mrityunjaymahanews
अन्य

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी दोन कोटींची तरतूद करणार :नामदार मुश्रीफ…… यासह आजरा स्थानिक ताज्या बातम्या

लोकशाहीर गव्हाणकर स्मारकासाठी दोन कोटीच्या निधीची तरतूद करणार : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

आजरा तालुक्यातील महागोंड येथील स्वातंत्र्य चळवळीतील लोकशाहीर द.ना. गव्हाणकर , कलामहर्षी बाबुराव पेंटर , कृष्णा जाधव यांच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.महागोंड (ता.आजरा) येथे लोकशाहीर द.ना. गव्हाणकर पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  कवी वाहरू सोनवणे यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषा शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.
यावेळी वाहरु सोनावणे यांनी आदिवासिंबद्दल माहिती दिली. समता, बंधुता , प्रेम , यावर विश्वास ठेवून आदिवासींचे जीवन बदलायचे आहे अशी भावना व्यक्त केली.
पद्मश्री गणेश देवी यांनी आदिवासाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमास कॉ. संपत देसाई ,गव्हाणकर स्मृती पुरस्कार समितीचे अध्यक्ष रवींद्र आपटे , जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव  शिंपी , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई , डॉ.भारत पाटणकर , उदय जोशी , आजरा कारखाना अध्यक्ष प्रा.सुनिल शिंत्रे ,पं.स.सभापती उदय पवार , वसंत धुरे, काशिनाथ तेली, दिपक देसाई , अनिकेत कवळेकर , संभाजी तांबेकर , सरपंच जयश्री देसाई , उपसरपंच मनोज कांबळे , तानाजी पाटील ,तानाजी कुंभार , सोनाली लोहार , निलांबरी लोंखंडे , सुधीर सावंत , धनाजी देसाई , शिवाजी गुरव , वासुदेव गव्हाणकर, प्रा. नवनाथ शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उचंगी पुनर्वसनाच्या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी आज-यात शिबिर

आजरा तालुक्यातील उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पूनर्वसनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आजरा तहसील कार्यालयात ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आजरा-भुदरगडच्या उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली आहे. या शिबिरामध्ये जमीन व पॅकेज वाटप ,शिल्लक प्रकल्पग्रस्तांचा आढावा,उपलब्ध पर्यायी जमीन व पॅकेज संदर्भात माहिती यासह विविध बाबी चर्चेत घेतल्या जाणार आहेत. संबंधितांनी वेळेत हजर राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी बारवे यांनी केले आहे.

वाटंगी शाळेला ई-लर्निंग संच प्रधान

वाटंगी (ताा.आजरा) येथील प्राथमिक शाळेला ई लर्निंग संच ,स्क्रीन प्रोजेक्टर आदी सुमारे एक लाखांचे साहित्य बेंटली सिस्टम्स, पुणे या कंपनीकडून प्रदान करण्यात आले. यामध्ये पहिली ते सातवी पर्यंतचा अभ्यास व अभ्यासक्रमाशी निगडित व्हिडिओ आहेत. कंपनीचे प्रतिनिधी संदीप भडगावकर, तुषार शिंत्रे  यांनी हे साहित्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल देसाई यांचेकडे सुपूर्त केले. यावेळी सरपंच शिवाजी नांदवडेकर, विजय देसाई, शिवाजी गिलबिले ,मधुकर जाधव, मुख्याध्यापक धनाजी केसरकर ,शिवाजी कांबळे,सुनील कांबळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा आजराचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा, आजराचे त्रैवार्षिक  अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनामध्ये नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ..नुतन कार्यकारणीमध्ये
अध्यक्षपदी विजय राजाराम कांबळे, सरचिटणीसपदी  सुरेश तुकाराम देशमुख यांची तर कार्याध्यक्षपदी  दिपक कांबळे आणि कोषाध्यक्षपदी  नागेश सुतार
यांची निवड  करण्यात आली.यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डुकर , कार्याध्यक्ष तुकाराम संघवी ,कोषाध्यक्ष पी.डी. सरदेसाई,संघटक ए.एल. कांबळे, कॉ. संग्राम सावंत ,एम. एस.कांबळे, वंदन जाधव, अनिल कांबळे ,महेश कांबळे,प्रकाश गुट्टे, प्रकाश बडे,अब्दुल उतूरकर,सुनील सोनार,बाळू कांबळे,अशोक महाजन,शिवाजी सम्राट,संजीव नाईक,,दशरथ कांबळे,सुनील कामत,अस्मिता साबळे,कविता नाईक,प्रीती कांबळे,प्रज्ञा राजदीप,विठ्ठल धनवे,सुभाष नाईक,जमीर नाईकवाडी,एस. एस. कांबळे व शिक्षक उपस्थित होते.

   बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-

                –9637598866-

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!