विधान परिषदेच्या जोडण्यांसाठी मंत्री सतेज पाटील आजऱ्यात: अण्णा-भाऊ सूतगिरणीवर घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी
आजरा: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधानपरिषद निवडणुकीला सामोरे जात असलेल्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आजरा तालुक्यातील मतदारांच्या भेटी देऊन मतदारांना मतदान मतदान करून सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी चंदगड गडहिंग्लजचे आमदार राजेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह नलवडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी जि.प. अध्यक्ष व विद्यमान सदस्य उमेश आपटे आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, विद्याधर गुरबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, सर्वच नगरपंचायती व नगरपालिका यांना आपण कोणताही दुजाभाव न करता भरघोस निधी दिला आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यासाठी आपला प्रयत्न राहिला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुरू असून सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विजयासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर आपण निश्चित गाठू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी, आद्रा सूतगिरणीचे अध्यक्ष अन्नपूर्णा देवी चराटी, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, नगरसेवक विलास नाईक, संजयभाऊ सावंत, दशरथ अमृते, राजू पोतनीस, आज-याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, जी. एम. पाटील डॉ. इंद्रजीत देसाई, राजू पोतनीस, किरण कांबळे, अभिषेक शिंपी यांच्यासह आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक, अण्णा-भाऊ सूतगिरणीचे संचालक व मान्यवरांची मंत्री पाटील यांनी भेट घेतली.
————————-ADVT————————–
,






विधान परिषदेच्या जोडण्यांसाठी मंत्री सतेज पाटील आजऱ्यात: अण्णा-भाऊ सूतगिरणीवर घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी