mrityunjaymahanews
अन्य

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

आजरा नगरपंचायतीच्या विविध समित्यांच्या सभापती निवडी ऑनलाइन पद्धतीने बिनविरोध पार पडल्या. यामध्ये पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी अशोकअण्णा चराटी यांची निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी किरण कांबळे यांची, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीपदी यास्मिन बड्डेखान यांची तर स्वच्छता सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी अनिरुद्ध केसरकर यांची निवड झाली आहे. नियोजन समिती सभापतीपदी सिकंदर दरवाजकर यांना संधी देण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी यासीराबी लमतुरे (मुजावर) यांची तर उपसभापतिपदी रेश्मा सोनेखान यांची निवड झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या निवडीमध्ये नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शाळा सुरु करा अन् विद्यार्थ्यांचे नूकसान टाळा…आमदार प्रकाश अबिटकर यांच्याकडे युवा भारतची मागणी


प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे नूकसान होत असून शैक्षणिक नूकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सूचना देण्याची मागणी आमदार प्रकाश अबिटकर यांच्याकडे युवा भारत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेने निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की कोरोनामूळे दोन वर्षापासून शाळा बंद आहेत.शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामूळे विद्यार्थ्यांचे अपरिमित हानी झाली आहे.पुन्हा कोरोनाच्या निमित्ताने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हाँटेल,बार,बाजारपेठा सुरू आहेत. मात्र शाळा तेवढी बंद ठेवण्यात आली आहे. यामूळे शिक्षणाअभावी भविष्यातील पिढीचे मोठे नूकसान होणार असल्याने निर्बंध घालून शाळा सुरू करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर संस्थापक कृष्णा सावंत, अध्यक्ष पंकज देसाई,उपाध्यक्ष शुभम सुतार, कार्याध्यक्ष विक्रम लोखंडे, सचिव रामचंद्र हळवणकर, सदस्य निवृत्ती ढोकरे,स्वप्निल सावंत,रामदास कोडक, दयानंद सासूलकर,पार्थ दोरूगडे,संदीप कांबळे, महेश सुतार ,पांडुरंग सोले,महादेव सावंत,आदींच्या सह्या आहेत.

आरदाळ येथे सखी महिला बचत गटातर्फे ‘हळदी कुंकु समारंभ उत्साहात : सामूहिक शेती करण्याचा केला संकल्प.

आरदाळ, ता. आजरा येथील सखी महिला बचत गटामार्फत हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला.  भैरीदेव मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांती निमित्त गटातील महिलांनी ‘तिळगुळ’ व ‘भेटवस्तू’ देऊन कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन केले. जनसेवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्थापन झालेला ‘सखी महिला बचत गट’ १२ वर्षे कार्यरत असून गटामार्फत विविध उपक्रम राबवून महिला आर्थिक उत्पन्नाबरोबरच सामुहिकपणे करावयास मिळणारी कामे व त्यातून मिळणारा आनंद अधिक असतो असे गटातील महिलांनी सांगितले. आजपर्यंत गटामार्फत शालेय पोषण आहार शिजवणे, अंगणवाडीच्या मुलांचा आहार बनवणे, गावठी कोंबडींची अंडी संकलन व विक्री केंद्र चालवणे इ. उपक्रम सक्षमपणे राबविले आहेत. यापूढे देखिल सामूहिक शेती सारखे उपक्रम राबवूण गटातील महिला नविन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग निवडणार असल्याचे कार्यक्रमामध्ये ठरविण्यात आले. रोजच्या कामाच्या व्यापात व्यस्त असलेल्या महिलांना एकत्र येऊन मनमोकळेपणाने संवाद साधता यावा व विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात असे प्रा.उज्वला कांबळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष सुप्रिया गुरव, सचिव- शेवंता चोथे, अश्विनी कांबळे, तनुजा सव्वाशे, निशिगंधा पवार, शिर्माबाई कांबळे, इंदूबाई कांबळे, नयना सोनार, रेखा कांबळे, अनिता ससाणे, मनिषा गुरव,उज्वला कांबळे, माधुरी देसाई, प्रियांका सोनार, प्रियांका कांबळे, यांचेसह गावातील महिला उपस्थित होत्या.

शिवानंद गजरे यांना पी.एच.डी. प्राप्त

आजरा येथील प्रा. शिवानंद प्रकाश गजरे यांना शिवाजी विद्यापीठाची रसायन शास्त्रातील पीएचडी पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे त्यांना डॉक्टर जी.बी. राशिनकर यांचे मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता…

 

भीमा गुरव

आजरा पंचायत समितीचे माजी सभापती भिकाजी गुरव यांना पितृशोक

आजरा पंचायत समितीचे माजी सभापती भिकाजी गुरव व व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य शिवाजी गुरव यांचे वडील भीमा दत्तू गुरव (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

………………

बाळकृष्ण गोवेकर

आजरा येथील बाळकृष्ण आप्पा गोवेकर (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जुने काजू व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार असून येथील सामाजिक कार्यकर्ते गुरुदत्त गोवेकर यांचे ते वडील होत.

संबंधित पोस्ट

दागिने चोरीच्या उद्देशाने महिलेवर चाकू हल्ला :आजरा येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘ तो ‘ मृतदेह हात्तीवडेतील महिलेचा…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!