mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार  दि.२० नोव्हेंबर २०२६ 

दादांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव…


आजरा : प्रतिनिधी

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यापार, बँकिंग आणि शेती अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, आजरा सूतगिरणी उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, पंडित केणे, शामराव देसाई, जिल्हा बँक संचालक व जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, माजी सभापती विष्णू केसरकर, आजरा साखर संचालक उदयराज पवार, गोकुळचे संचालक विद्याधर गुरबे, विकास फळणेकर जनता बँक संचालक रणजित देसाई, शिवसेना ठाकरे गट सहसंपर्कप्रमुख संभाजी पाटील, दशरथ अमृते, जनता बँक उपाध्यक्ष अमित सामंत, राजू होलम, संजय पाटील, शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख युवराज पोवार, भोगावती साखर कारखाना संचालक धीरज डोंगळे, भोगावती शिक्षण प्रसारक संचालक अभिषेक डोंगळे, प्रकाश पाटील, काशिनाथ तेली, रशिद पठाण,जनता गृहतारण संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे जनार्दन बामणे, जितेंद्र भोसले, रवींद्र भाटले, डॉ. रोहन जाधव, महादेव पोवार, माणिक सावंत, सुभाष चौगुले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, सोमगोंडा आरबोळे, आर. एल. पाटील, आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोक चराटी, गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, बाबासाहेब देवकर, बाजीराव खाडे, उद्योजक रमेश रडेकर, बी. के. चव्हाण, एकनाथ देशमुख, पृथ्वीराज माने, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, ए. डी. पाटील, सतीश घाटगे, बाबासाहेब पाटील आणि गोकुळ संचालक राहुल देसाई यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.


टीम सतेज व महाविकास आघाडीच्या वतीने आजरा ग्रामीण रुग्णालयात फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. चव्हाण यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात राजू होलम, रवींद्र भाटले , किरण कांबळे, आरिफ खेडेकर, सुफियान खेडेकर, रवी तळेवाडीकर, सुमित सावंत, विक्रम देसाई, अमोल गावडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पोस्टर फाडल्याप्रकरणी आजऱ्यात शिवसेना आक्रमक : जोडे मारो आंदोलन

आजरा : प्रतिनिधी

शिंदे गटाच्या नेत्या शायना यांची यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर फाडले या निषेधार्थ शिवसेना आजरा तालुका  शिवसेना उबाठा गटाच्या वतीने छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या फोटोला जोडे मारून निदर्शने करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, राज्य संघटक नवेज मुल्ला, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख संभाजी पाटील, उपजिल्हाप्रमुख युवराज पोवार, जिल्हा संघटक संभाजी भोकरे, आजरा तालुका प्रमुख संजय येसादे त्याचबरोबर कागल उपजिल्हाप्रमुख जयसिंग टिकले, राधानगरी उपजिल्हाप्रमुख रवी पाटील यासह दिनेश कांबळे, महेश पाटील, आरोग्य तालुकाप्रमुख ज्ञान भोपळे, शहर प्रमुख समीर चांद, शिवाजी आढाव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका विमल पाटील, अनुसया पाटील, गीता पुजारी, सभापती यशोदा पवार व शिवसैनिक उपस्थित होते

स्व.राजारामबापूंना आदरांजली…

आजरा : प्रतिनिधी

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष जनता बँक व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. राजारामबापू देसाई यांना १९ व्या स्मृतिदिनानिमित्त तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गटनेते सुधीरभाऊ देसाई, जि.प. सदस्य शिरीष देसाई, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष महादेव हेब्बाळकर,व्यवस्थापक जनार्दन बामणे, वृषाल हुक्केरी यांच्यासह राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन बापूंच्या स्मृतीला अभिवादन केले.

ग्राहक कल्याण प्रतिष्ठान
महाराष्ट्रच्या जिल्हा अध्यक्षपदी सी. आर. देसाई यांची निवड

आजरा : प्रतिनिधी

ग्राहक कल्याण महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी श्री. सी. आर. देसाई यांची तर सचिव म्हणून श्री. श्रीकांत पाटील यांची निवड झालेबद्दल मराठा महासंघाचे जिल्हाअध्यक्ष श्री. मारुती मोरे व तालुका अध्यक्ष- बंडोपंत चव्हाण यांचे हस्ते सत्कार करणेत आला.

ग्राहकांचे हित व संरक्षण या साठी काम करणारी हो अग्रगण्य संघटना असून जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत कोल्हापुर येथे श्री. देसाई यांची एकमताने निवड करणेत आली. जिलह्याच्या एका महत्वाच्या संघटनेवर संधी मिळाले बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या सत्कार प्रंसगी संभाजी इंजल , प्रकाश देसाई, सुर्यकांत आजगेकर, शिवाजीराव इंजतल, शिवाजीराव पाटील, सी.डी. सरदेसाई, शंकरराव शिंदे, शिवाजीराव गुडूळकर, चंद्रकांत पारपोलकर, आनंदा गावडे, महादेव पोवार उपस्थित होते.

मुमेवाडीत वैरणीला आग, चार ट्रॉली चारा जळून खाक


उत्तूर : प्रतिनिधी

मुमेवाडी (ता. आजरा) येथे जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या वैरणीला आग लागून सुमारे चार ट्रॉली चारा जळून खाक झाला. मंगळवारी (ता. १७) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत ३५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुमेवाडी येथील आनंदा गणपती सावेकर यांच्या जागेत सातूबाई दिनकर काटे यांनी जनावरांसाठी वैरणीचा साठा केला होता. अचानक लागलेल्या आगीत या साठ्याने पेट घेतला. आगीमध्ये एक ट्रॉली पिंजर, एक ट्रॉली गवत, एक ट्रॉली कडबा आणि एक ट्रॉली भुईमुगाचे वेल असे संपूर्ण साहित्य जळून गेले.

घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी, उत्तूर यांच्यामार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. त्याचा अहवाल तहसीलदार, आजरा यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी साठवून ठेवलेले साहित्य गमावल्याने संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

कुरकुंदेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या १९ लाख रुपयांच्या कामाची सखोल चौकशीची मागणी


पेरणोली : प्रतिनिधी

कुरकुंदेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात झालेल्या कामाचा दर्जा, कामाचे प्रमाण आणि त्यावर दाखविण्यात आलेला खर्च याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. प्रत्यक्ष पाहणी केली असता हे काम खरोखरच १९ लाख रुपये खर्च होण्याइतके झाले आहे का ?, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत असून या कामाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

या कामासाठी रोजगारावर दाखविण्यात आलेल्या काही मजुरांच्या नावांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. कामाच्या कालावधीत आजारी असल्यामुळे घरी असलेल्या व्यक्तींची नावेही रोजगारावर दाखविण्यात आल्याची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी प्रत्यक्ष काम केले होते का, त्यांच्या नावावर किती दिवसांची हजेरी दाखविण्यात आली आणि त्यांच्या नावाने किती मजुरी अदा करण्यात आली, याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

कुरकुंदेश्वर देवस्थान रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेल्या १९ लाख रुपयांच्या निधीचा संपूर्ण हिशेब सार्वजनिक करण्यात यावा, प्रत्यक्षात किती लांबीचा व रुंदीचा रस्ता करण्यात आला, कोणते साहित्य वापरण्यात आले आणि कामाचा दर्जा काय आहे, याची स्वतंत्र तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात यावी, या कामाचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), बिले, खर्चाचे तपशील आणि काम पूर्णत्वाचा अहवाल तपासण्यात यावा, रोजगारावर दाखविण्यात आलेल्या सर्व मजुरांची नावे, हजेरीपत्रके, कामाचे दिवस आणि मजुरी देयकांची तपासणी करण्यात यावी, कामाच्या कालावधीत आजारी असल्यामुळे घरी असलेल्या व्यक्तींची नावे रोजगारावर दाखविली असल्याच्या तक्रारीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, संबंधित मजुरांचे जबाब नोंदवून त्यांच्या नावाने दाखविलेली मजुरी प्रत्यक्ष त्यांनाच मिळाली आहे का, याची खातरजमा करण्यात यावी, चौकशीमध्ये कामाच्या खर्चात अनियमितता, खोटी हजेरी अथवा निधीचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही केली जात आहे.

निपक्ष आणि पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे.
संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

‘ बिरेश्वर ‘च्या आजरा शाखेचा आज तृतीय वर्धापन दिन

आजरा : प्रतिनिधी

बिरेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित एकसंबाच्या आजरा शाखेचा आज शुक्रवारीतिसरा वर्धापन दिन असून संस्थेने गेल्या तीन वर्षात २७ कोटी ११ लाखांच्या ठेवी जमा झाल्या असून सर्व प्रकारचे कर्ज वाटप केले जात असल्याची माहिती संस्थेचे शाखा अध्यक्ष श्री. ज्योतिप्रसाद सावंत यांनी दिली.

संस्थेचे संस्थापक माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, सहसंस्थापिका कर्नाटकच्या माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ. शशिकलाताई जोल्ले, अध्यक्ष आप्पासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या आजरा शाखेची वाटचाल अतिशय उत्तम पद्धतीने सुरू असून सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकाच्या बळावर चौथ्या वर्षात यशस्वी पदार्पण करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या एकूण २३५ शाखा असून ₹ ५८५० कोटींपेक्षा जास्त ठेवी असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक सुरेश मिटके, महेश कुरुणकर अनिकेत शिंत्रे, सुनील डोणकर, सुशांत निकम, शाखा व्यवस्थापक दत्तात्रय सुतार उपस्थित होते.

निधन वार्ता
सुनील कांबळे

मौजे करपेवाडी दुll.ता.आजरा येथील सुनील लक्ष्मण कांबळे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

येथील वाहतूक निरीक्षक कोल्हापूर (ATI)येथे सेवेत असताना ब्रेन स्टोक आल्याने वर्षभर आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई ,भाऊ भावजय ,बहीण , तीन मुली व एक नात असा परिवार आहे.

जानबा जाधव

भादवण, गोडसेवाडी ता.आजरा येथील जानबा दत्तू जाधव ( वय ९५ वर्षे  ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

ते सेवानिवृत्त गिरणी कामगार होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे जनता जनार्दन सेवा मंडळ मुंबईच माजी अध्यक्ष दत्तात्रय जाधव आणि विमा एजन्ट सुधीर जाधव यांचे ते वडील होत.

 

आजचे पंचांग

दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : दशमी तिथी (सकाळी ०७.१५ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (सकाळी ०६.५६ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : वज्र योग (२१ नोव्हेंबर सकाळी ०४.५५ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : गराजा करण (२१ नोव्हेंबर सायंकाळी ०४.५५ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : वृश्चिक राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ११ ते दुपारी १२.२४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०२ ते दुपारी १२.४६
सूर्योदय : सकाळी ०६.५०
सूर्यास्त : सायंकाळी ५.५८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रविवार सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!