l

कुत्रे आडवे आले आणि तरुणाचा जीव घेऊन गेले…
आजरा येथील अंबराई गल्लीतील रहिवाशी असलम खलील बेपारी(वय २७) हे आठ दिवसापूर्वी हात्तीवडे येथील रस्त्यावरून चालले असताना दुचाकीच्या आड कुत्रे येऊन ते दुचाकीवरून घसरून खाली पडले गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी(दि.१४) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले भाऊ आई वडील असा परिवार असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आजरा शहरासह तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यापूर्वीही भटकी कुत्री गाडीच्या आडवी आल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी होणे, जीवाला मुकणे असे प्रकार घडले आहेत. कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी यानिमित्त पुन्हा एक वेळ अधोरेखित झाली आहे.
मनसेच्या सातेवाडी शाखेचे उद्घाटन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातेवाडी(ता.आजरा) शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपजिल्हा अध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडीच्या पुनम भादवणकर, आजरा तालुका अध्यक्ष अनिल निउंगरे, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, चंद्रकांत सांबरेकर, सरिता सावंत तेजस्विनी देसाई, सातेवाडी शाखाध्यक्ष परशुराम पोतनीस, उपशाखा अध्यक्ष सुरेखा पोतनीस, सुधाकर पोतनीस यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वेळवट्टी विकास संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
वेळवट्टी (ता.आजरा) येथील श्रीराम विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे:- भिकाजी जानबा कविटकर, शिवाजी भागोजी खवरे, तुकाराम बाळू गावडे, सुधीर राजाराम देसाई, चंद्रकांत विठोबा पवार, नामदेव बाबुराव पवार, प्रकाश शिवाजी शिंदे, विश्वास राजाराम शिंदे, (सर्वजण सर्वसाधारण कर्जदार गट), कविता बबन पवार , सुवर्णा जयवंत मिटके (महिला राखीव प्रतिनिधी) उत्तम कोंडीबा कांबळे (अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी) आनंदा शंकर कुंभार (इतर मागास प्रवर्ग)
…निधन वार्ता…
तानाजी खवरे
सुलगाव (ता. आजरा) येथील तानाजी बाबु खवरे( वय ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. आजरा एस.टी. आगारातील कर्मचारी संदीप खवरे यांचे ते चुलते तर शिवसेना तालुका प्रमुख युवराज पवार यांचे मामा होत.



…निधन वार्ता…