शुक्रवार
दि.३० ऑक्टोबर २०२६

ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी कबड्डी स्पर्धांचे आयोजन : सुधीर कुंभार
स्पर्धेचे थाटात उद्घाटन

आजरा : प्रतिनिधी
ग्रामीण मातीतून अनेक चांगले खेळाडू घडताना दिसतात. त्यांच्या क्रीडाविषयक गुणांना चालना देण्यासाठी स्वर्गीय बाबुरावजी कुंभार विचार मंच च्या वतीने कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन बाबुरावजी कुंभार विचार मंचचे सुधीर कुंभार यांनी केले. अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या बाबुरावजींना त्यांच्या स्मरण दिनानिमित्त ही अनोखी श्रद्धांजली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पंडित दीनदयाळ विद्यालयाच्या पटांगणावर नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाबुरावजी कुंभार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. स्थानिक महिलांच्या संघांमध्ये प्रदर्शनीय सामना घेण्यात आला.
यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिवाजी बोलके, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष दयानंद भुसारी, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, माजी पंचायत समिती सभापती सौ.रचना होलम, उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, अश्विनी चव्हाण, सोनाबाई कुंभार, जी.एम. पाटील, विजयकुमार पाटील, परेश पोतदार, असिफ पटेल, विक्रम पटेकर, परशुराम बामणे, पूनम लिचम, अनिकेत चराटी, निशांत चांद, माधुरी पाचवडेकर , सौ.रेश्मा बुड्डेखान, वामन सामंत, अरुण देसाई, पांडुरंग तेरसे , रवी हुक्केरी, सुधीर चोडणकर, तानाजी कुंभार, समीक्र चांद, गौरव देशपांडे, दिगंबर देसाई, सौ.गौरी भोसले, धनश्री देसाई, निसार लाडजी, च्यासह मान्यवर उपस्थित होते.
आज शुक्रवारी सायंकाळी आमदार शिवाजीराव पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.

जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट…
आजरा : प्रतिनिधी
जनता सहकारी गृहतारण संस्थेकडे १३५ कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. यात कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. हे लक्षात घेऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १६.६६ म्हणजेच दोन पगार, ड्रेस कोड, दिवाळी फराळ आणि साहित्य भेट म्हणून देताना विशेष आनंद आणि समाधान असल्याची भावना चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केली.
अत्यंत खडतर परिस्थितींवर मात करून, सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या संस्थेने ठेवी आणि कर्जाचे योग्य प्रमाण राखत अनेकांची घरांची स्वप्नं पूर्ण केलेली आहेत. संस्था नावारूपाला आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भविष्यात आपल्या संपूर्ण क्षमतांचा वापर करावा, असे आवाहन व्हाईस चेअरमन डॉ. अशोक बाचुळकर यांनी याप्रसंगी केले.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दोन महिन्यांचा पगार, दोन ड्रेसकोड, भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणेत आल्या. यावेळी संचालक रवींद्र आजगेकर, प्रो. (डॉ.) तानाजी कावळे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि कर्मचारी उपस्थित होते.
मॅनेजर मधुकर खवरे म्हणाले, संचालक मंडळाने नेहमीच कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेतले आहे. त्यांनी दिलेली भेट आम्ही आनंदाने स्विकारून संस्थेच्या प्रगतीसाठी एक दिलाने काम करू असे सांगितले.
यावेळी संचालक डॉ. तानाजी कावळे, प्रा. रवींद्र आजगेकर यांच्या हस्ते बोनस, ड्रेस कोड वाटप करण्यात आले.

आजऱ्यातून पुणे-मुंबईसह विविध मार्गांवर जादा बससेवा ; ३० ऑक्टोबरपासून विशेष गाड्या धावणार

आजरा : प्रतिनिधी
दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागांतर्गत आजरा आगाराने विविध मार्गांवर जादा बससेवेचे नियोजन केले आहे. मुंबई, पुणे आणि इतर महत्त्वाच्या शहरांतून गावी येणाऱ्या प्रवाशांसह सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष बससेवेचा लाभ मिळणार आहे. ३० ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू होणार आहे.
दिवाळीच्या काळात खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने हे नियोजन केले आहे.
मुंबईकर चाकरमान्यांसाठी विशेष बससेवा
मुंबईहून आजऱ्याकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी परळ आणि बोरिवली येथून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबरपासून परळ येथून सकाळी ५.३० आणि सायंकाळी ७ वाजता आजऱ्यासाठी बस उपलब्ध असेल. तर बोरिवली येथून सायंकाळी ४ वाजता आजऱ्यासाठी बससेवा उपलब्ध होणार आहे.
पुणेकरांसाठी आजरा-पुणे थेट बस
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकातून आजऱ्याकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी २ नोव्हेंबरपासून विशेष बससेवा सुरू होणार आहे. स्वारगेट येथून दुपारी २.३० आणि १५.०० वाजताच्या वेळापत्रकानुसार बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आजरा येथून स्वारगेटकडे सकाळी ६.२० आणि ७.३० वाजता बस उपलब्ध असेल.
आजरा आगाराकडून मजलगाव मार्गावरही ३० ऑक्टोबरपासून जादा बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आजरा ते मजलगाव मार्गावर सकाळी ७.४५ आणि ९ वाजता, तर मजलगाव ते आजरा मार्गावर सकाळी ५.४५ आणि ९ वाजता बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.याशिवाय निगडी येथून आजऱ्यासाठी ४ नोव्हेंबरपासून रात्री ८ वाजता विशेष बस उपलब्ध होणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येतात. त्यामुळे नियमित बसगाड्यांवर प्रवाशांचा ताण वाढतो. अशा परिस्थितीत जादा बससेवेमुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजरा आगाराने केलेल्या या नियोजनामुळे चाकरमानी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सर्व गाड्यांचे बुकिंग MSRTC वरती ऑनलाइन उपलब्ध असल्याची माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली.

लोकसहभागातून कानोली येथे ग्रामस्थांनी साकाराला वनराई बंधारा…

कानोली : प्रतिनिधी
कानोली ( ता.आजरा ) येथील ग्रामस्थांकडून दुष्काळाच्या पाश्वभूमीवर गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या सिंचन विहिरीजवळ आणि घाट मार्गांवर जनावारांसाठी पाण्याची सोय होण्यासाठी लोकसहभाग आणि देणगीद्वारे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. गावच्या ग्रुपवर आवाहन केल्यावर गावातील तसेच मुंबईस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन देणगी दिली,
यावेळी गावातील ग्रामस्थांनी श्रमदान करून बंधारे बांधले, बंधारे पूर्ण होताच विहीर आणि ओढ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. याठिकाणी कायमस्वरूपी बंधारा बांधण्याचा ग्रामस्थ व युवकांचा संकल्प आहे. याकामी मुंबई व बाहेरगावी स्थित ग्रामस्थ आणि गावातील जेष्ठ नागरीक युवक महिला यांचे विशेष सहकार्य लाभले..बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी पाहून ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण झाले आहे.

शालेय पोषण आहार संघटनेचा आजरा येथे उद्या मेळावा
आजरा : प्रतिनिधी
शनिवार दिनांक ३१ रोजी दुपारी १ वाजता ‘शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा’ मेळावा व्यंकटराव हायस्कूल पटांगण आजरा येथे बोलवण्यात आला आहे.
केंद्रीय किचन पद्धत शासन चालू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पोषण आहार बनवणाऱ्या कामगार बचत गटाच्या महिला यांचेवर काम जाण्याची टांगती तलवार आहे. याबाबत पुढे काय करावे याची चर्चा व कामातील अडचणींबाबत चर्चा होणार आहे तरी या मेळाव्यासाठी सर्व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन , प्रा.ए.बी.पाटील सर, कॉ.संग्राम सावंत,
कॉ.शिवाजी गुरव यांनी केले आहे.

छाया वृत्त

मसोली (ता. आजरा) येथील शेतकरी श्री. निवृत्ती शिवाजी गजरगावकर यांनी गेली सात वर्षे न्याय न मिळाल्याचा आरोप करत आजरा तहसील कार्यालयासमोर दि. २९ ऑक्टोबर २०२६ पासून उपोषण सुरू केले आहे.

निधन वार्ता
लक्ष्मीबाई कांबळे

पेरणोली ता.आजरा येथील श्रीमती लक्ष्मीबाई निवृत्ती कांबळे यांचे बुधवार दिनांक २८ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पाच्यात ६ मुली आणि १ मुलगा,सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : पंचमी तिथी (सायंकाळी ०७.२४ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (सकाळी ०९.०४ पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
योग : शिवा योग (रात्री ०८.४१ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : कौलव करण (सकाळी ०८.४५ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी १०.५६ ते दुपारी १२.२२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.३३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
