअकरा वाजता लग्न समारंभ आयोजित केला होता. लग्नाची धावपळ सुरू असतानाच सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आजरा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता गडहिंग्लज येथे हलवत असतानाच त्यांचे निधन झाले. ५६ वर्षीय माणगावकर यांच्या निधनाने आजरा शहरातील हैदर नगर परिसरासह सर्वधर्मीय बांधवांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व परिसरात पसरताच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी केली होती. मुलीच्या लग्ना दिवशीच सदर प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, आई असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

शिक्षक भरतीत शासनाची फसवणूक, मुख्याध्यापकासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंद…डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार

mrityunjay mahanews

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

बहिरेवाडीत चोरट्यांचा धमाकूळ…

mrityunjay mahanews

होण्याळी येथून महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता…आजरा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात…सोमवारी आजरा येथे शिवप्रेमींची बैठक

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!