mrityunjaymahanews
कोल्हापूर

आजरेकरांचे जावईबापू गेले… आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने आजरेकराना धक्का..

आजरेकरांचे जावईबापू गेले….

आमदार चंद्रकांत जाधव हे आजरा शहरातील प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक स्व.शंकर मोरे यांचे जावई. उद्योजक कुटुंबात जन्मलेल्या चंद्रकांत यांनी उद्योग क्षेत्रातील आपला वसा कायम जपला. गोशीमा, फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल, कोल्हापूर चेम्बर ऑफ़ कॉमर्स आदी संघटनांची पदे भूषविली. कोल्हापूर उद्योग, व्यापार व्यवसायाचे विविध प्रकारचे प्रश्न त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने मोठ्या प्रभावीपणे मांडले. या प्रश्नांचा त्यांचा मुळापासून अभ्यास होता, मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांच्याकडे ते यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असत, एक फुटबॉलपट्टू म्हणून तर करवीरनगरी त्यांना ओळखत होती. गत विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाल्यानंतर आजरेकरांची छाती अभिमानाने फुगली होती. एक हक्काचा माणूस आमदार झाल्याचा अभिमान शहरवासीयांना होता. विधान परिषद निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आठ-दहा दिवसापूर्वीच ते आजरा येथे आले होते.शहरातील प्रमुख नगरसेवक मतदारांशी त्यांनी संवादही साधला होता. गुरुवारी सकाळीच त्यांच्या निधनाचे वृत्त आजरा शहर व तालुक्यात पसरताच सर्वत्र त्यांच्या अनपेक्षित जाण्याची चर्चाच ऐकण्यास मिळत होती. अनेकांच्या दृष्टीने त्यांचे जाणे धक्कादायक आहे.

खेडेगेेच्या पुनर्वसनाचा निर्णय तातडीने घ्या …अन्यथा धरणावर फिरकू देणार नाही

खेडगे गावच्या पुनर्वसनाचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत न झाल्यास शासकीय अधिकाऱ्यांना धरणस्थळावर फिरकू देणार नाही अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी वसुधा बारवे याना आज श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील सर्फनाला धरणग्रस्त संघटनेने दिला.आज प्रांताधिकरी वसुधा बारवे, तहसीलदार विकास अहिर, उपअभियंता शरद पाटील हे कॅम्पसाठी पारपोली येथे निघाले असतांना श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली खेडगे येथील धरणग्रस्त स्त्री पुरुषांनी त्यांना रस्त्यावर अडविले. यावेळी कॉ.संपत देसाई म्हणाले, मुख्य अभियंता श्री.हेमंत धुमाळ यांनी खेडगे पुनर्वसनाबाबत सातारा येथे झालेल्या बैठकीत निर्देश दिले आहेत. त्याबाबत अजूनही कार्यवाही झालेली नाही. आमची मागणी ही कायद्याला धरून असून पुनर्वसनाच्या कायद्यात बसणारी आहे. त्यामुळे येत्या १५ डिसेंबर पर्यंत त्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे.

प्रांताधिकारी यांनी निवेदन स्वीकारून कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. त्यानंतर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत पुनर्वसनाबाबत १५ पर्यंत मुदत देऊन उचित कार्यवाही न झाल्यास धरणस्थळावर एकाही अधिकाऱ्याला फिरू द्यायचे नाही असा निर्णय घेतला. यावेळी शंकर ढोकरे, चंद्रकांत कविटकर, गंगाराम ढोकरे, धोंडिबा सावंत, राजाराम अमूनेकर, वसंत राणे, मिनीन बारदेस्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

  1. अध्यक्षपदी राजेंद्र पाटील

विद्यामंदिर देवर्डे शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर उपाध्यक्षपदी मनीषा सुतार यांची निवड करण्यात आली. नव्या शासन निर्णयानुसार नुकतेच शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये या निवडी पार पडल्या. यावेळी दीपक पाटील , मारुती बुरूड , मुख्याध्यापक नामदेव माईनकर, शिक्षक सुनील सुतार यांचेसह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते

      निधन वार्ता…..

उत्तूर(ता.आजरा)येथील वैजयंता गोविंदराव पोवार (वय ६५) यांचे निधन झाले उत्त्तू्रमधील प्रतिष्ठित डॉ.गोविंदराव पोवार यांच्या त्या पत्नी होत्या. .त्यांच्या मागे तीन मुले , सूना, व नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

सिरसंगी येथे नवविवाहितेची आत्महत्या…नामदार मुश्रीफ यांच्यावरील चराटी यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’….. ना. मुश्रीफ समर्थक कारखाना संचालकांचा पत्रकार बैठकीत आरोप

mrityunjay mahanews

आजऱ्यात जिल्हा बँकेचा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता….

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

जिल्हा बँकेकरीता कोणी केलं शक्तिप्रदर्शन?… कोणाची होणार बिनविरोध निवड?जरूर पहा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी मंगळवारी…. विश्वनाथ गुंजाटी यांचे निधन …

mrityunjay mahanews
error: Content is protected !!